Submitted by वैभव फाटक on 16 March, 2013 - 10:38
काळ देतो पुन्हा पुन्हा ग्वाही
की कशाचीच शाश्वती नाही
मी न माझा मलाच सापडलो
पालथ्या घातल्या दिशा दाही
हाल पाहून विश्व हळहळले
वाटले फक्त ना तिला काही
प्रेम डोळ्यातले खरे आहे ?
की जुना डावपेच आताही
सुख नको धन नकोच समृद्धी
मोकळे श्वास दे मला काही
वैभव फाटक ( १४-०३-२०१३)
http://vaibhavphatak12.blogspot.in/2013/03/blog-post_14.html
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वैभवा काय जाहले तुजला का
वैभवा काय जाहले तुजला
का लिहीतोस काहिच्या काही
जोक्स अपार्ट ,वृत्त हाताळणी उत्तम पण हासिले गझल म्हणावा असे काही वाटले नाही.
तुम्ही याहून चांगल्या गझल केल्या आहेत म्हणून ह्या गझलेत काही खास वाटले नाही.
काळ देतो पुन्हा पुन्हा
काळ देतो पुन्हा पुन्हा ग्वाही
की कशाचीच शाश्वती नाही
मी न माझा मलाच सापडलो
पालथ्या घातल्या दिशा दाही
हाल पाहून विश्व हळहळले
वाटले फक्त ना तिला काही
प्रेम डोळ्यातले खरे आहे ?
की जुना डावपेच आताही
अत्तिशय आवडले हे सगळे शेर ! जियो !!!
गझल आवडली. काळ देतो पुन्हा
गझल आवडली.
काळ देतो पुन्हा पुन्हा ग्वाही
की कशाचीच शाश्वती नाही
मी न माझा मलाच सापडलो
पालथ्या घातल्या दिशा दाही
हाल पाहून विश्व हळहळले
वाटले फक्त ना तिला काही<<< उत्तम
काळ देतो पुन्हा पुन्हा
काळ देतो पुन्हा पुन्हा ग्वाही
की कशाचीच शाश्वती नाही
मी न माझा मलाच सापडलो
पालथ्या घातल्या दिशा दाही
व्वा.
मस्त ! सगळेच शेर आवडले
मस्त ! सगळेच शेर आवडले .
आवडली गझल.
पिहले तीन फार आवडले. वृत्त
पिहले तीन फार आवडले. वृत्त कोणते आहे?
मी न माझा मलाच सापडलो पालथ्या
मी न माझा मलाच सापडलो
पालथ्या घातल्या दिशा दाही
छान शेर! आवडला.
सुंदर गझल....
सुंदर गझल....
Lajjita vrutt aahe. Befinchi
Lajjita vrutt aahe.
Befinchi nitantsundar gajal 'uttare sapadayachee poorvee' yach vruttat aahe.
काळ देतो पुन्हा पुन्हा
काळ देतो पुन्हा पुन्हा ग्वाही
की कशाचीच शाश्वती नाही>> हा खास आवडला.
सर्वांचा आभारी आहे नचिकेत,
सर्वांचा आभारी आहे
नचिकेत, डॉ.साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे लज्जिता वृत्त आहे.
लगावली - गालगागा लगा लगागागा
छान गझल. साधेपणा भावला.
छान गझल. साधेपणा भावला.
धन्यवाद कणखरजी.
धन्यवाद कणखरजी.
शेवटचे २ शेर सर्वात आवडले.
शेवटचे २ शेर सर्वात आवडले.