Submitted by -शाम on 20 February, 2013 - 11:50
बेफि, आपल्या कल्पकतेचा आदर करुन ... ही गझल आपल्यालाच
नसे ही खंत, केला सावलीने घात माझा
मला जपता न आला सूर्य अंधारात माझा
जरी रस्त्याकडेला आज ते मंदीर नाही
नकळता जोडला जातो तरीही हात माझा
कधी ना तोल ढळला पाहुनी रंगीत स्वप्ने
निरागस जीव होता आपुल्या रंगात माझा
अजुन नाही चिता विझली, अजुन ना न्याय झाला
कसा आकांत गेला ओसरुन इतक्यात माझा
घरासाठीच गेलो दूर अन् घर दूर गेले
अता नुसताच आहे एक फोटो आत माझा
.........................................................शाम
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
. . .
. . .
अर्थात रुमाल टाकून ठेवला आहे
अर्थात रुमाल टाकून ठेवला आहे तर ...ओके
सर्व शेर झाले की इथेच प्रकाशित करा
आम्ही(मी व इतर मायबोलीकर...उगाच 'आम्ही' वरून गै स नको व्हायला..;)) परत येवूच वाचायला
पहिला शेर जमलाय आवडला
मला 'दिगंत'चा आवडला होता पण
मला 'दिगंत'चा आवडला होता पण तुम्ही अप्रकाशित केला तो.
वाह ! क्या बात है ! मतला तर
वाह ! क्या बात है !
मतला तर खूपच आवडला .
संपूर्ण गझल आवडली .
सर्व शेर
सर्व शेर आवडले

संपादित
जरी रस्त्याकडेला आज ते मंदीर
जरी रस्त्याकडेला आज ते मंदीर नाही
नकळता जोडला जातो तरीही हात माझा
अतिशय सुंदर शेर.
लहान-सहान सवयी आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात ही अनुभूती अधोरेखित करणारा शेर.
काही शेर बांधणीत अजून घट्ट हवेत.
अर्थात हे मीही तंतोतंत पाळतो असे नाही. पण प्रयत्न करतोच.
शुभेच्छा.
>> जरी रस्त्याकडेला आज ते
>>
जरी रस्त्याकडेला आज ते मंदीर नाही
नकळता जोडला जातो तरीही हात माझा
घरासाठीच गेलो दूर अन् घर दूर गेले
अता नुसताच आहे एक फोटो आत माझा
<<
आवडले शेर.
ये हुई ना बात!! धीस इज
ये हुई ना बात!! धीस इज श्याम!!
नसे ही खंत, केला सावलीने घात माझा
मला जपता न आला सूर्य अंधारात माझा >>>> वाह वाह!!! सुरेख!
जरी रस्त्याकडेला आज ते मंदीर नाही
नकळता जोडला जातो तरीही हात माझा >> अं.... ओके आहे.
कधी ना तोल ढळला पाहुनी रंगीत स्वप्ने
निरागस जीव होता आपल्या रंगात माझा >> खूप आवडला.
अजुन नाही चिता विझली, अजुन ना न्याय झाला
कसा आकांत गेला ओसरुन इतक्यात माझा >> सुपर्ब!!
घरासाठीच गेलो दूर अन् घर दूर गेले
अता नुसताच आहे एक फोटो आत माझा> मस्त.
एकूणच गझल आवडली.
नसे ही खंत, केला सावलीने घात
नसे ही खंत, केला सावलीने घात माझा
जरी रस्त्याकडेला आज ते मंदीर नाही
नकळता जोडला जातो तरीही हात माझा
घरासाठीच गेलो दूर अन् घर दूर गेले
अता नुसताच आहे एक फोटो आत माझा
>>
वाह!
पुन्हा एकदा जियो
शाम, सर्वच शेर मस्त
शाम,
सर्वच शेर मस्त आहेत.
शेवटचा खूपच आवडला.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
फक्त ’मंदिर’ या शेराबाबत :
शेर अतीशय छान आहे.
परंतु, बेफींनी दिलेले डिटेल्स जवळपास तसेच उतरले आहेत.
त्यांनी सांगितलेल्या अपेक्षेनुसार आशय तोच ठेवून
सांकेतिक पद्धतीने शेर मांडायचा आहे.
अर्थात, हे वैम. चुकलेही असेल कदाचित.
घरासाठीच गेलो दूर अन् घर दूर
घरासाठीच गेलो दूर अन् घर दूर गेले
अता नुसताच आहे एक फोटो आत माझा
<<
व्वा व्वा शाम!
काय सुंदर गझल!
(मलाच दिल्यासाठी वेगळे आभार)
संकेत तरहीला जवळपास पूर्ण न्याय मिळेल अशी गझल दिल्याबद्दल धन्यवाद व अभिनंदन
जरी रस्त्याकडेला आज ते मंदीर नाही
नकळता जोडला जातो तरीही हात माझा<<< मस्त
आवडली
आवडली
धन्यवाद दोस्तांनो. दुसरा शेर
धन्यवाद दोस्तांनो.
दुसरा शेर खयाली सारखा झाला असला तरी तो सहज आणि थेट आलेला असल्याने मी तसाच ठेवणे पसंत केले.
मी हेच खयाल अगोदर असेही लिहले होते
दु:ख न हे की दुरावलेला वसंत आहे
मला न आले मोहरता हीच खंत आहे
वळणावरचा देव जरी हद्दपार झाला
अजूनही काळजामधे साजिवंत आहे
कधीच नाही हेवा केला श्रीमंतीचा
त्याला अपुली गरिबी इतकी पसंत आहे
स्मरतच नाही काल कशाने पेटुन उठलो
हीच समस्या देशासाठी ज्वलंत आहे
पंख दमवुनी घरट्यामध्ये येता कळले
की पिल्लांना प्यारा झाला दिगंत आहे
खूप वाटते मनासारखे बरसुन घ्यावे
'शाम' कुणाच्या खांद्याला पण उसंत आहे
......................................................................
@ समीर माझाही तसाच प्रयत्न असतो, आपणही संकेत तरही लिहल्यास आपले म्हणणे सोदाहरण अभ्यासता येईल.
असो आभार सगळ्यांचे
सुपर्ब, सुपर्ब, सुपर्ब.......
सुपर्ब, सुपर्ब, सुपर्ब.......
छान !
छान !
जरी रस्त्याकडेला आज ते मंदीर
जरी रस्त्याकडेला आज ते मंदीर नाही
नकळता जोडला जातो तरीही हात माझा <<< व्वा ! >>
घरासाठीच गेलो दूर अन् घर दूर गेले << सुंदर मिसरा >>
आवडली
ये मस्त जमलिये.... मला खूप
ये मस्त जमलिये.... मला खूप आवडली
उत्तम संकेत तरही, दुसरा शेर
उत्तम संकेत तरही, दुसरा शेर वगळता.
सगलेच शेर आवडले.
सर्वच्या सर्व शेर आवडले.. मला
सर्वच्या सर्व शेर आवडले..
मला तर तुम्ही आधी लिहिलेली गझल हि आवडली..( एक स्वतंत्र गझल म्हणून )
अभिनंदन.
आवडली गझल..
आवडली गझल..
अजुन नाही चिता विझली, अजुन ना
अजुन नाही चिता विझली, अजुन ना न्याय झाला
कसा आकांत गेला ओसरुन इतक्यात माझा
घरासाठीच गेलो दूर अन् घर दूर गेले
अता नुसताच आहे एक फोटो आत माझा
<< सुपर्ब