भारतीय लोकशाही, ६५ च युद्ध, कारगिल आणि शत्रूचा पण पॉइण्ट ऑफ व्ह्यू

Submitted by बावरा मन on 20 February, 2013 - 05:32

पिलू मोदी हे नाव आज कुणाच्या फारस स्मरणात नाही. पण पेशाने स्थापत्य विशारद असणार्‍या या अष्टपैलु माणसाने भारतीय राजकारणावर पण काही काळ आपला ठसा उमटवला होता. पिलू मोदी हे त्यांचे समकालीन राजकारणी व तत्कालीन पाकिस्तानी बडे प्रस्थ झुल्फीकार अली भुट्टो यांचे जवळचे मित्र होते. त्यानी कॉलेज मध्ये एक्त्रच प्रवेश घेतला होता इतकेच नव्हे तर ते रूम मेट्स म्हणून पण एकत्र राहीले होते. अशा या त्यांच्या घनिष्ट मित्राला जनरल ज़ीया यानी लष्करी उठाव करून तुरुंगात टाकले व स्वताहा त्या देशाचे सर्वेसर्वा बनले. लष्करी हुकुमशाहाना कायम च जनाधार असणार्‍या नेत्याचे भय असते. तसेच ते ज़ीया ना भुट्टो यांच्याबद्दल पण होते.त्यानी भुट्टो यांच्यावर निरनिराळे आरोप लावून त्याना मृुत्यदंड मिळेल याची व्यवस्था केली. पिलू मोदी या आपल्या जवळच्या मित्राला शेवटच म्हणून भेटायला पाकिस्तान मध्ये गेले. जवळचे मित्र असल्याने त्याना भुट्टो ना तुरुंगात जाउन भेटण्याची परवानगी लगेच मिळाली. भुट्टो हे तसे प्रचंड भारत विरोधक. १९७१ च्या युध्ाच्या वेळेला युनो मध्ये केलेले 'इंडियन डॉग्स' असा भारतीयांचा वारंवार उल्लेख करून केलेले भाषण खूप गाजले होते. इंटरनेट वर त्या भाषणाच्या क्लिप्स पण उपलब्ध आहेत. पण त्या शेवटच्या भेटीत भुट्टो यांच वेगळच रूप मोदी याना बघायला मिळाल. भुट्टो यानी मोदी याना सांगितल ,'' आम्हाला नेहमी भारतीय सांसदीय लोकशाहीची खिल्ली उडवायला आवडत. पण हे सांसदीय लोकशाहीच भारताच बलस्थान आहे. तुमच्या संसदेत नेहमी आरडाओरडा असतो, बजबजपुरी असते. पण या सगळ्यात एक उर्जा आहे. एक सुसूत्रता आहे. या लोकशाहिमुळेच भारत एकसंध आहे. नाहीतर भारताचे आतापर्यंत अनेक तुकडे झाले असते. " या कट्टर भारत विरोधकाने भारतीय लोकशाहीला दिलेली ही एक सलामीच.

हा किस्सा पुन्हा आठवायचे कारण म्हणजे पुन्हा काही पाकिस्तानी लोकांकडून हीच प्रतिक्रिया क्वेटा मध्ये झालेल्या भीषण बॉम्बबलास्ट नंतर ऐकायला मिळाली. मी http://www.defence.pk/ या पाकिस्तानी संस्थळाचा सदस्य आहे. हे एक डिस्कशन फोरम आहे. इथे अनेक आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा होत असत. जरी हे पाकिस्तानी संस्थळ असल तरी इथे कुणीही चर्चा करू शकत असल्याने अनेक राष्ट्रियत्वाचे लोक मेंबर आहेत. भारतीय, चिनी, बांगलादेशी, अमेरिकन, युरोपियन, आणि अगदी विएतनाम चे पण नागरिक पण विविध विषयांवर इथे आपली मत देत असतात. पाकिस्तानी संस्थळ असून पण हे चक्क लोकशाही धर्तीवर याचे काम चालते. म्हणजे तुम्ही पाकिस्तान वर इथे जहाल भाषेत टीका पण करू शकता. पाकिस्तान च्या राष्ट्रीय धोरणांवर पण टीका करू शकता. (अवांतर- याच धर्तीवर एक भारतीय डिस्कशन फोरम पण आहेत. पण बहुतांशी संस्थळ ही अती उजव्या व आक्रमक भारतीय राष्ट्रवादचा पुरस्कार करणार्यांकडून कडून चालवली जातात. त्याना सोयीस्कर तेवढीच मत तिथ स्वीकारली जातात. वेगळी मत असणारी लोक तिथे स्वीकारली जात नाहीत. त्यामुळे निष्पक्ष चर्चा होण्याला मर्यादा पद्तात.त्यामुले अनेक संतुलित विचार करणारे भारतीय पण या फोरम पेक्षा पाकिस्तान डिफेन्स फोरम ला पसंती देतात.) सार्वजनिक संस्थळ असल्याने अनेक भारतीय व पाकिस्तानी कट्टर पंथीय पण तिथे धुमाकूळ घालत असतात. पण त्याचबरोबर अनेक देशामधले विचारवंत, मुत्सद्दी, निवृत्त लष्करी अधिकारी पण आपली अभ्यासू मत देत असतात. त्यात अनेक पाकिस्तानी लोकांचा पण समावेश आहे. सध्या पाकिस्तान मध्ये जे काही चालू आहे त्यामुळे या विचारवंतामध्ये अस्वस्थ विचारमंथन चालू आहे. आपल्यासोबतच स्वतंत्र झालेला भारत आज अनेक समस्या शी लढत इंच इंच पुढे जात आहे आणि आपण आपल्या अस्तित्वाचाच लढा लढत आहोत ही वस्तुस्थिती या 'Intellectuals' ना अस्वस्थ करत आहे. परवा क्वेटा इथे बॉम्बस्फोट होऊन ८४ शीया मारले गेल्यावर या अस्वस्थेचा स्फोट झाला. आणि या स्फोटा बद्दल भारताला जबाबदार धरणार्‍या काही पाकिस्तानी मेंबेर्स ला एका सीनियर पाकिस्तानी डिप्लोमॅट ने धारेवार धरले आणि भारतीय लोकशाही बद्दल झुल्फीकार अली भुट्टो च्या जवळ जाणारे हेच मत मांडले.

मात्र कट्टर राष्ट्रवादाचे चष्मे चढवून इथे येणार्‍या प्रत्येकाला सावधानतेचा इशारा. वर्षानुवर्ष आपण जपलेली काही ऐतिहासिक भ्रम इथे चकनाचुर होऊ शकतात. काय आहेत हे ऐतिहासिक भ्रम. १९६५ च युद्ध खरच आपल्याला सांगितल्या गेल तास आपण क्लीन स्वीप करून जिंकल होत का? का इतर आंतरराष्ट्रीय माध्यमानी या युध्ाला स्टेल मेट (म्हणजेच बरोबरीत सुटलेल युद्ध) ठरवल होत? कारगिल युद्ध खरच वाजपेयी सरकारने ढोल बडवाल्याप्रमाणे महान राष्ट्रीय विजय होता का सरकार आणि लष्कर यांच्या अक्षम्य दुर्लक्षाचा कारगिल युद्ध हा परिपाक होता? टाइगर हील जवळील पॉइण्ट ५३५३ हे शिखर अजुन पण पाकिस्तान च्या ताब्यात आहे. जर आपण हे युद्ध जिंकल असु तर हे शिखर अजुन पाकिस्तांन च्या ताब्यात का? कारगिल मध्ये नेमके किती जवान धारतीर्थी पडले? प्रश्न आणि नवीन प्रश्न. भारतासारख्या लोकशाही देशात जिथे मुक्त माध्यम आहेत त्या देशात पण राष्ट्रवादाचे ढोल बडवत सत्याचा कसा लोप केला जातो हे समजल्यावर मन खिन्न होत.

अजुन एक महत्वाच म्हणजे अनेक भारतीय मुस्लिम या संकेतस्थळावर भारत हा कसा सेक्युलर देश आहे हे हिरीरीने मांडत असतात. समाजातल्या एका 'brainwashed' हिश्श्याने या समाजाला कधीच 'पाकिस्तानी' असे घोषित करून वाळत टाकले आहे तरी पण ते हिरीरीने आपल्या देशाची बाजू मांडत असतात हे विशेष.

आपल्या जखमेवर मीठ शिंपडणारी अजुन एक गोष्ट म्हणजे पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हवाई दलावर अनेक चकमकित वर्चस्व गाजवले आहे. पुढची महासत्ता होण्याची महत्वाकांक्षा बाळगणार्‍या या देशाचे लष्कर सध्या युद्ध चालवायला खरेच सक्षम आहे का? आपले रणगाडे रात्री धावू पण शकत नाहीत. तोफांच्या बाबतीत पाकिस्तान पण आपल्यापेक्षा वरचढ आहे. पाकिस्तान चा क्षेपणास्त्र कार्याक्र्म् आपल्या पेक्षा काकणभर सरस च आहे. ही तथ्य कळली की भारताने संसदेवरील हल्ल्यानंतर आणि २६/११ च्या मुंबई हल्ल्यांनंतर पाकिस्तान ला का प्रत्युत्तर दिले नाही हा प्रश्न पडेनासा होतो.

अस म्हटल जात की प्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात. तुमची, समोरच्याची आणि सत्याची. डोळे उघडे ठेवून सत्य स्वीकारायच का राष्ट्रवादाचा काळा चष्मा लावून त्याकडे बघायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गैरसमज होतो आहे मयेकर साहेब. १९७१ मधल्या विजयाचा आणि भारतीय लष्कराच्या उज्ज्वल परंपरेचा एक भारतीय म्हणून मला अभिमान आहेच. पण भूतकाळात ज्या चुका झाल्या आणि वर्तमानकाळात लष्करासमोर जे प्रश्न आ वासून उभे आहेत त्यांच पण विश्लेश्न व्हयला हव.

Pages