Submitted by वैवकु on 31 January, 2013 - 02:43
काहीतरी तिची ही जादूगरीच आहे
माझ्या मनात इच्छा आता तिचीच आहे
ऐन्यातल्या छबीच्या डोळ्यात पाहिले मी
प्रतिमा उभी तिथे ती घनसावळीच आहे
दो शब्द बोलण्याचे काळीज मागते ती
ही बातमी म्हणे की आहे खरीच आहे
कसला असा अबोला रुसवा कश्यामुळे हा
मी प्राण सोडताहे ती चाललीच आहे
हा कायदाच आहे निष्ठूर जिंदगीचा
ती वागली कशीही म्हण चांगलीच आहे
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा कायदाच आहे निष्ठूर
हा कायदाच आहे निष्ठूर जिंदगीचा
ती वागली कशीही म्हण चांगलीच आहे
चांगला विचार पण न्युमरसली रीपीटेड!
अपेक्षा खूप आहेत, गझल साधारण(सामान्य नव्हे, सो सो) झालीय.
शुभेच्छा!
विडंबन करुन टाकतो
विडंबन करुन टाकतो
धन्यवाद कणखरजी आपण सांगत आहात
धन्यवाद कणखरजी आपण सांगत आहात त्याची कल्पना गझल पूर्ण करताकरता मलाही आली होती
पण याच्यातले सगळे शेर एकाच लेव्हलचे झालेत
ही मुसल्सलही आहे
अशा मूडमधे एखादी रोमँटिकरचना झालीच तर करायचीच होती या कारणास्तव
व जे काही हातून लिहून होते ते प्रकाशित करण्यावाचून राहवत नाही हा मायबोलीचा लागलेला लळा
यासाथी बिनदिक्कतपणे प्रकाशित केली आहे
शिवाय कोणालातरी आवडेलच ज्याला आवडेल त्याला आवडेल ...बघूया! असे म्हणत प्रकाशित केली
(शिवाय दुसरा शेर विठ्ठलावरही घसरवता येतो आणि विठ्ठलाचा शेर हा वीक पॉईंट असल्याने मग फारसा विचार केला नाही)
........अर्थात ही सगळी निव्वळ कारणे झाली सबबी झाल्या पुढ्ल्याबारी तक्रारीची एकही संधी न देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन
धन्यवाद
आपला ;
सदैव कृपाभिलाषी
-वैवकु
फणस धन्स विडंबन झाले तर
फणस धन्स
विडंबन झाले तर आवडेलच
पण वृत्त काफिया रदीफ पाळाच !(तुम्ही नाही पाळत असे कालपासूनच्या तुमच्या २ रचनांमध्ये पाहिलेय )
शिवाय विठ्ठलाच्या शेराच्या विडम्बनातही विठ्ठल दिसलाच पाहिजे असे पहा
खूप खूप शुभेच्छा
वैवकु, स्पष्ट मत. एकही शेर
वैवकु, स्पष्ट मत. एकही शेर अपील झाला नाही. (माझ्यासारख्या गझला लिहू नका. :फिदी:) तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत.
हा कायदाच आहे निष्ठूर
हा कायदाच आहे निष्ठूर जिंदगीचा
ती वागली कशीही म्हण चांगलीच आहे
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
चांगला प्रयत्न.
अवांतरः
तिच्या वागण्याचा आणि म्हणींचा चांगला संबंध जोडला आहे.

मोडून कायदा हा निष्ठूर जिंदगीचा
ती वागली कशीही म्हण "आपलीच" आहे
धन्स कौतुक तुझ्याकडून आलेला
धन्स कौतुक
तुझ्याकडून आलेला प्रतिसाद म्हणजे मला नेहमीच साक्षात कौतुकानंच माझं कौतुक केल्यासारखं वाटतं
धन्स अ लॉट !! माझ्या सारख्या कडून अपेक्षा ठेवल्याबद्दल :).
या वेळी सॉरी .........पुढल्यावेळी नक्की!!
भुंगा धन्स "पर्यायी" मस्तच
भुंगा धन्स

"पर्यायी" मस्तच
विदिपांशी सहमत वैभव... शेवटचा
विदिपांशी सहमत वैभव... शेवटचा शेर आवडला
ऐन्यातल्या छबीच्या डोळ्यात
ऐन्यातल्या छबीच्या डोळ्यात पाहिले मी
प्रतिमा उभी तिथे ती घनसावळीच आहे
>> हा शेर मस्तच !!
बाकीचे लिहून झालेले दिसतेच आहे..!
आपण पंढरीमधून फारच
आपण पंढरीमधून फारच हृदयस्पर्शी लिहिता नेहमीच . त्यामुळे माझ्यासारखा नवशिक्याही आपल्याकडून अपेक्षा बाळगू लागतो . ते असो .
मतला , घनसावळा आणि मक्ता हे फार आवडले !
चांगलं लिहू शकतोस .. खात्रीये
चांगलं लिहू शकतोस .. खात्रीये .. शुभेच्छा!
वैवकु, मला ते रदीफ, कफिया अन
वैवकु, मला ते रदीफ, कफिया अन अलामती प्रकार कळत नाहीत. एक लिंक बेफींनी दिली होती त्यात वाचले पण क्लियर व्हायला अजून बरेच वाचन, चर्चा बिर्चा व्हायला पाहिजे. सध्या अनुभवाबद्दल लिहिते.
ते शेवटचे "च आहे" (याला कफिया म्हणतात असे वाटतेय) ते गमतिदार आहे. तुमची भाषा वापरायची पद्धत छान आहे. कधीकधी फार स्पष्ट अर्थ समजला नाही तरी silhouette वरून माणसाचा अंदाज यावा तसा शेर समजून जातो.
जसे,
>> कसला असा अबोला रुसवा कश्यामुळे हा
मी प्राण सोडताहे ती चाललीच आहे
या शेरात जरी तशी स्पष्ट शब्दयोजना नसली तरी मला माझा जीव चाल्लाय तरी ती विरघळत नाहीच, उलट निष्ठूरपणे निघून जातेय हा फील मिळाला आहे.
सो, शब्द कमी पडलेत (आणि भरीचे शब्द पण जास्त आहेत) पण अनुभव देणं समर्थपणे जमलंय असं वाटतं.
पारीजाताआज्जी काफीया म्हणजे
पारीजाताआज्जी काफीया म्हणजे यमक , या गझलेत 'आहे' ने शेवट होतोय तो रदिफ. काफियानंतर रिपीट होणारा शब्द म्हणजे रदिफ.पण मी ते पाळत नाही
रसपशी सहमत.. ऐन्यातल्या
रसपशी सहमत..
ऐन्यातल्या छबीच्या डोळ्यात पाहिले मी
प्रतिमा उभी तिथे ती घनसावळीच आहे
यातली मजा उरलेल्या गझलेत उमटली नाही.
पु.ले.शु.
ऐन्यातल्या छबीच्या डोळ्यात
ऐन्यातल्या छबीच्या डोळ्यात पाहिले मी
प्रतिमा उभी तिथे ती घनसावळीच आहे
हे छान आहे की..!
अ अ जोशी आपली विपु पहा.
अ अ जोशी आपली विपु पहा.
मिल्या, जितू ,शामजी
मिल्या, जितू ,शामजी ,भारतीताई, जोशी साहेब ,...खूप खूप धन्स !
मासरूळकर स्वत:ला नवशिका म्हणवून मला शर्मिंदा करू नका ना राव !
पारिजाता जी

१)आपला प्रतिसाद आवडला पटला (भरीचे "अनेक"शब्द हा मुद्दा सोडून :))
२)तसेच आपली ओळख अजून नवी आहे म्हणून आताच नम्रपणे सांगून ठेवतो की silhouette सारखे साहित्यिक इंग्रजी शब्द कुणी वापरले मला घण्टा काही कळत नाही त्यामुळे मराठीतच बोलाल का प्लीज
३) बाईमाणुस असलात म्हणून काय झालं <<<मला ते रदीफ, कफिया अन अलामती प्रकार कळत नाहीत>>असल्या थापा खववून घेतल्या जाणारे नाहीत बरका यापुढे
फणस १ : विडंबनाचे कुठवर आलेय ....? आम्ही मोठ्या प्रेमाने (आशेने) दिलेल्या शुभेच्छा अश्या वाया घालवू नका की राव !!
सर्वांचे पुनश्च मनःपूर्वक आभार

(No subject)
ऐन्यातल्या छबीच्या डोळ्यात
ऐन्यातल्या छबीच्या डोळ्यात पाहिले मी
प्रतिमा उभी तिथे ती घनसावळीच आहे..
सुंदर खयाल..
चांगली गझल..
शुभेच्छा..
धन्यवाद फाटक साहेब कसे आहात
धन्यवाद फाटक साहेब
कसे आहात