भूतान बद्दल माहिती हवी आहे

Submitted by भानुप्रिया on 31 January, 2013 - 04:47

नमस्कार!

जुलै १५ नंतर भूतान ला जाण्याचा विचार आहे, पण टिपिकल ट्रिप करायची नाहीये! हनीमूनसाठी जाणार आहे. आम्हा दोघांनाही टूरिस्ट टॅग असलेल्या जागा सोडून जरा ऑफ-बीट ठिकाणं बघायची आहेत. शांत निसर्ग हवा आहे, फोटोग्राफी करायची आहे, लोकल मार्केट बघायचं आहे आणि तिथली जीवनशैली जवळून अनुभवायची आहे!

कोणाला काही माहिती असेल तर प्लीज सांगा!

धन्स इन अ‍ॅड्व्हान्स!! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहिती नक्की काय हवी आहे?

मी मागे माहिती काढली होती..ती बहुधा तुम्हाला असेलच तरी...

भुतानला जायला भारतीय नागरीकांना व्हिसा लागत नाही. पासपोर्ट सुद्धा नसला तर चालतो. व्होटर्स आयडी कार्ड चालते.

भारतीय नागरीकांना कुठल्याही स्वस्त महाग हॉटेल्स मधे राहता येते पण ईतर लोकांना दर दिवशी $२०० कमीत कमी खर्च करण्याची सक्ती आहे. ( हॉटेल टुर गाईड जेवण वगैरे सगळे खर्च धरून)

त्यांच्या प्रकारचे जेवण सोडून बाकी प्रकार विशेष मिळत नाहीत असे ऐकून आहे तेव्हा बरोबर आपले पदार्थ तोंडी लावायला घेऊन जा.

टायगर्स नेस्ट मॉनेस्ट्री चुकवू नका. (पण तिनेक तासाचा ट्रेक आहे.) पारो थिम्फू पुनाखा ही ईतर पॉप्युलर ठिकाणे आहेत.

कोलकाताहून ड्र्क एअरचे विमान आहे किंवा रस्त्याने पण जाता येते. फुंतशोलींग वाला रस्ता जास्त पॉप्युलर आहे. भारतीय लोक स्वतःचे वाहन पण नेऊ शकतात. (ठराविक शुल्क देऊन.)

बाकी >> जरा ऑफ-बीट ठिकाणं बघायची आहेत. शांत निसर्ग हवा आहे, फोटोग्राफी करायची आहे >> तेव्हा भुतान हे अगदी परफेक्ट ठिकाण आहे. जाऊन आल्यावर मायबोलीवर फोटो आणि अनुभव नक्की लिहा. Happy

हनुमान करण्यासाठी पाचगणी किंवा महाबळेश्वरमधलं एखादं हॉटेल सुद्धा चालेल. कशासाठी जायचं आहे ते बघावण, उगाच जायचं आहे तर लगे हात पर्यटन, ट्रेकींग, लोकसंस्कृतीचा अभ्यास करू म्हणलं की सगळ्याचेच बारा वाजतात असं माझ्या एका ब्रम्हचारी मित्राचं मत आहे.

मी जाऊन आले आहे भूतानला. अत्यंत सुंदर, प्रिस्टाईन म्हणतात तसा निसर्ग आहे. पर्यावरणाची, नैसर्गिक सौंदर्याची खूप छान काळजी घेणारा देश म्हणून लक्षात राहीला. संपूर्णपणे प्लास्टिकमुक्त. निदान पाच वर्षांपूर्वीतरी होता. आता तिथले पर्यटन खूपच वाढले आहे त्यामुळे बदल झाला असेलही.

नक्की काय माहिती हवी आहे कळलं तर सांगता येईल. माझ्या ब्लॉगवर मी बहुधा भूतानवर एक पोस्ट टाकली होती. असेल तर लिन्क देईन. कदाचित काही उपयोग होऊ शकेल.

.

या वर्षीच्या २६ जानेवारीच्या दिल्लीमधल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन भूतानचे राजा, राणी आले होते.
आम्ही बोलत होतो "भूतानचा राजा / भूतानची राणी" तर मुलगी म्हणत होती की पण ते तर माणसांसारखेच दिसत आहेत Lol

ती राणी जाम गोड आहे. पारंपारिक कपड्यात फोटो काढा आणि इथे टाका.

सगळ्यांना धन्यवाद!

हनीमून हे एक कारण आहे तु.खा, पण असो, ज्यांना कळायचं त्यांना कळतं.

हिरकणी, बघते!
शर्मिला, धन्स गं!

त्यांच्या प्रकारचे जेवण सोडून बाकी प्रकार विशेष मिळत नाहीत असे ऐकून आहे तेव्हा बरोबर आपले पदार्थ तोंडी लावायला घेऊन जा.

टायगर्स नेस्ट मॉनेस्ट्री चुकवू नका. (पण तिनेक तासाचा ट्रेक आहे.) पारो थिम्फू पुनाखा ही ईतर पॉप्युलर ठिकाणे आहेत. >>> HH, नक्की नक्की! रच्याकने, त्यांच्याकडच्या अन्नाची खासियत वगैरे काही माहिती आहे का?

आणि जाउन आले की (आणि आले तर), नक्की लिहिन आणि फोटो पण टाकीन!
Happy

भानुप्रिया, तुम्ही गेला होतात का? जुन / जुलै मध्ये भुतानचा अनुभव काय आहे? ईतक्यात कोणी भुतानला जाऊन आलय का? प्लीज माहीती द्या.