Submitted by बेफ़िकीर on 13 February, 2013 - 05:43
खोळंबुनी सागरकिनारी वृक्षसुद्धा वाळतो
पण मी तुला भेटायचो ती वेळ अजुनी पाळतो
थोडेतरी पाणी दिसो विहिरीत यासाठी म्हणे
डोकावुनी तो आतमध्ये दोन अश्रू ढाळतो
सुटणार आता हात अन् होणार वाटा वेगळ्या
सांभाळ तू आता तुला मीही मला सांभाळतो
निर्व्याजतेवरती किती जमलेत थर कळते तिथे
शाळा बघितली की कुणी माझ्यातला ओशाळतो
घनगर्द आभाळात हे पैसे कुणाचे सांडले
रात्री भिकार्यासारखा मी चांदण्या न्याहाळतो
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली तरही..
आवडली तरही..
मस्तच, अगदी तंतोतंत
मस्तच, अगदी तंतोतंत खयाल.
सुटणार आता हात अन् होणार वाटा वेगळ्या
सांभाळ तू आता तुला मीही मला सांभाळतो>> व्वा
घनगर्द आभाळात हे पैसे कुणाचे सांडले
रात्री भिकार्यासारखा मी चांदण्या न्याहाळतो>> मस्त
खुपच छान. चित्रांमधील भावना
खुपच छान. चित्रांमधील भावना तंतोतंत व्यक्त झाल्यात.
भन्नाट झाली आहे तरही सगळे शेर
भन्नाट झाली आहे तरही
सगळे शेर आवडले
निर्व्याजतेवरती किती जमलेत थर
निर्व्याजतेवरती किती जमलेत थर कळते तिथे
शाळा बघितली की कुणी माझ्यातला ओशाळतो
मस्त झालीय गझल.
छान
छान
मस्त खयाल, छान शेर. विहीर आणि
मस्त खयाल, छान शेर.
विहीर आणि शाळा हे शेर अधिक आवडले.
मस्त गझल. (एक सांभाळण्याचा
मस्त गझल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
)
(एक सांभाळण्याचा शेरच त्यातल्या त्यात सपक वाटला.
तसंच 'तस्वीर तरही' म्हणजे काय ते तुम्ही दिलेली लिंक बघून आत्ता कळलं मला. मस्त कल्पना.
मस्त!!
मस्त!!
वा वा! सगळे खयाल
वा वा! सगळे खयाल समर्पक!
मतला,
सांभाळतो, न्याहाळतो अफलातून .
-सुप्रिया.
shala lai bhari.
shala lai bhari.
मस्तच!
मस्तच!
(No subject)
खत्तरनाक!! सोल्लिड!!
खत्तरनाक!! सोल्लिड!!
अशी असावी तस्वीर तरही....
अशी असावी तस्वीर तरही.... हॅट्स ऑफ बेफी.
सुंदरच!!! कमीअधीक सगळेच शेर
सुंदरच!!!
कमीअधीक सगळेच शेर आवडले
शाळा तर अफाटच!!
सर्वच शेर चांगले. मात्र
सर्वच शेर चांगले.
मात्र मला
थोडेतरी पाणी दिसो विहिरीत यासाठी म्हणे
डोकावुनी तो आतमध्ये दोन अश्रू ढाळतो
हाच जास्त आवडला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाळेबद्दलचा शेर नीटसा समजला
शाळेबद्दलचा शेर नीटसा समजला नाही. बाकी सर्व शेर छान. `तस्वीर' हरवली तरिही शेरांचा अर्थ लागतोय.
वाटा वेगळ्या होणे/ सांभाळणे विशेष आवडला
वाह! क्या बात है !!
वाह! क्या बात है !!
सुरेख गझल
सुरेख गझल
जबरदस्त गझल !
जबरदस्त गझल !
फार मस्त आहे गझल बेफिकीर.
फार मस्त आहे गझल बेफिकीर. तुमच्या गझलेच्या ओळी एकदा वाचून पण तशाच्या तशा आठवतात नंतर. This is called impact.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थोडेतरी पाणी दिसो विहिरीत
थोडेतरी पाणी दिसो विहिरीत यासाठी म्हणे
डोकावुनी तो आतमध्ये दोन अश्रू ढाळतो out of........... just grt
ethe mi baryach jananchya (तस्वीर - तरही) ya heading khali post kelelya gazal pahate aahe ,ya grp var je upakram ghetale jatat tyachi nemaki kuthe mahiti milate he kalel ka? mhanje sahbhag dyayla sop hoil
योगीता... कृपया हा धागा
योगीता... कृपया हा धागा पहावा.
http://www.maayboli.com/node/21656
धन्यवाद लोकहो
धन्यवाद लोकहो
खोळंबुनी सागरकिनारी
खोळंबुनी सागरकिनारी वृक्षसुद्धा वाळतो
पण मी तुला भेटायचो ती वेळ अजुनी पाळतो
छान मतला!
थोडेतरी पाणी दिसो विहिरीत यासाठी म्हणे
डोकावुनी तो आतमध्ये दोन अश्रू ढाळतो
अप्रतिम, अलौकिक शेर!
सुटणार आता हात अन् होणार वाटा वेगळ्या
सांभाळ तू आता तुला मीही मला सांभाळतो
सुंदर, वास्तववादी शेर!
घनगर्द आभाळात हे पैसे कुणाचे सांडले
रात्री भिकार्यासारखा मी चांदण्या न्याहाळतो
चकीत करणारा कल्पनाविलास व निरीक्षण!