Submitted by विजय जोशी on 24 February, 2013 - 05:00
!! प्रेमवेडा !!
गेलीस तू मला आशेचा किरण देऊन,
वाटलं होतं येशील परत फिरून !!
का गेलीस तू मध्येच निघून,
खेळ आपुला अर्धवट सोडून !!
वाट पाहत आहे तुझी डोळ्यात प्राण आणून,
बसलो आहे अन्न पाणी सोडून !!
डोळे आले आहेत अश्रूंनी भरून,
पण गेलो आहे तुझ्या प्रेमाने भारावून !!
स्वप्न होते मनी वसून,
पण राहिले ते फोल ठरून !!
वाटले एकदा हे जग जावे सोडून,
पण तू बसलीस मार्ग अडवून !!
वाट पाहता पाहता जाईन मरून,
आपल्या प्रेमाची साक्ष ठेवून !!
पण अजूनही आहे आशा मनी धरून,
स्वागत करीन तुझे चुंबन घेऊन !!
***********
विजय म. जोशी
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
क्षमस्व ;मा.श्री.
क्षमस्व ;मा.श्री. मासरूळ्करांच्या कवितेवर या कवितेची जाहिरात पाहिली म्हणून वाचायला आलो होतो... येताना खूपश्या अपेक्षा ठेवून !
...............तितक्या पूर्ण होत नाहीयेत
असो
शुभेच्छा
विजय जोशीजी , प्रत्येक
विजय जोशीजी ,

प्रत्येक वाचलेल्या कवितेवर तुम्ही कवितेतूनच प्रतिसाद देताहात , यातून तुम्ही शिघ्रकवी आहात असं जाणवलं.
लिहित रहा , शुभेच्छा !
धन्यवाद श्री राजीव जी. आपल्या
धन्यवाद श्री राजीव जी.
आपल्या पासून प्रेरना घ्यावीशी वाटते.
छान आहे कविता!
छान आहे कविता!