Submitted by माधवी. on 13 March, 2013 - 08:19
अमेरिकेत H4 वर असताना काय करता येऊ शकते याबद्दल माहिती हवी आहे.
थोडक्यात मोकळ्या वेळेचा सदुपयोग करून काही नवीन शिकता येऊ शकते का? ' संयुक्ता' मधे एक लेख वाचला होता. त्यातून काही माहिती कळाली होती.
अजून कोणी काही माहिती शेअर केली तर निर्णय घेताना जरा सोपे जाईल.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे सद्ध्या मी एका चांगल्या
इथे सद्ध्या मी एका चांगल्या आयटी कंपनी मधे आहे. तिकडे यायचे म्हणजे जॉब सोडून यावे लागणार. तर तिथल्या वास्तव्यात मी असे काही करू शकते का की ज्यामुळे माझ्या स्किल्समधे भर पडेल आणि पुढे पुन्हा जॉब्-सर्च करावा लागला तर फारशी अडचण येणार नाही. थोडक्यात मोकळ्या वेळेचा सदुपयोग करून काही नवीन शिकता येऊ शकते का?
h4 वर तुम्ही फक्त अर्थार्जन
h4 वर तुम्ही फक्त अर्थार्जन करू शकत नाही. पण ओपन सोर्स कोडिंग वगैरे करू शकाल. तुमच्या फील्डमधली सर्टिफिकेशन्स घेऊ शकाल. नवीन एखादी लॅन्ग्वेज शिकू शकाल.
स्वाती, ओपन सोर्स कोडिंग
स्वाती,
ओपन सोर्स कोडिंग म्हणजे नक्की काय? कुठे माहिती मिळेल?
http://opensource.org/ इथे
http://opensource.org/ इथे काही माहिती मिळेल. गुगल आजोबांना पण विचारुन बघा.
'संयुक्ता'तर्फे प्रकाशित केला गेलेला लेख: http://www.maayboli.com/node/35109
त्यात ही एक लिंक होती: https://www.coursera.org/
इतर अनेक युनिवर्सिटीज तर्फे ऑनलाइन कोर्सेस घेतले जातात. तुम्हाला आर्ट क्राफ्ट इ. मध्ये इंटरेस्ट असल्यास http://online.academyart.edu/ अशा काही साइट्स आहेत.
ऑनलाइन नको असल्यास वर लेखात दिल्याप्रमाणे तुमच्या गावातल्या/आसपासच्या कम्युनिटी कॉलेजमध्ये चौकशी करा.
वॉलंटियरिंग पण करता येऊ शकेल.
वॉलंटियरिंग पण करता येऊ शकेल. अर्थात त्याबद्दल अधिक व खात्रीशीर माहिती अमेरिकावासी देऊ शकतील. पण रेडक्रॉस संघटनेचे अनेक कोर्सेस आहेत : http://www.redcross.org/take-a-class
होमलेस शेल्टर्समध्ये, स्थानिक कम्युनिटीजमध्ये लागणार्या मदतीसाठी तुम्ही योगदान देऊ शकता.
तिथे अनेक स्थानिक देवळांमधून शनि-रवि मुलांसाठी मराठी-हिंदी भाषेचे वर्ग चालतात. त्यात सहभागी होऊ शकता.
डिफरन्टली एबल्ड मुलांसाठी काम करू शकता.
ओपन युनिवर्सिटीजचे, MOOC ऑनलाईन कोर्सेस करू शकता.
एका चांगल्या आयटी कंपनी मधे
एका चांगल्या आयटी कंपनी मधे असून ओपन सोर्स कोडिंग म्हणजे नक्की काय हे माहित नसेल तर अजून बेसिक्स्चा भरपूर अभ्यास करता येइल.
अनेक धन्यवाद सिंडरेला आणि
अनेक धन्यवाद सिंडरेला आणि अकु! बघते आता.
धन्यवाद अक्षरी!
धन्यवाद अक्षरी!
सगळ्यांनी छान सजेशन्स दिली
सगळ्यांनी छान सजेशन्स दिली आहेतच.
मेन फोकस हा जर टेक्निकल स्किल्स मध्ये भर घालणे किंवा टच लूज न करणे असा असेल तर -
१. सर्टीफिकेशन
२. ओपन सोर्स कोडींग/काँट्रीब्युशन
३. आमच्या ओ़ळखीची मुलगी इथे एका देशी स्टाफिंग कंपनी मध्ये त्यांच्या इंटर्नल प्रॉजेक्ट्स वर काम करायची (पैसे न घेता)
४. कम्युनिटी कॉलेजमध्ये कोर्स
फक्त वरचा हेतू नसेल तर य पर्याय आहेत, जे वर सिंडरेला, अरुंधती ह्यांनी लिहिले आहेतच. इकडे आलात की जवळपास चौकशी करायला सुरुवात करता येईल.
एखाद्या विद्यापीठात प्रवेश
एखाद्या विद्यापीठात प्रवेश घेतला तर चांगली डिग्री मिळवू शकाल. अर्थात आत्तापासून जी.र.इ द्यावी लागेल. तसेच एच-४ वर विद्यापीठात काम करून फेलोशिप/ पैसे मिळवता येत नाही. एच ४ वर आलात तरी एच-४ वर राहिले पाहिजे असा नियम नाहीये. त्यामुळे नंतर विसा बदलता येईल. पण हे सर्व आधीपासून प्लान केले पाहिजे.
व्होलेन्तियरिंग करू शकता - पण त्याचा एकूण वेळ आणि हुद्दा 'पेड' नोकरी प्रमाणे नसावा. सामान्यतः इथे एखाद्या आवडीच्या विना-नफा संस्थेत सेवा म्हणून जायचे (आठवड्याला ४-८ तास), पुढे तिथे नोकरी मिळाली कि विसा बदलता येतो. विना-नफा संस्था कधीही एच-१ करू शकते. हे इथे आल्यावर प्लान करता येईल.
एच १ बरोबर खाते असेल तर (इंवेस्तिंग/ट्रेडिंग बद्दल नियम बघितले पाहिजेत...) पण शेयर मार्केट मध्ये ओन-लाइन पैसे मिळवू शकता.
अमेरिकेत एच-४ (H4) वर असताना
अमेरिकेत एच-४ (H4) वर असताना काय करता येऊ शकते? >> तुम्ही तुमचा सध्याचा स्कील सेट वापरून अर्थार्जन करायचे अश्या हेतूने प्रश्न विचारला आहे असे गृहीत धरून... ऊत्तर - काहीही करता येणार नाही.
अर्थार्जन हा मुद्दा कटाप केल्यास... ऊत्तर - अगदी काहीही आणि सर्वकाही करता येऊ शकेल. जुना स्कील सेट वापरून, नवीन आत्मसात करून अगदी काहीही.
पण काय करायचे आहे ती नेमकी दिशा सापडण्यास खूप विचार करावा लागेल आणि वेळ द्यावा लागेल.
वर म्हंटल्याप्रमाणे ओपनसोर्स कोडींग करणे शक्य आहे पण तुमचा स्कील्-सेट कोडींग रिलेटेड नसेल तर सुरूवात करायला थोडे जास्त प्रयत्न करावे लागतील.
एच१ विसा मिळण्यासाठीही तुम्ही प्रयत्न करू शकता. सध्या ते अवघड झाले आहे पण अशक्य नाही. तुमची सध्याची कंपनी जर तुमच्यासाठी काही करू शकत असेन तर तसाही प्रयत्न करून बघा.
किंवा तुम्ही नुकत्याच ग्रॅज्युएट झाला असाल आणि एक-दोन वर्षे वगैरे शिकण्याची तयारी असेल तर मास्टर्स करण्यासाठीही ही चांगली संधी आहे. ही संधी तुमचा एच१ चा मार्ग प्रशस्त करेल. पुन्हा तुम्ही नेमक्या कुठल्या राज्यात येणार आहात आणि तिथे कश्या प्रकारच्या संधी ऊपलब्ध आहेत ते तुम्ही तुम्हाला बघायला लागेल.
काही योजना मनात ठेऊन पावलं ऊचलल्यास हेल्पलेस वाटणं किंवा वैताग येणं नक्कीच टाळता येऊ शकेल
अजून काही प्रश्न असल्यास जरूर विचारा.
गुडलक!
विकिपीडियाची रिक्षा हेही करता
विकिपीडियाची रिक्षा हेही करता येऊ शकेल.
चांगला धागा. उपयुक्त माहिती.
चांगला धागा. उपयुक्त माहिती.
सध्या H1 to Green Card ची
सध्या H1 to Green Card ची स्थिती पहाता, चांगले planning करून decision घ्या. There is a very good chance that Green Card will take a LONG time to arrive! तुमच्याच कंपनी कडून H1 करता आला तर खूपच छान. नाहीतर U.S. मध्ये यायच्या आगोदरच interviews वगरे देऊन H1 चे सेटींग करून घ्या. इथे सध्या H1 होणे कठीण आहे. असंभव नाही. special skill शिकून घ्या. Mobile application development/SAP Hot fields आहेत.