Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 18 February, 2013 - 17:54
तस्वीर तरही बद्दल मी आज वाचले. खरं तर माझी रचना टाकायला उशीर झालाय पण जमल्यास ह्या रचनेचाही विचार व्हावा.......धन्यवाद.
निष्पर्ण जाहले तुझ्याविना कोसळले नाही
मी जगत राहिले पुन्हा पुन्हा, ऊन्मळले नाही
आडास पोहरा जखडुन करतो वेठबिगारी
त्याचे कधीच मूक रुदन कोणा दिसले नाही
वाटेत हात सोडला कधी तू कळले नाही
मी चाल बदलली जरा परी अडखळले नाही
शाळेत रोजची चिडाचिडी अन भांडाभांडी
का घट्ट आपुला लगाव मजला कळले नाही
का पौर्णिमेस तारका नभी, येण्या आतुरती
रजनीस अजुन हे गुपित जराही कळले नाही
जयश्री अंबासकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
का पौर्णिमेस तारका नभी येण्या
का पौर्णिमेस तारका नभी येण्या आतुरती
रजनीस अजुन हे गुपित जराही कळले नाही
निष्पर्ण जाहले तुझ्याविना कोसळले नाही
मी जगत राहिले पुन्हा पुन्हा ऊन्मळले नाही<<<
शेर आवडले.
(रजनीस अजुन हे - या जागी जयवीस अजुन हे असेही एक उगाच सुचले. कृ गै न)
त्याचे अश्रू कधीच वेगळे ओघळले नाही - या ओळीत बहुधा एक मात्रा अधिक झाली असावी.
गझल छान आहे. तस्वीर तरहीतील सहभागासाठी धन्यवाद व अभिनंदन
सुंदर!
सुंदर!
वा! आवडली गझल
वा! आवडली गझल
बेफी.... जयवीस अजुन हे .....
बेफी.... जयवीस अजुन हे .....
तस्वीर तरही हा प्रकार मनापासून आवडला. अर्थात कितपत जमला माहित नाही. पण मज्जा आली
उमेश, सुप्रिया....धन्यु
मला फारशी नाही अवडली कळले
मला फारशी नाही अवडली कळले नाही अशी रदीफ घेवून गझल जास्त चांगली झाली असती असे वाटले
बेफीजींनी सुचवलेला जयवीस हा बदल फार उत्तम आहे
अश्रू ओघळ्ले ही वृत्तात नाही ये ओळ ...शिवाय रदीफही नाही ऐवजी नाहीत अशी मनोमन मानून वाचावी लागते
छान प्रयत्न. काही ओळींत
छान प्रयत्न.
काही ओळींत अडखळल्यासारखे झाले, पण जुळवून घेतले वाचताना.
बेफि आणि वैभव.........
बेफि आणि वैभव......... दुसर्या शेरातली चूक कळली. खरं तर काहीतरी चुकतंय हे जाणवत होतं. पण कळत नव्हतं. आता ती चूक सुधारलीये.
झालं काय की सुरवातीला सुचलेल्या शेरात असं काही विचित्र वृत्त होतं की ते निभावता निभावता अक्षरशः नाकी नऊ आले. गझलेच्या प्रांतातलं नवखेपण अजूनही तसंच आहे
तस्वीर तरही गझल हा प्रकार थोडा बहुत कळला आणि लिहिता आला हे ही नसे थोडके
धन्यवाद राजीव
प्रयत्न चांगला
प्रयत्न चांगला आहे.
वृत्ताकडे/मात्रांकडे अधिक लक्ष देणार आहात हे वरील प्रतिसादातून जाणवलं.
मनमोकळेपणे चूक मान्य करणारा नेहमीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असतो.
चांगला प्रयत्न
चांगला प्रयत्न जयवी,उल्हासजींशी सहमत.
मस्त..कूल. तस्वीर तरही
मस्त..कूल. तस्वीर तरही म्हंजे?
उल्हास, भारती,
उल्हास, भारती, अपर्णा.......धन्यु
अपर्णा तस्वीर तरही म्हणजे चित्र बघून शेर लिहायचे