शब्द आणि अर्थ

Submitted by आपटे सुरेखा on 17 February, 2013 - 08:32

शब्द आणि अर्थ.

संवादाला गरज शब्दांची
शब्दाला गरज अर्थाची
जाणीव नेणीवेच्या गर्भाच्यातून
प्रसूति प्रणवाची.

शब्दाला अर्थ असतो
अव्यक्ताला व्यक्त करतो
संवेदनांचे सूक्ष्म अंकूर
शब्दानेच प्रकट करतो.

शब्दाला अर्थ असतो
अर्थाला आकार
स्थूळ सूक्ष्माच्या बांधावर
तोच एक जाणकार.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users