Submitted by वैवकु on 7 March, 2013 - 08:53
सवाल करते असा मला जिंदगी स्वत:ची
कधीच की बाळगू नये आस उत्तराची
हरेक व्यक्ती मलाच पत्ता विचारिताहे
मला कुठे वाट माहिताहे तुझ्या घराची
तुझी खुमारी सभोवताली विरून जाते
अजून घनता वधारते आतल्या धुक्याची
निकाल लावून टाकणे चांगल्या प्रथांचा
चला जुनी खोड मोडुया ह्या नव्या युगाची
अशी कशी भूमिका वठवतोस विठ्ठला तू
निवांतुनी वाट पाहणे विश्व संपण्याची
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
देवपुरकरसाहेब गेल्यानंतर
देवपुरकरसाहेब गेल्यानंतर हल्ली """""गझल""""""" धागा वाचनिय झाला नाही :(.....
.
.
छान आहे गझल
असा प्रश्न पाडते मला जिंदगी
असा प्रश्न पाडते मला जिंदगी स्वत:ची
कधीच की बाळगू नये आस उत्तराची
हरेक व्यक्ती मलाच पत्ता विचारिताहे
मला कुठे वाट माहिताहे तुझ्या घराची
तुझी खुमारी सभोवताली विरून जाते
अजून घनता वधारते आतल्या धुक्याची
निकाल लावून टाकणे चांगल्या प्रथांचा
चला जुनी खोड मोडुया ह्या नव्या युगाची
अशी कशी भूमिका मिळवलीस विठ्ठला तू
निवांतुनी वाट पाहणे विश्व संपण्याची<<<
व्वा वा - मस्त गझल झाली आहे.
असा प्रश्न पाडते<<< यात वृत्त
असा प्रश्न पाडते<<< यात वृत्त बदलत आहे.
उदयनजी धन्स !! बेफीजी विशेष
उदयनजी धन्स !!
बेफीजी विशेष आभार
असा प्रश्न पाडते<<< यात वृत्त बदलत आहे.>>>>>>>>>>
>>>>>>> काय करता यईल बेफीजी तुम्हीच सुचवा कही तरी !!!
सवाल करते असा मला <<<<<<असे करू का .....की याही पेक्षा अधिक चपखल काही असेल............
.......................प्रतिक्षेत
वैवकु , छन गझल !!
वैवकु ,
छन गझल !!
धन्स गिरिजा मध्यंतरी माझेच
धन्स गिरिजा
मध्यंतरी माझेच लेखन वचताना पाहिले की माझ्या तब्बल दोनएक गझलांवर तू प्रतिसाद दिला असतानाही मी तुझे आभार मानायला विसरलो होतो
त्यासाठी क्षमस्व व ... पुनश्च आभार गिरिजा
तुझी खुमारी सभोवताली विरून
तुझी खुमारी सभोवताली विरून जाते
अजून घनता वधारते आतल्या धुक्याची << व्वा ! >>
मस्त गझल वैभवराव
<<< निकाल लावून टाकणे
<<< निकाल लावून टाकणे चांगल्या प्रथांचा
चला जुनी खोड मोडुया ह्या नव्या युगाची
अशी कशी भूमिका मिळवलीस विठ्ठला तू
निवांतुनी वाट पाहणे विश्व संपण्याची >>>
वा!
छान गझल... पण प्रत्येक शेरात
छान गझल... पण प्रत्येक शेरात काहीतरी निसटल्या सारखे वाटले.
खुमार मस्तच जमलाय विशेषतः दुसरी ओळ,

धन्यवाद
धन्यवाद अरविंदजी
---------------------------------
धन्यवाद देवसर
पर्याय आवड्ले नाहीत
तुमच्या पहिल्यापर्यायी शेरात मला अपेक्षित फ्लो हरवलाय शिवाय दोनदा 'प्रश्न' आणि 'का' का आलाय?
तुमच्या वहीत हा शेर असा करून ठेवा ............
विचारते जिंदगी प्रश्न नेहमी स्वतःची
असाच का ?...ज्यास ना कधी आस उत्तराची
दुसरातर अजिबातच नाही आवडला
मूळ शेरात विचारिताहे व माहिताहे हे २ शब्द की वर्डस् आहेत त्यांच्यामुळेच शेराला खरी लज्जत आहे तसा हा मूळ शेर एक शेर म्हणून सपकसाच आहे म्हणायला माझीतरी हरकत नाही
पण हा मला रीयल लाइफवरून सुचलाय म्हणून मला आवडतो.....
एकदा रात्री २ वाजता खूप भूक लागली अश्यात घरात काही नाही म्हणून मी एस टी स्टँडवर गेलेलो ....दुरर्यादिवशी एकादशी ....वरकर्यांची येजा चालूच होती अश्यात मला एकाने मंदिराचा पत्ता विचारला मी सांगीतलाही ...मग दुसरा आला तिसरा आला ......आजूबाजूला दोनचार टाळ्की होतीच तरी मलाच लोक विचारायचे मग वैतागून मी शेवटी एकाला माहीत नाही असे सांगातले .........मला का राग आला याचा मी नंतर विचार केला मग मला जाणवले की खरेच विठ्ठलापर्यंत कसे जायचे हे मला कुठे माहीत आहे .... मी त्या माणसाला म्हणालो ते तसे खरेच होते म्हणायचे............
मला तात्काळ माझाच एक शेर आठवला............
तिथे तो पालखीरस्ता उभा होताच जाताना
तरी मी वाट गझलेची निवडली वाकडी होती
मग झालेल्या घटनेचा पुन्हा एकदा विचार करताना मला हा शेर त्याच राती तीव्र जाणिवेतून क्षणार्धात सुचला जो मी आज जसाच्यातसा इथे दिलाय ............
हरेक व्यक्ती मलाच पत्ता विचारिताहे
मला कुठे वाट माहिताहे तुझ्या घराची
यातून सांगायचे ते इतकेच की आम्ही असे तीळ तीळ तुटून केलेल्या शेराना ऊठसूट पर्याय नका हो देत जाऊ सर.............. फार फार वाईट वाटते !!!
आपला
~वैवकु
शाम + १
शाम + १
शामजी व सुप्रियाताई धन्स आपली
शामजी व सुप्रियाताई धन्स
आपली मते १००%पटत नाहीयेत
असो
पुनश्च धन्स !
निकाल लावून टाकणे चांगल्या
निकाल लावून टाकणे चांगल्या प्रथांचा
चला जुनी खोड मोडुया ह्या नव्या युगाची
अशी कशी भूमिका मिळवलीस विठ्ठला तू
निवांतुनी वाट पाहणे विश्व संपण्याची
मस्त आवडली.
छान
छान
विक्रांतजी व डॉ. साहेब खूप
विक्रांतजी व डॉ. साहेब खूप खूप धन्यवाद
मक्त्यातील पहिली ओळ संपादित !
मक्त्यातील पहिली ओळ संपादित !
अशी कशी भूमिका वठवतोस विठ्ठला तू
निवांतुनी वाट पाहणे विश्व संपण्याची
अशी कशी भूमिका वठवतोस विठ्ठला
अशी कशी भूमिका वठवतोस विठ्ठला तू
निवांतुनी वाट पाहणे विश्व संपण्याची
शेर आवडला. आपला विठ्ठलाचा शेर बहुधा भावतो.
धन्यवाद समीरजी जयनीतजी
धन्यवाद समीरजी
जयनीतजी आपलेही खूप खूप आभार