Submitted by वैवकु on 13 February, 2013 - 06:33
जिणे निष्पर्ण झाडागत...मला बहरायचे आहे
फुलोर्यांच्या तळ्यामध्ये मला डुंबायचे आहे
शिवाराचा दुकाळी हिरवळीचा हट्ट ; माझाही....
जरी आडात ना पाणी मला शेंदायचे आहे
नशीबी एक रस्ता पण ठिकाणे दोन टोकांना
मला इकडे तुला तिकडे निघत गाठायचे आहे
मला हे माहिती नव्हते शिकवताना तुम्ही बाई
उद्या आयुष्य ह्याच्यातुन मला घडवायचे आहे
इथे अब्जावधी तारे तरी अंधार का सगळा
मनातुन विठ्ठला.. .काळ्या ...तुला काढायचे आहे
________________________
"चित्रे इथे आहेत
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नशीबी एक रस्ता पण ठिकाणे दोन
नशीबी एक रस्ता पण ठिकाणे दोन टोकांना
मला इकडे तुला तिकडे निघत गाठायचे आहे
इथे अब्जावधी तारे तरी अंधार का सगळा
मनातुन विठ्ठला.. .काळ्या ...तुला काढायचे आहे
व्वा व्वा वैभव.
विठ्ठलाचा आजपर्यंतचा सगळ्यात आवडलेला शेर.
धन्स कणखरजी विठ्ठलाच्या ह्या
धन्स कणखरजी
विठ्ठलाच्या ह्या शेराचा खयाल काल सकाळीच मनात तरळला होता . पेपरात एक लेख होता ग्रहतार्यावर मनःचक्षूंपुढे एक चित्र तयार झाले. चिंतन करताना त्यातल्या काळ्या भागात विठ्ठल दिसत होता
नंतर बेफीजींनी दिलेले चित्र त्याच्याशी तंतोतंत जुळले लगोलग शेर तयार झाला जसाच्यातसा इथे दिला
नशीबी एक रस्ता पण ठिकाणे दोन
नशीबी एक रस्ता पण ठिकाणे दोन टोकांना
मला इकडे तुला तिकडे निघत गाठायचे आहे
शेर आवडला.
"नशीबी एक रस्ता पण ठिकाणे दोन
"नशीबी एक रस्ता पण ठिकाणे दोन टोकांना
मला इकडे तुला तिकडे निघत गाठायचे आहे " >>> हा सर्वाधिक आवडला.
"शिवाराचा दुकाळी हिरवळीचा हट्ट ; माझाही....
जरी आडात ना पाणी मला शेंदायचे आहे " >>>> हा त्यानंतर आवडला.
'शेंदायचे' हा अस्सल ग्रामीण शब्द मोहक वाटला.
kya baat! shevat cha sher
kya baat! shevat cha sher adhik awadla!
नशीबी एक रस्ता पण ठिकाणे दोन
नशीबी एक रस्ता पण ठिकाणे दोन टोकांना<<<
त्या चित्रासाठी ही ओळ अप्रतिम झालेली आहे.
इथे अब्जावधी तारे तरी अंधार का सगळा
मनातुन विठ्ठला.. .काळ्या ...तुला काढायचे आहे<< वा वा! चांगला शेर!
मस्त एकदम
मस्त एकदम
समीरजी ,उकाका, अन्वया ,बेफीजी
समीरजी ,उकाका, अन्वया ,बेफीजी ,चिखल्या ,खूप खूप धन्स
@ उकाका : माझाही हा शब्द दोन्ही ओळीना जोडतो .....अर्थासाठी ..तो तसा पहिल्या ओळीत माण्डणे हा अभिव्यक्तीचा मुद्दा आहे त्यामुळे शेरात जरा वेगळेपणा आला व तो खुलवण्यास मदतच झाली असे मला वाटते आहे (वैयक्तिक मत).......तुम्ही प्रतिसाद संपादित केलात बहुधा मी माझा हा प्रतिसाद तुमच्या संपादनाआधीच्या प्रतिसादावरच देत आहे उकाका
नशीबी एक रस्ता पण ठिकाणे दोन
नशीबी एक रस्ता पण ठिकाणे दोन टोकांना
मला इकडे तुला तिकडे निघत गाठायचे आहे
वा वा वा!
मस्त शेर !
नशीबी एक रस्ता पण ठिकाणे दोन
नशीबी एक रस्ता पण ठिकाणे दोन टोकांना
मला इकडे तुला तिकडे निघत गाठायचे आहे
चांगला शेर. चांगली गझल.
बेफि +१
बेफि +१
संपूर्ण गझलेमुळे जणू ती
संपूर्ण गझलेमुळे जणू ती चित्रे सहजतेच्या सूत्रात गोवली गेली. अभिनंदन वैभव.
<<जिणे निष्पर्ण झाडागत...मला बहरायचे आहे>>
<<शिवाराचा दुकाळी हिरवळीचा हट्ट ; माझाही....>>
अशा ओळींच्या मध्ये घेतलेल्या ठेहरावांमुळे एक हवेसे ठाशीवपण आलेय रचनेत.
सुप्रियातै , मुटेसर , शामजी,
सुप्रियातै , मुटेसर , शामजी, भारतीताई खूप खूप धन्यवाद
नशीबी एक रस्ता पण ठिकाणे दोन
नशीबी एक रस्ता पण ठिकाणे दोन टोकांना
.. भावला हा शेर.!
पूर्ण गझल आवडली.
धन्यवाद खुरसाले साहेब असेच
धन्यवाद खुरसाले साहेब असेच मार्गदर्शन करीत रहावे व माझा हुरूप वाढवत रहावा ही विनंती

Ugach lajvu nakaa aamhala..
Ugach lajvu nakaa aamhala..
शिवाराचा दुकाळी हिरवळीचा हट्ट
शिवाराचा दुकाळी हिरवळीचा हट्ट ; माझाही....
जरी आडात ना पाणी मला शेंदायचे आहे
>>>
वाह!
गझल चांगली
गझल चांगली आहे.
शिक्षणाबद्दलच्या शेराची कल्पना आवडली. विचार आवडले. र्हस्व दीर्घात जरा अडखळल्यासारखे झाले पण शेर आवडला
शेवटचा शेर विशेष आवडला - ज्याला कोणताही अंत नाही अशा एका पसार्यात तुम्हाला विठ्ठल दिसावा हे विशेष व खूप वेगळे.
( तस्वीर तरही ही कल्पना चांगली आहे. याबद्दल खूप बारकाईने वाचलेले नाही पण एक मात्र सांगू इच्छितो की चित्रांवरून गझल अशी असावी की उद्या काही कारणास्तव चित्रे डिलीट झाली तरिही एक स्वतंत्र गझल म्हणून ह्या गझलांचे अस्तीत्व रहायलाच हवे. चित्रांवरून कल्पना/ खयाल घेतले आहेत हे योग्य परंतु शेरांचा अर्थ ज्याला ही चित्रे माहीत नाहीत त्यालाही भावला पाहिजे. वरील गझलेतील आड/ शेंदायचे हा क्र. २ चा शेर सोडल्यास बाकी सर्व शेर चित्रे बाजूला केल्यावरही आपले अस्तीत्व राखतील असे वाटते.
( मुळात हा प्रतिसाद अन्य एका गझलेवर दिला होता . तिथे चर्चा थांबवण्यात आली आहे असा मेसेज आल्याने त्यातील थोडा भाग इथे लिहिला आहे)
वैभवराव, सुन्दर गझल, सुन्दर
वैभवराव, सुन्दर गझल, सुन्दर खयाल. संपूर्ण गझल आवडली.
खुरसाले ,टण्या, निशिकांत काका
खुरसाले ,टण्या, निशिकांत काका खूप खूप धन्स
गझलूमिया विशेष आभार
क्र. २ चा शेर सोडल्यास बाकी सर्व शेर चित्रे बाजूला केल्यावरही आपले अस्तीत्व राखतील असे वाटते.>>>>>> नाही पटले!! सविस्तर नंतर बोलीन नाहीतर विपूमधून
शेवटचा शेर . . . क्या बात है
शेवटचा शेर . . . क्या बात है ! खूपच आवडला.
इतर शेरही आवडले.
मतल्याचा पहिला मिसरा मस्त.
फुलोऱ्याच्या तळ्यामध्ये मला डुंबायचे आहे
हा मिसरा फार विशेष वाटला नाही किंवा त्याचा चित्राशी संबंधही विशेष जाणवला नाही.
फुलोऱ्यांचे तळे ही प्रतिमा आभाळासाठी असावी बहुतेक.
छान.
छान.
गझल आवडली. शेवटचा शेर विशेष
गझल आवडली. शेवटचा शेर विशेष आवडला
मासरूळकर, उमेशजी , प्रसाद्जी
मासरूळकर, उमेशजी , प्रसाद्जी धन्यवाद
(No subject)
एकंदरीत काव्य कमी जाणवले. मला
एकंदरीत काव्य कमी जाणवले.
मला हे माहिती नव्हते शिकवताना तुम्ही बाई
उद्या आयुष्य ह्याच्यातुन मला घडवायचे आहे
ह्यात तर फारच. पण तुमच्या वाचकांचा लेखणीवर विश्वास आहे, ह्याची खात्री बाळगा.
खरा वाचक+१
खरा वाचक+१
खरा वाचक व कणीस धन्यवाद काव्य
खरा वाचक व कणीस धन्यवाद
काव्य कमी जाणवले.>>>>>>
शाळेच्या शेराबाबत तुमच्या मुद्द्याशी काहीसा सहमत पण बाकीच्या नाही असो काव्य जरा कमी जाणवले असेल तर त्यातही मला आनंद आहे
निदान त्यातला खयालाचा चांगला आहे माझ्या मते
शेरातले माझे म्हणणे तुमच्यापर्यंत पोचले यातच मी श्रेय मानतो (चालेल ना?)
माझा एक सुटा शेर आठवला.................
जमीन माझी गझलेची मी काव्यमळा का फुलवू
तुझ्याएवढे मोठे माझे अंगण नाही ना रे
नवाच एक कुणीतरी तुमचे आभार मानायची मला गरज वाटत नाही (फक्त एक स्मायली दिलात तुम्ही काय देवपूरकर आहात काय नुसते स्मायली द्यायला??)........तरीही धन्यवाद
धन्यवाद लोभ असूद्या
सहजसुंदर!
सहजसुंदर!:)
वॉव....मस्त
वॉव....मस्त