"सर, मेरी शादी है अगले महिने. जरूर आना." ऑफिस मधला सहकारी हातात कार्ड देता देता म्हणाला.
लग्न अनंतपुर, आंध्र प्रदेश मध्ये होते. बंगलोर पासुन २२० किमी वर.
गूगल मॅपवर जायचा रस्ता पहात होतो. अचानक लक्ष गेले. अरे लेपाक्षी (हिंदूपुर जवळ) तर ह्याच वाटेवर आहे.
फक्त २० किमीची वाकडी वाट.
जेव्हा हैदराबादला होतो तेव्हाच लेपाक्षी ला जायचे मनात होते पण काही कारणाने राहुन गेले होते. आता आयता योग आला होता. आणखिन २-३ जणांना विचारले तर तेही तयार झाले.
दुपारचे लग्न आटोपुन परतताना ३-४ वाजता लेपाक्षीला पोहोचलो.
ईथे विजयनगर शैलीतील १६व्या शतकातले विरभद्राचे (शंकर) मंदिर आहे.
ईथली भित्तीचित्रे फार प्रसिद्ध आहेत पण मी जेव्हा गेलो तेव्हा ह्या बद्दल माहिती नसल्याने त्यांचे काही फोटोज् काढले नाहित (अज्ञान आणि काय?)
ह्या मंदिरासमोरचा नंदी अगदी मंदिरासमोर नसुन २ किमी आधी आहे.
प्रचि १
-
-
-
प्रचि २
-
-
-
प्रचि ३
-
-
-
प्रचि ४
-
-
-
प्रचि ५
-
-
-
ह्या शिल्पाबद्दल अशी अख्यायिका सांगितली जाते कि हा शिल्पकार आईने जेवण बनविण्याची वाट पहात होता. फावल्या वेळात काय करायचे म्हणुन समोर असलेल्या एका अखंड दगडात त्याने हे शिल्प कोरले.
प्रचि ६
-
-
-
प्रचि ७
-
-
-
प्रचि ८
-
-
-
प्रचि ९
-
-
-
प्रचि १०
-
-
-
प्रचि ११
-
-
-
प्रचि १२
-
-
-
प्रचि १३
-
-
-
प्रचि १४
-
-
-
प्रचि १५
-
-
-
प्रचि १६
-
-
-
प्रचि १७
-
-
-
प्रचि १८
-
-
-
प्रचि १९
-
-
-
प्रचि २०
-
-
-
एका वेगळ्या अँगल ने.
प्रचि २१
-
-
-
--------------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत - क्रमशः
आगामी आकर्षण - भोगनंदिश्वर, कर्नाटक.
"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407
ग्रेट! यात वीरभद्राची मुख्य
ग्रेट! यात वीरभद्राची मुख्य मुर्ती कुठल्या प्रचिमध्ये आहे? गणपती आणि शिवलिंग खूप सुंदर.
तुमच्या पोस्ट्सची वाट पाहत असते मी. धन्यवाद.
सर्वच प्रचि मस्त
सर्वच प्रचि मस्त
फावल्या वेळात काय करायचे
फावल्या वेळात काय करायचे म्हणुन समोर असलेल्या एका अखंड दगडात त्याने हे शिल्प कोरले>>>
खरा कलाकार फावल्या वेळातही सुंदर कलाकृती निर्माण करू शकतो याचा प्रत्यय आला.
सुरेख!
अरे चंदन मस्तच... अतुल्य भारत
अरे चंदन मस्तच... अतुल्य भारत .. नावाप्रमाणेच हि शृंखला खुप अतुल्य आहे रे..
आम्हाला तु घरबसल्या भारत दर्शन घडवतोयस... खरच यांच एक छानस पुस्तक छाप ..
१,५,६,२१ सुप्पर आवडले..
१,५,६,२१ सुप्पर आवडले.. बाकीचे पण सहीच..
खूपच छान. आंध्र प्रदेश,
खूपच छान. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणी आपला महाराष्ट्र लेणी, प्राचीन मंदिरे आणी आणखीन अनेक बाबतीत खरा समृद्ध आहे हे तुमच्या प्रचिमुळे जास्तच जाणवते. धन्यवाद. खूपच छान आणी स्वच्छ . सरकारने ह्यांना जपण्यात प्राधान्य देऊन हा वारसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा.
आणी रोहीत यांना अनुमोदन. तुम्ही खरच मनावर घेऊन याचे संकलन पुस्तकरुपात प्रदर्शीत कराच, कारण आमच्या सारख्या अनेक नवख्या पर्यटकांना तुमचे संकलन आणी माहिती मार्गदर्शक ठरेल.
वा मार्को क्या बात है !!
वा मार्को क्या बात है !! सूपर्ब !!
मस्तच
मस्तच
वा! सर्व प्र.चि. सुंदर आहेत.
वा! सर्व प्र.चि. सुंदर आहेत.
धन्स
धन्स मंडळी...
चिन्नु,
पुजेच्या मुर्तीचे फोटोज् घ्यायची परवानगी नव्हती.
रोहित आणि टुनटुन,
धन्यवाद रे... नक्किच विचार करेन...
मस्तच. फोटोंतून माणसे काढून
मस्तच.
फोटोंतून माणसे काढून टाकायच्या टेक्नीकबद्दल पण लिही रे.
अशा जागांचे फोटो बघितले कि
अशा जागांचे फोटो बघितले कि मला, तिथे एखादी नर्तकी खरेच नृत्य करत आहे, असे भास होतात. ( थेट सूरसंगममधल्या जयाप्रदासारख्या )
सॉल्लिड फोटो. अतिशय सुंदर.
सॉल्लिड फोटो. अतिशय सुंदर.
अमेझिंग शिल्प आणी उत्तम
अमेझिंग शिल्प आणी उत्तम फोटोग्राफर..
आम्ही माबोकर्स किती लकी आहोत
सुपर्ब!!!! अप्रतिम ठिकाण आहे.
सुपर्ब!!!!
अप्रतिम ठिकाण आहे. या जागेबद्दल काहिच माहित नव्हते
अमेझिंग शिल्प आणी उत्तम फोटोग्राफर..>>>>>>+१०००००
सुंदर शिल्प आहेत... आणि फार
सुंदर शिल्प आहेत...
आणि फार मस्त टिपली आहेत .
माधव, Touch-up साठी मी Canon
माधव,
Touch-up साठी मी Canon चे digital photo professional software वापरतो. ह्या software ने चित्रातला selected भाग copy-paste करता येतो.
दिनेशदा,
मस्त कल्पना आहे. आवडली...