गाव ब्रम्हांड माझे (तस्वीर तरही)

Submitted by अभय आर्वीकर on 14 February, 2013 - 11:55

गाव ब्रम्हांड माझे

सांगताना अवेळीच सांगू कसे?
पोळलेल्या मनाचे असे हे हसे!

काल गर्दी किती; रांग होती इथे
आटतांना कुणी सोबतीला नसे

हात घेताच हातात का वाटले?
तप्त अग्नीत जळलेय मोती जसे

शिक्षणाने मिळालाय विश्वास की;
चंद्र तारे अता दूर ना फ़ारसे

पिंजरा तोडुनी मी सिमा लांघल्या
गाव ब्रम्हांड माझे "अभय" छानसे

                               - गंगाधर मुटे
----------------------------------------
(क्षमस्व बेफिजी, मला दृष्यातला एकही शब्द योजता आला नाही.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'काल गर्दी किती; रांग होती इथे
आटतांना कुणी सोबतीला नसे'

तुम्हा सार्यांपुढे मी बापुडा काय बोलणार? पण वरील शेर विशेष आवडला. Happy

'काल गर्दी किती; रांग होती इथे
आटतांना कुणी सोबतीला नसे

शेर चांगला आहे पण चित्र नसेल तर या शेराचा अर्थ लावणे अवघड आहे.

४ व ५ छान आहेत.

<<शेर चांगला आहे पण चित्र नसेल तर या शेराचा अर्थ लावणे अवघड आहे.>>

सहमत आहे.

पण हेही खरे की, चित्र न पाहता त्याओळीतून जो अर्थ निघेल तो, या चित्राशी सुसंगत नसेल पण "आटतांना" या शब्दाच्या आशयाशीच जुळणारा असेल. Happy