मराठी भाषा दिवस २०१३ - लहान मुलांसाठी कार्यक्रम - सा. न. वि. वि.

Submitted by संयोजक on 13 February, 2013 - 02:26

sa_na__vi__vi.jpg

पत्र! दोनच शब्द, आठवणींच्या झुल्यावर नेऊन बसवणारे. पण आजच्या ईमेल आणि मोबाईलच्या जमान्यात पत्रलेखन मागेच पडले आहे. आपण लहान असताना पत्र लिहायची 'पद्धत' होती आणि त्या पद्धतीतही तिची तिची एक गंमत होती. त्याच गंमतीचा अनुभव आपण आपल्या मुलांनाही देऊया का?

'मराठी भाषा दिवस, २०१३'च्या निमित्ताने आजीआजोबा आणि त्यांच्या प्रिय नातवंडांमध्ये बांधूया एक गोड पूल.. आपल्या पाल्यांना त्यांच्या आजी-आजोबांना पत्र लिहायचे आहे, कोणत्याही विषयावर, कितीही लांबलचक..

या उपक्रमाचे काही नियम :
१) या उपक्रमामध्ये केवळ मायबोलीकरांचेच पाल्य सहभाग घेऊ शकतील.
२) पाल्याचे वय ७च्या पुढे आणि १८ वर्षांपर्यंत असावे.
३) पाल्याने मराठीत, स्वतःच्या हस्ताक्षरात आपल्या आजी-आजोबांना पत्र लिहायचे आहे. पालक त्यांना मार्गदर्शन करू शकतात. पण शक्यतो मूळ कल्पना, ढाचा पाल्याचा असावा.
४) पत्रलेखनासाठी विषयाचे बंधन नाही.
५) पत्र लिहून झाल्यावर त्याची स्कॅन केलेली प्रत, अथवा त्याचे छायाचित्र sanyojak@maayboli.com या ईपत्त्यावर दिनांक २४ फेब्रुवारी २०१३ पर्यंत पाठवावे. विषयामध्ये 'सा.न.वि.वि' असं नमूद करायचे आहे.
६) ईमेलमध्ये आपला मायबोली आयडी, आपले नाव, आपल्या पाल्याचं नाव आणि त्याचं वय लिहावे.

वि.सू : साधारणपणे वय वर्ष सातच्या पुढची मुलं 'स्वतःच्या हाताने' पत्र लिहू शकतात, असं गृहीत धरलं आहे. आपल्या पाल्याचं वय यापेक्षा कमी आहे, तरीही त्याला मराठीत लिहिता येतं आणि असं पत्र लिहायची इच्छा असेल, तर त्याचे स्वागतच आहे.

आमच्या छोट्या दोस्तांच्या पत्रांची वाट पाहतो आहोत!

रैना, +१!

आत्ताच लेकीला वरील माहिती वाचुन दाखवली. तिचा पहिला प्रश्न, 'मला तर मराठी लिहीता येत नाही! मी काय करु?'

'सा. न. वि. वि.' या कार्यक्रमामागचा मुख्य उद्देश मुलांची 'मराठी लेखनाशी ओळख व्हावी, नाळ जुळावी' असा आहे. परदेशातल्याच काय, भारतातही इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या लहान वयाच्या मुलांसाठी 'मराठी पत्रलेखन' अवघड आहे हे मान्य आहे. तरीही, पालकांच्या प्रोत्साहनामुळे ती किमान 'नक्कल' तरी उतरवू शकतात असे निरीक्षण आहे आणि खात्रीही आहे. पत्रलेखन असले तरी पानभर लिहायला हवे असे नाही, अगदी दोन किंवा चार ओळींचं पत्रदेखील चालेल. आपण सर्वांनीच मुलांची ती क्षमता जोखून पहावी असे वाटते.

@ मी नताशा, एकापेक्षा अधिक प्रवेशिका चालतील.

@पियापेटी, तुमच्या दीर अथवा जावेला, किंवा दोघांनाही मायबोलीचे सदस्यत्व घेण्यास मदत करा. तुमच्या पुतणीची प्रवेशिका तिच्या पालकांमार्फत येऊ दे Happy

@deepac73, तुमच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मायबोलीचे सदस्यत्व घेण्यास मदत करा. तुमच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशिका त्यांच्या पालकांमार्फत येऊ दे Happy

@ संयोजक,

<<<<पत्र लिहून झाल्यावर त्याची स्कॅन केलेली प्रत, अथवा त्याचे छायाचित्र sanyojak@maayaboli.com या ईपत्त्यावर दिनांक २२ फेब्रुवारी २०१३ पर्यंत पाठवावे.>>>>

इथला पत्ता दुरुस्त कराल का? ते maayaboli झालय.
मी काल कॉपी पेस्ट केला पत्ता तर मेल परत आल> तेव्हा नीट पाहिलं.

आज परत नीट पत्त्यावर मेल पाठवली आहे कृपया पोचपावती द्याल का?

मी लिहिलेलं लेकाने गिरवलं अशी प्रवेशिका तयार आहे. चालणार असेल तर पाठवेन. पत्र त्याने स्वतःच्या मनाने इंग्रजीत लिहिलं होतं. त्याचं मी भाषांतर केलं आणि मराठीत/देवनागरीत लिहिलं.

सावली, पाल्याचं वय ७ पेक्षा कमी असेल, तरीही त्याला मराठीत लिहिता येतं आणि असं पत्र लिहायची इच्छा असेल, तर त्याचे स्वागतच आहे.

तुमच्या मुलीच्या प्रवेशिकेचे स्वागत आहे.

धन्यवाद! लेकीने लिहायला सुरुवात केली आहे पण अजुन फक्त मायना लिहून झालाय. आता तिच्या मागे लागते!

प्रवेशिका पाठवली आहे. मी छायाचित्र पाठवले आहे. मूळ प्रत रिसाईझ करुनच पाठवली पण तीही मोठी होत असल्यास कळवावे. मी परत पाठवेन Happy

संयोजक,
माझ्या मुलीने लिहिलेल्या पत्राचा फोटो पाठवला आहे. तिनी ते पेन्सिलने लिहील्यामुळे जर स्पष्ट दिसत नसेल तर पेननी ट्रेस करुन पून्हा पाठवते. तिनी आधी इंग्लीश स्पेलींग्स वापरुन मराठी पत्र लिहीले ते पण पाठवले आहे.
धन्यवाद.

प्राजक्ता

प्रवेशिका पाठवली आहे! न मिळाल्यास/ फाईल उघडण्यात काही अडचण असल्यास कळवा. परत पाठवेन.

Pages