Submitted by मनी on 1 March, 2013 - 17:56
हा प्रश्न कुठे विचारावा समजले नाही म्हणून इथे विचारतेय. आधीच असा धागा असेल तर हा धागा डिलीट करावा किंवा मी करेन.
माझ्या बहीणीला अमेरिकेत घर घ्यायचे आहे. तीला जे घर मिळतंय त्यात एका वृद्ध जोडप्याचं निधन झालंय. जागेचा मालक २००९ ला अणि मालकीण बाई २०१२ ला स्वर्गवासी झाले.
तर हे घर घ्यावं की नाही हा प्रश्न आहे कारण बराच पैसा गुंतवायचा असल्याने जाणकारांना विचारूनच निर्णय घ्यावा. घेतलंच तर काही पूजा वगैरे करून घेता येइल कां?
घर अगदी छान आहे आणि मोक्याच्या जागी आहे पण या प्रश्नावर सगळं घोडं अडतंय.
श्रद्धा- अंधश्रद्धा हा प्रश्न उपस्थित करू नये प्लीज.
लवकरात लवकर उत्तर मिळाल्यास काहीतरी निर्णय घेता येइल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घर घेण्यात अडचण काय येतीये ते
घर घेण्यात अडचण काय येतीये ते नाही समजलं. तुम्हाला काही कायदेशीर माहिती हवी आहे का?
अमेरिकेत नक्की कुठे?
तुम्ही तुमचा प्रश्न 'धार्मिक'
तुम्ही तुमचा प्रश्न 'धार्मिक' विभागात टाकलात तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर लवकर मिळेल.
कायदेशीर अडचण नसेल तर जरुर
कायदेशीर अडचण नसेल तर जरुर घ्या की! श्रद्धा अंधश्रद्धा हा प्रश्न उपस्थित करु नये असे जरी असले तरी मनात एक किडा वळवळत असतो. त्यासाठी उपाय म्हणजे वास्तु/गृहशांती करुन घ्या. ज्या वास्तूत मृत्यु झालाच नाही अशी वास्तुच (व्यापकर अर्थाने) असत नाही.
मने,श्ररद्धा- अंधश्रद्धा हा
मने,श्ररद्धा- अंधश्रद्धा हा प्रश्न नसेल तर ज्यांना तिथे रहायचे आहे त्यांना तिथे ( त्या वास्तु मधे) जर आत गेल्यावर चांगले व्हायब्रेशन्स असतिल तर घ्यायला काहीच हरकत नसावी.
आम्हाला एक घर ज्या ठिकाणी ४५०
आम्हाला एक घर ज्या ठिकाणी ४५० के किंमत सुरवात आहे अशा लोकेशन मधे अतिशय सुंदर घर ३५० ला मिळत होते.
आत गेल्यावर सगळे सुंदर होते, पण एक प्रकारचा विचित्र तणाव आला. रियलटर ला विचारले, तिला फार माहिती नव्हती ( घर बँकेकडे होते).
पण त्या सुंदर घराला नको म्हणवत नव्हते आणि ते व्हायब्रेशन्स मुळे घेण्यापुर्वी नीट चौकशी करणे भाग वाटले. शेजार्याला गाठले. आणि कळाले कि आधिचा ओनर ( ज्याने घर बांधुन घेतले होते) तिथे आत मधे गेला ( स्वर्गवासी ) आणि ३ दिवस कोणाला काही पत्ताच नाही लागला.
लगेच आम्ही त्या घराचा विचार सोडुन दिला.
पण.... जर आपल्याला असे काही वाटत नसेल ( स्पे भिती ई.) तर चांगले डिल होते ते.
तीला जे घर मिळतंय त्यात एका
तीला जे घर मिळतंय त्यात एका वृद्ध जोडप्याचं निधन झालंय. >>> अहो इथेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे , वृद्धत्वामुळे निधन होणे स्वाभाविक आहे.
रिमझिम माफ करा पण हे सगळे मनाचे खेळ आहेत , प्रत्येक घरात कोणी ना कोणी मरत असतं , हा सृष्टीचा नियमच आहे फक्त कोणी वय झाल्याने तर कोणी अकाली .
श्री अगदी मान्य , म्ह्णुनच
श्री अगदी मान्य , म्ह्णुनच म्ह्णाले कि <<<<पण.... जर आपल्याला असे काही वाटत नसेल ( स्पे भिती ई.) तर चांगले डिल होते ते.>>>>
आणि माझा अनुभव वेगळा होता. तो माणुस म्हातारा नव्हता आणि ३ दिवस बॉडी घरातच होती. मला तरी भिती वाटली.
आपली वडिलोपार्जीत घरे. तिथे
आपली वडिलोपार्जीत घरे. तिथे तर अनेक जवळच्या लोकांचे मृत्यू झालेले असतात. मग कसे करावे?