Submitted by वैवकु on 2 February, 2013 - 04:45
कधीच नाही गणले वास्तव कमावलेले
विणत राहिलो विरलेल्या स्वप्नांचे शेले
किती निरागस जगून गेली जुनी माणसे
जिणे आमुचे वासनांमुळे वखवखलेले
मी हसलेले कोणाला पाहवत नसावे
दिले भेट मुखवटे मला त्यांनी रडवेले
चार मुले पण खांद्याला कोणी ना आले
मग त्याचे शेजार्यापाजार्यांनी केले
तुझ्यातल्या झुंजारपणावर तगलो होतो
तू गेलिस लढते आहे जीवन मेलेले
असून अपुल्यातच नसल्यागत वावरतो तो
म्हणुन तुम्हाला असेल "तो नसतो!" पटलेले
नका बघू कावळा पिंड शिवतो की नाही
अम्ही असू आत्म्यास विठ्याला चाटवलेले
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खयाली तरही:
खयाली तरही: http://www.maayboli.com/node/21656?page=12
उत्तमोत्तम खयालांसाठी बेफीजींचे आभार
शेर क्र. २ साठी दिलेल्या मूळ खयालावमधून इथे माझ्या हातून दोन वेगवेगळे शेर क्र.२ व क्र.३ हे अनावधानाने तयार झाले आहेत क्षमस्व !..तसा प्रयत्न नव्हता
कधीच नाही गणले वास्तव
कधीच नाही गणले वास्तव कमावलेले
विणत राहिलो विरलेल्या स्वप्नांचे शेले
असून अपुल्यातच नसल्यागत वावरतो तो
म्हणुन तुम्हाला असेल "तो नसतो!" पटलेले
हे दोन आवडले.
बाकीचे छान आहेतच.
धन्स कावळेदादा !
धन्स कावळेदादा !
मी हसलेले कोणाला पाहवत
मी हसलेले कोणाला पाहवत नसावे
दिले भेट मुखवटे मला त्यांनी रडवेले
खूप सुंदर शेर !!
पण 'चार मुले..' उगाचच लिहिल्यासारखा वाटला.
वा वा.... सर्वप्रथम तरही
वा वा.... सर्वप्रथम तरही लिहिल्याबद्दल अभिनंदन वैवकु.
आता वाचते
कधीच नाही गणले वास्तव
कधीच नाही गणले वास्तव कमावलेले
विणत राहिलो विरलेल्या स्वप्नांचे शेले
किती निरागस जगून गेली जुनी माणसे
जिणे आमुचे वासनांमुळे वखवखलेले
तुझ्यातल्या झुंजारपणावर तगलो होतो
तू गेलिस लढते आहे जीवन मेलेले
असून अपुल्यातच नसल्यागत वावरतो तो
म्हणुन तुम्हाला असेल "तो नसतो!" पटलेले
हे विशेष आवडले..
मतला भन्नाट्च !
मतला भन्नाट्च !
ओ,पैला तरही मी लिवली.
ओ,पैला तरही मी लिवली.
http://www.maayboli.com/node/40705
वाह वाह! किती निरागस जगून
वाह वाह!
किती निरागस जगून गेली जुनी माणसे
जिणे आमुचे वासनांमुळे वखवखलेले
चार मुले पण खांद्याला कोणी ना आले
मग त्याचे शेजार्यापाजार्यांनी केले
तुझ्यातल्या झुंजारपणावर तगलो होतो
तू गेलिस लढते आहे जीवन मेलेले...
हे शेर आणखी चांगले होऊ शकतील.
बाकी गझल आवडली.
व्व्व्वा वैवकु सर ! मतला खूपच
व्व्व्वा वैवकु सर !
मतला खूपच भावला .
विरलेल्या स्वप्नांचे शेले ही कल्पना मनाची पकड घेते .
निरागस माणसे आणि वखवखलेलेही छानच !
तगलो होतो आणि लढते आहे हे सांगणाऱ्या शेरात जरा गडबड वाटली. तो भूतकाळात तगला होता , पण ती मेलेले जीवन लढत असताना त्याच्यावर काय परिणाम होतोय हे वैयक्तिक मला स्पष्ट झालं नाही . वै . म . कृ . गै . न .
तुम्हाला
'लढतो' आहे जीवन मेलेले
असं लिहायचं होतं काय ?
पटलेले आणि चाटवलेले लै भारी ! ! !
छानै.. मतला विशेष!
छानै.. मतला विशेष!
जितू, प्रियातै ,भारतीताई,
जितू, प्रियातै ,भारतीताई, प्राजू ,मासरूळकर ,शामजी खूप खूप धन्स
प्राजू मी विस्ताराने प्रतिसाद लिहिणार आहे जरा वेळ लागेल आता वेळ नाही आहे नंतर लिहीनच
बदलाची गरज सुचवल्याबद्दल धन्स
मासरूळकर मला सर म्हणूनका !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
(No subject)
काय काय कनवटीस होते
काय काय कनवटीस होते कमावलेले!
झुरत राहिलो मिळवाया स्वप्नांचे शेले!!
साधा, भोळा कुठे निरागस मनुष्य नाही.....
मुखवटेच दिसतात भोवती रंगवलेले!
चार मुले पण, एक नव्हे द्यावयास खांदा!
शेजा-यांनी, मग धर्माचे पालन केले!!
तूच म्यान, तलवार, ढाल जगण्याची माझ्या!
तुझ्यामुळे सावरले तारू भरकटलेले!!
दहा दिशांना त्याचा वावर असे नेहमी....
ठायी ठायी त्याचे असणे चितारलेले!
कसा कावळा या पिंडाला शिवेल माझ्या?
विठ्ठल नावानेच प्राण हे पछाडलेले!
चार मुले पण खांद्याला कोणी ना
चार मुले पण खांद्याला कोणी ना आले
मग त्याचे शेजार्यापाजार्यांनी केले
तुझ्यातल्या झुंजारपणावर तगलो होतो
तू गेलिस लढते आहे जीवन मेलेले
असून अपुल्यातच नसल्यागत वावरतो तो
म्हणुन तुम्हाला असेल "तो नसतो!" पटलेले<<< शेर आवडले. गझलही आवडली. अचूकतेबाबत तुम्ही स्वतः निवेदन केलेलेच आहेत. खयाली तरहीतील सहभागाबद्दल धन्यवाद व अभिनंदन!
प्रोफेसरांनी दिलेले पहिले चार शेर स्वच्छ व बरेचसे अचूक आशयाचे झालेले आहेत. त्यांचेही अभिनंदन!
धन्यवाद भूषणराव! खयाली
धन्यवाद भूषणराव!
खयाली गझलेवरील आमचे विचार/वै.मते व खयाली गझलेच्या मूल्यांकनाचे निकष आमच्या खयाली गझलेच्या धाग्यावर दिले आहेत, वाचाल का? आपली मते वाचायला आवडतील!
पप्रा साहेब धन्स या पर्यायी
पप्रा साहेब धन्स
या पर्यायी पेक्षा तुमची ओरीजनल खयाली तरही खूप छान आहे
बेफीजी विशेष आभार शतशः आभार !
कधीच नाही गणले वास्तव
कधीच नाही गणले वास्तव कमावलेले
विणत राहिलो विरलेल्या स्वप्नांचे शेले
मी हसलेले कोणाला पाहवत नसावे
दिले भेट मुखवटे मला त्यांनी रडवेले
दोन्ही एकदम जबरदस्त शेर..
फक्त एकच....
'दिले भेट मुखवटे मला त्यांनी रडवेले'..मध्ये
लगावली मध्ये गुणगुणण्यासाठी मुखवटे शब्दाची 'मुख' आणि 'वटे' अशी फोड करावी लागते आहे...
बाकी गझल मस्त..
शुभेच्छा..
'मुखवटे' आणि 'कावळा' हे अधिक
'मुखवटे' आणि 'कावळा' हे अधिक आवडले.
धन्स उकाका फाटक साहेब
धन्स उकाका
फाटक साहेब धन्स
अचूक निरीक्षण !! मलाही मुखवटे खटकत होता बदलाची आवश्यकता भासली होती पण प्रकर्षाने नाही
तुमचा प्रतिसाद वाचून आता सुचला आहे एक बदल
दिले मुखवटे भेट मला त्यांनी रडवेले>>>>>असे करू का ????
पुनश्च धन्स
नका बघू कावळा पिंड शिवतो की
नका बघू कावळा पिंड शिवतो की नाही
अम्ही असू आत्म्यास विठ्याला चाटवलेले
हा शेर फार आवडला.
झुंजार शेरही छान आहे.
दिले मुखवटे भेट मला त्यांनी
दिले मुखवटे भेट मला त्यांनी रडवेले>>>>>असे करू का ????
===>>>
हे परफेक्ट...
धन्यवाद...
विणत राहिलो विरलेल्या
विणत राहिलो विरलेल्या स्वप्नांचे शेले >>> वा फार सुंदर मिसरा आहे... उला पण अजून ताकदीचा हवा होता असे वाटले
असून अपुल्यातच नसल्यागत वावरतो तो
म्हणुन तुम्हाला असेल "तो नसतो!" पटलेले
नका बघू कावळा पिंड शिवतो की नाही
अम्ही असू आत्म्यास विठ्याला चाटवलेले >>> दोन्ही शेर आवडले...
खयाली तरही छान जमून आलीय
समीरजी(विठ्ठलाचा शेर
समीरजी(विठ्ठलाचा शेर आवडल्याबद्दल विशेष आभार) .... फाटक साहेब ....मिल्याशेठ खूप खूप धन्स