कुणी वसंत घ्या...

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता: 
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत: 
हं!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोळीभाजी कशाला, जरा मस्त चटपटीत स्नॅक्स चा मेनू ठरवू <<< असे सांगणारे देखील CD Player भरून भात घेऊन येतात... Proud
एवेएठीला पावभाजी जिंक्स्ड आहे <<< एकदाच होती.. अजून भोगतोय कर्माची फळे Proud

यावेळी आलो तर काही तरी अजून नवीन आणीन....

१. कोलंबी भात.
२. कुळथाची आमटी.
३. मेदूवडे सांबार चटणी.
४. पापलेट आमटी.
५. व्हेज मांचूरियन.
६. पूर्ण मत्स्याहार (हलवा, सुरमई, चिंबोर्‍या, पापलेट वगैरे..)
७. व्हेज बिर्याणी.
८. भाजाणीची कोलंबी.

एवढे पदार्थ वेगवेगळ्या एवेएठिला आणल्याचे आठवतात.

अजून शंभर पण नाही झाले???? शो ना हो..
हा कल्लोळ आहे का? करायला हरकत नाही. कल्लोळ असेल तर मीपण येईन - सारख्या तारखा बदलणार नसलात तर.

स्वतःच्या हाताने 'चुकि' केल्याबद्दल/गेल्याबद्दल क्लेश होत आहे तिला.... दुसर्‍यांचे नांव कशाला.. Happy

खरे तर मायबोलीवरील पाकक्रियांपैकीच पदार्थ करायला पाहिजेत. खव्याचा पेरू, पेरूची बर्फी, बर्फीचे मोदक, मोदकांचे गोटे, गोट्यांची खीर, नि माझी स्पेशल्टी - कार्ले, शेपू व वांगी यांचा कॅसेरोल.

Happy

>> खव्याचा पेरू, पेरूची बर्फी, बर्फीचे मोदक, मोदकांचे गोटे, गोट्यांची खीर
Lol

>> खव्याचा पेरू, पेरूची बर्फी, बर्फीचे मोदक, मोदकांचे गोटे, गोट्यांची खीर

Lol

>> माझी स्पेशल्टी - कार्ले, शेपू व वांगी यांचा कॅसेरोल

Rofl

>>खव्याचा पेरू, पेरूची बर्फी, बर्फीचे मोदक, मोदकांचे गोटे, गोट्यांची खीर, नि माझी स्पेशल्टी - कार्ले, शेपू व वांगी यांचा कॅसेरोल.>> Lol
झक्की, तुमच्याकडे कुणा मुलाला गोट्या म्हणून हाक मारायची सोयच नसेल ना? बरं, गोट्याची खीर आणि कॅसेरोलची रेसिपी योजाटा.

हे गोटे म्हणजे ते गुजराती लोकांमध्ये असतात तसले खायचे (प्रचंड सोडा घातलेले) गोटे की नद्यांच्या पात्रात सापडतात तसले? Wink

Pages