....................नृत्य ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून आलेल्या आजपर्यंतच्या चित्रपटांतला मला एकही आता आठवत नाहीये. पण काल पाहिलेल्या 'रेमो डिसुझा' दिग्दर्शित, त्याच्याच डोक्यातनं आलेल्या कथेवर आधारीत, आणि प्रभू देवा (भारतीय मायकल जॅक्सन), गणेश आचार्य, केके मेनन, तसेच डान्स इंडीया डान्स या प्लॅटफॉर्ममुळे बर्याच लोकांना माहित असणार्या/नसणार्याही सर्वच्या सर्व नृत्य कलाकारांना घेऊन बनवलेल्या या चित्रपटाची खासियत म्हणजे केवळ आणि केवळ नृत्य. हा चित्रपट पाहतांना, मला पहिल्यांदाच; नृत्य हे ही स्वत:ला अभिव्यक्त करण्याचं अत्यंत प्रबळ माध्यम आहे असं प्रकर्षानं जाणवलं. (म्हणजे लेखन, वक्तृत्व, संगीत-निर्माण, अभिनय आणि अशा बर्याच गोष्टी ज्यांमधून आपण आपलं भान हरपून एका वेगळ्या स्तरावर स्वतःला अनुभवतो तसंच ह्या नृत्य करणार्या सर्वच्या सर्व कलाकारांना पाहून वाटतं.)
....................चित्रपट अगदी साधा, आणि तद्दन बॉलीवूडच्या कालबाह्य प्रथांयुक्त कथेवर बनवला आहे. पण ती कथा ह्या चित्रपटाला केवळ ट्रॅकवर ठेवण्याचे काम करते. आणि आपण आनंद घेतो, ते समुहनृत्यांच्या वेगवान हालचालींचा. माझ्याच किंवा माझ्याहूनही लहान वयाच्या नृत्यकलाकारांच्या अतिशय सुंदर आणि मेहनत घेऊन केलेल्या स्टेप्सचा. चित्रपट 'स्टेप अप' या इंग्रजी चित्रपट मालिकेसारखा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं पदोपदी जाणवतं. पण त्यात कुठलीही तुलना होत नाही, कारण चित्रपट वेगाने पुढे सरकत जातो. संगीत अर्थातच पाय थिरकतील असंच असणं गरजेचं होतं, सो ते तितकं स्पष्ट आणि लाऊड ठेवणंही ओघानं आलंच. पण त्याचबरोबर, ते श्रवणीयही आहेच. म्हणजे चित्रपटगृहात ते तो 'फील' निर्माण करतं. चित्रपटाच्या कथेनुसार 'एनी बडी कॅन डान्स' यातलं 'एनी बडी कॅन'च्या पुढे; डान्स चांगला येत असेल तर, 'विन' हा शब्द लावणं जास्त योग्य ठरतं. कारण 'एबीसीडी' मध्ये कुणालाही अगदी शुन्यापासून डान्स शिकवला नाहिये, तर उपजत उत्तम नाचू शकणार्या तरुणांना योग्य मार्गदर्शन देऊन, त्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी (आणि त्यातला रिअॅलिटी शो जिंकण्यासाठी) तयार करवून घेतलं आहे.
....................मी हा चित्रपट थ्री डी मध्ये पाहिला. तो तसा नसता तरीही चाललं असतं. पण काही ठिकाणी डान्सव्यतिरीक्त इतर गोष्टी म्हणजे प्रॉप्स हायलाईट करण्यासाठी, काही इफेक्ट्सपुरतं ते छान वाटलं. बाकी थ्री डी पहावं असा हा काही 'अवतार', किंवा 'अॅलिस इन वंडरलँड नाही'. प्रभू देवाचं हिंदी 'अरे देवा' असं आहे, आणि गणेश आचार्यचं बोलणं थोडं इरीटेट करतं, आणि केके मेनन व्हिलनचे रोल करून कंटाळला आहे असं वाटतं. बाकी सगळे कलाकार आपापल्या ठिकाणी ओके ओके.
....................राहिलं चित्रपटाच्या कथेबद्दल, तर रिअॅलिटी शोची रिअॅलिटी, केके मेननचा व्हिलन, प्रभू देवाचा नृत्यावर जीवापाड प्रेम करणारा शिक्षक, गणेश आचार्यचा जीवलग मित्र, आणि नृत्याची आवड असलेली परंतू विपरीत परिस्थितीत जन्माला आल्यानं; नृत्याला घरच्यांचा विरोध असल्यानं आणि तरीही नृत्यामुळे आयुष्यात मोठं होण्याची स्वप्ने पाहणारी तरूणाई धर्मेश, सलमान, मयुरेश आणि अजून बर्याच चेहेर्यांनी व्यवस्थित साकारली आहे. एकामागून एक नृत्यांचा धडाका असला तरी प्रत्येक नृत्य पाहण्यासारखं. कुठेच अती होतंय असं वाटंत नाही. (उलट मध्ये-मध्ये येणारा कथेचा ओघ, संवादफेक अती होते असं सुरूवातीपासून वाटतं). पण चाळीशीजवळ पोचलेला प्रभु देवा, एका ठिकाणी (एक्स्पेक्टेडली) (चित्रपटात) अचानक येऊन, सगळ्यांना तोंडात बोटं घालायला लावणारा डान्स करतो.
....................चांगला प्रयत्न आहे हा. मुळ गोष्टं दाखवायची आहे ती म्हणजे नृत्य-नृत्य आणि नृत्य, जी या चित्रपटात कुठेच सुटत नाही. आणि ज्यांना असा वेगवान प्रकार आवडतो, त्यांच्यासाठी हा चित्रपट नक्कीच पाहणेबल आहे. नृत्य करणार्यांसाठी गणपती उत्सव ही पर्वणी असते. या चित्रपटात ती पर्वणी साधून घेतली आहे. त्यावेळचं गणपती बाप्पांवरचं गाणं, शंकर महादेवनच्या आवाजातलं, मस्त आहे. शेवटचा डान्स सुद्धा गणपती बाप्पाचं नाव घेत होतो, आणि तो गजर खूप छान वाटतो. एकदा पहायला काहीच हरकत नाही. मला आवडला हा चित्रपट.
डान्सची भन्नाट एबीसीडी...
Submitted by हर्षल_चव्हाण on 11 February, 2013 - 09:02
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असा केवळ नृत्यावर बेतलेला
असा केवळ नृत्यावर बेतलेला झनक झनक पायल बाजे नंतरचा पहिलाच चित्रपट असावा. बघायलाच हवा.
छान आहे.......किमान एकदा तरी
छान आहे.......किमान एकदा तरी बघावाच.........अभिनयाची अपेक्षा न ठेवता फक्त दर्जेदार नृत्य पहायला मिळेल या आशेने जावे...
डांस इंडीया डांस अगदी सुरुवाती पासुन बघत आलेलो त्यामुळे इथल्या बहुतेक सर्वच मुलांना ओळखतो..त्यांचे डांस स्टाईल कोणकोणत्या फेमस आहेत.. बघायला मजा आली..
चित्रपटात डांस डांस आणि डांस व्यक्तिरिक्त अजुन काहीही नाही....एक एक डांस भन्नाट आहे...
धर्मेश, सलमान आणि लॉरेन हे मुख्य डांसर म्हणुन आहे
लॉरेन ही परदेशी मुलीने जबरद्स्त नाच केलेला आहे...बॅले, अरेबिक, लॅटीन, आणि शेवटी आपला देशी नाच... सगळेच डांस मस्त केले
प्रत्येक डांसर ना आपापला नाच दाखवण्याची योग्य ती जागा दिलेली आहे...
धर्मेश, सलमान. लॉरेन, पुनित, भावना, मयुरेश, वृषाली, या सगळ्यांनी आपापल्या डांस मधले जे जे स्ट्रॉन्ग पॉईंट्स आहेत ते दाखवण्यासाठी जीव तोडुन मेहनत केलेली आहे
फक्त प्रिंस आणि एक साउथ वाला ......ज्यांचा नाच आला नाही...:(
.
बाकी प्रभुदेवाला "भारतीय माय का लाल जॅक्सन" का म्हणतात ..;). याचे उत्तर त्याच्या डांस मधुन मिळते.
.
.
शेवटचा गणपती नाच तर सर्वात हायलाईट आहे..........
छान लिहिलंय असा केवळ
छान लिहिलंय
असा केवळ नृत्यावर बेतलेला झनक झनक पायल बाजे नंतरचा पहिलाच चित्रपट असावा>>>>दिनेशदा, अजुन एक "जल बिन मछली, नृत्य बिन बिजली"
उद्य>>>+१
डान्स के लिए सबकुछ !
डान्स के लिए सबकुछ ! पाहणारच..
दिनेशदा, यो.रॉक्स : नक्की पहा
दिनेशदा, यो.रॉक्स : नक्की पहा
उदयन : तू थ्री डी पाहिलास की टू डी?
धन्स जिप्सी
मला आवडला. छान आहे. सगळेच
मला आवडला. छान आहे. सगळेच डान्स अप्रतिम आणि दर्जेदार. शेवट जास्त आवडला.
धर्मेश फेवरीटच आहे. बाकीही मस्तच.
कथा तीच ती घिसिपिटि असली तरी डान्समुळे एक वेगळाच ट्रॅक वेगळाच फील वेगळाच फ्लो आहे.
प्रभु देवाचे हिंदी>>>>>>>>> अरे तो तसाही म्हणजे चित्रपटातही चेन्नई हुन आलेलाच दाखवलाय. सो ठीकाय.
हो आणि ३ डी च पहावा
हो आणि ३ डी च पहावा
मस्त रे मित्रा, सुन्दर लिहिले
मस्त रे मित्रा, सुन्दर लिहिले आहेस.
परीक्षण छान, पहायचा आहेच हा
परीक्षण छान, पहायचा आहेच हा चित्रपट.
नृत्य ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून आलेल्या आजपर्यंतच्या चित्रपटांतला मला एकही आता आठवत नाहीये>>> माधुरी दिक्षितचा आजा नचले पाहिला होतात का? पाहिला असता तर तो आठवला असता चटकन. त्यामधे मध्यंतरानंतर जवळजवळ तासभर लैलामजनू वर आधारित नृत्यनाटिका दाखवली आहे. चित्रपटाच्या सुरूवातीचा माधुरी दिक्षितच्या प्रेमकहाणीचा भाग सोडला तर पूर्ण चित्रपट नृत्यावरच आधारित आहे. (हा चित्रपट कुठल्यातरी स्पॅनिश चित्रपटाची नक्कल आहे म्हणे!!) पण मला तरी आजा नचले खूप आवडला होता. खासकरून त्यामधले विनय पाठक, कुणाल कपूर आणि कोंकणा सेनचं काम मस्त होतं.
येस सस्मित नंदिनी : धन्स मी
येस सस्मित
नंदिनी : धन्स मी 'आजा नचले' एकदाही पूर्ण नाही पाहिला, त्यामुळे लिहितांना नाही आठवला.
उत्सुकता आहे या सिनेमा बद्दल
उत्सुकता आहे या सिनेमा बद्दल !
रेमो डिसुझा , डान्स इंडीया डान्स चे स्पर्ध़क , प्रभुदेवा ,केके मेनन या सगळ्यां साठी नक्की बघणार !
डान्स वर आधरीत बाकी अजुनही आहेत सिनेमे!
सर्वात लक्षात राहिला तो सुधा चन्द्रन चा ' नाचे मयुरी' !
मिथुन चे पण आले होते डिस्को डान्सर , डान्स डान्स इ.
मराठीतला आयना का बायना आठवला.
मराठीतला आयना का बायना आठवला. रीअॅलिटी शो, स्वतःला प्रुव्ह/एक्स्प्रेस करण्यासाठी नॄत्याचे माध्यम वै साधर्म्य वाटले.
परीक्षण छान मलाही हा सिनेमा बघायची इच्छा आहे.
पेपरमधे परिक्षण चांगले आले
पेपरमधे परिक्षण चांगले आले नव्हते म्हणून पहाणार नव्हते. आता पहावे म्हणते. तशीही लेक मागे लागलीच आहे.
डीजे, येस्स. पोस्ट टाकल्यावर
डीजे, येस्स. पोस्ट टाकल्यावर मलापण लगेच "नाचे मयुरी" आठवला.
दीपांजली : नाचे मयुरी माझ्या
दीपांजली : नाचे मयुरी माझ्या जन्माआधीचा आहे
चिंगी : धन्स आयना का बायनाचीही फक्त थीम माहिती होती. पाहिला नाही.
नताशा : पहा नक्की
परिक्षण वाचून हॉलीवूडच्या
परिक्षण वाचून हॉलीवूडच्या "शॅल वी डान्स "[ जेनीफर लोपेझ ]ची आठवण झाली.
'आजा नच ले' मलाही आवडला होता.
'आजा नच ले' मलाही आवडला होता.
आजा नचले मलाही आवडला होता या
आजा नचले मलाही आवडला होता
या सिनेमाबद्दल अनेकांकडून ऐकलय
पहाणारच
भाऊ, ललिता रिया : पहा नक्की
भाऊ, ललिता
रिया : पहा नक्की
श्या, आमच्या जवळच्या
श्या, आमच्या जवळच्या चित्रपटगृहात हा सिनेमा तमिळमधूनच लागलाय.
आमच्या जवळच्या चित्रपटगृहात
आमच्या जवळच्या चित्रपटगृहात हा सिनेमा तमिळमधूनच लागलाय>>>>>>>> जर दुसरा म्हणजे हिंदीचा ऑप्शन नसेल तर जाउन बघ तामिळ वालाच. कारण डान्स तर तामिळ नसतील ना आणि स्टोरीची आयडीया तुला येइलच एकंदर चित्रपट बघताना.
फक्त डान्स च बघा.......( असे
फक्त डान्स च बघा.......( असे ही बाकी चित्रपटात लॉरेन सोडल्यास काही बघण्यासारखे नाही आहे
फक्त डान्स च बघा...... >>>
फक्त डान्स च बघा...... >>> +१
मीही थ्रीडी मध्ये पाहीला.
एकदा बघणेबल आहे.
प्रभुदेवचाच याच प्रकारचा साउथ मध्ये एक शिनेमा आहे डान्सवर. तो कॉपी पेस्ट केला असता तरी यापेक्षा छान चित्रपट बनला असता.
मलाही आवडला. धर्मेश नी सलमान
मलाही आवडला. धर्मेश नी सलमान तसेही पहिल्यापासून, म्हणजे त्यांच्या पहिल्या राउंडपासून आवडतात. सिनेमागृहात लोक जोरजोरात किंचाळून आनंद घेत होते. पण सगळ्यात भारी कमेंट म्हणजे - किती पण काय पण शिका, शेवटी गणपती डांसच कामी येतो
काल तमिळमधूनच पाहिला. कदल आणी
काल तमिळमधूनच पाहिला. कदल आणी विश्वरूपम दोन्हीची तिकीटं मिळाली नाहीत. भाषा समजत नसल्याने संवाद समजाय्चा प्रश्नच नव्हता. पण डान्सनी मात्र अगदी डोळ्याचं पारणं फेडलं. सलमान तर मला आधीपासून आवडायचा, आता अजून आवडायला लागला.