कुंद

Submitted by अवल on 7 February, 2013 - 23:42

ही भाराने वाकलेली वेल

DSC_0813.jpg

थोडा भार हलका केला Happy

DSC_0814.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याही गच्चीवरील मातीविरहित जैविक बागेत मी एक कुंडाचे रोप लावले होते. ते बहरले असतांना आलेल्या फुलांचा एक फोटो मी येथे देत आहे.
 कुंदाची फुले 25.jpg

अवले, तु आणि दक्षीने मला खुन्नस दिलीये.. कुंदाच्या वेलीचे फोटो टाकुन!!
परवा शनी-रवी मी दिवस्-दिवसभर घाम गाळुन, कुदळ्/फावडे/ खुरपे/ थापी/ स्क्रुड्रायव्हर असं जे मिळेल त्याने कुंड्या/ बाग उकरुन काढली. आणी तिथे अक्षरशः ७-८ घमेल्यांनी चांगली माती आणुन टाकली. नवीन नविन रोपं आणुन लावलीयेत बागेत. आता बघ माझीही झाडं बहरतील. Happy

मस्त ..........

आता बघ माझीही झाडं बहरतील. > मि घाईत आता बघ माझीही हाड बहरतील असे वाचले..:) Happy :

अवल, प्रमोदजी>>>> छान बहरलाय कुंद तुमच्या घरी... प्रचितुन सुद्धा सुगंध जाणवतोय.

मि घाईत आता बघ माझीही हाड बहरतील असे वाचले>>>>> Rofl सृष्टे, कठीण आहेस बाई... पक्की मुंबईकरीण आहेस, सदैव घाईत. काल पण असच घाईत भलतच टायपल होतस.. सांगु का काय टायपलस ते?? Wink

आर्ये नव्याची नवलाई नऊ दिवस नको, कायम खपावे लागते हो झाडांसाठी. Proud

अवल, कुंद सुरेख Happy माझ्याकडे वेगळ्या जातीचा आहे बहुधा, पाकळीवर लालसर छटा दिसतेय तशी माझ्याकडच्या कुंदावर नाहिये.

मला फोटो दिसत नाहीत Sad

कुंद शीर्षक वाचुन पुण्यातल्या कुंद हवेचे फोटो आहेत की काय असे वाटलेले... आणि म्हणुनच मला फोटो दिसत नाहीत बहुतेक Sad Sad

पण स्त्रीलिंगी कुंदाला इथल्या मंडळींनी पुल्लिंगी कुंद का बरे केलाय??

(मुळात फोटोच दिसत नसल्याने असले भाष्य करणे हा मुर्खपणा पण पक्की माबोकर असल्याने मी प्रत्येक विषयात पिएचडी केली असणारच असा मी स्वतःबद्दल ग्रह करुन घेतलेला आहे आहे त्यामुळे असल्या शंका काढणे मला सहजशक्य आहे.... Wink )

<<मि घाईत आता बघ माझीही हाड बहरतील<< सृष्टे, काय गं हे! Rofl

<<आर्ये नव्याची नवलाई नऊ दिवस नको, कायम खपावे लागते हो झाडांसाठी<<
घ्या, जशी काय ही दक्षी रोज कुदळ फावडं घमेलं घेउन घाम गाळते, कुंड्यांमधली झाडं मेंटेन ठेवायला. Proud

दक्षिणा, तु म्हणतेस ते बरोबर आहे. मला वाटत की तु "फुल" मध्ये टाकलेला कुंद आहे आणि ही आहे चमेली.
माझं चुकलेलं असेल सुदधा. जाणकारांनी कृपया भाष्य करावे.