पत्र! दोनच शब्द, आठवणींच्या झुल्यावर नेऊन बसवणारे. पण आजच्या ईमेल आणि मोबाईलच्या जमान्यात पत्रलेखन मागेच पडले आहे. आपण लहान असताना पत्र लिहायची 'पद्धत' होती आणि त्या पद्धतीतही तिची तिची एक गंमत होती. त्याच गंमतीचा अनुभव आपण आपल्या मुलांनाही देऊया का?
'मराठी भाषा दिवस, २०१३'च्या निमित्ताने आजीआजोबा आणि त्यांच्या प्रिय नातवंडांमध्ये बांधूया एक गोड पूल.. आपल्या पाल्यांना त्यांच्या आजी-आजोबांना पत्र लिहायचे आहे, कोणत्याही विषयावर, कितीही लांबलचक..
या उपक्रमाचे काही नियम :
१) या उपक्रमामध्ये केवळ मायबोलीकरांचेच पाल्य सहभाग घेऊ शकतील.
२) पाल्याचे वय ७च्या पुढे आणि १८ वर्षांपर्यंत असावे.
३) पाल्याने मराठीत, स्वतःच्या हस्ताक्षरात आपल्या आजी-आजोबांना पत्र लिहायचे आहे. पालक त्यांना मार्गदर्शन करू शकतात. पण शक्यतो मूळ कल्पना, ढाचा पाल्याचा असावा.
४) पत्रलेखनासाठी विषयाचे बंधन नाही.
५) पत्र लिहून झाल्यावर त्याची स्कॅन केलेली प्रत, अथवा त्याचे छायाचित्र sanyojak@maayboli.com या ईपत्त्यावर दिनांक २४ फेब्रुवारी २०१३ पर्यंत पाठवावे. विषयामध्ये 'सा.न.वि.वि' असं नमूद करायचे आहे.
६) ईमेलमध्ये आपला मायबोली आयडी, आपले नाव, आपल्या पाल्याचं नाव आणि त्याचं वय लिहावे.
वि.सू : साधारणपणे वय वर्ष सातच्या पुढची मुलं 'स्वतःच्या हाताने' पत्र लिहू शकतात, असं गृहीत धरलं आहे. आपल्या पाल्याचं वय यापेक्षा कमी आहे, तरीही त्याला मराठीत लिहिता येतं आणि असं पत्र लिहायची इच्छा असेल, तर त्याचे स्वागतच आहे.
आमच्या छोट्या दोस्तांच्या पत्रांची वाट पाहतो आहोत!
संयोजक, प्रवेशिका मिळाली का?
संयोजक, प्रवेशिका मिळाली का? काल रात्री पाठवली.
Pages