Submitted by वैवकु on 22 January, 2013 - 07:01
हा बदलता चेहरा माझाच आहे ना
चेहर्याच्या आत मी साधाच आहे ना
हास पाहू तू तुला माझी शपथ आहे
हे रडत म्हणतोय... मी वेडाच आहे ना
पांडुरंगा त्यास का म्हणताय लोकांनो
विठ्ठ्लाचा रंग तर काळाच आहे ना
मृगजळासम वाटते आता तुझे होणे
आस-ओला भावही सुकलाच आहे ना
हे मला वाटू नये मी भेटल्यावरती
भेट ज्याची घ्यायची तो हाच आहे ना
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा बदलता चेहरा माझाच आहे
हा बदलता चेहरा माझाच आहे ना
चेहर्याच्या आत मी सधाच आहे ना
हास पाहू तू तुला माझी शपथ आहे
हे रडत म्हणतोय... मी वेडाच आहे ना<<< मस्त शेर
हे मला वाटू नये मी भेटल्यावरती
भेट ज्याची घ्यायची तो हाच अहे ना<<< वा वा
धन्यवाद बेफीजी बेफीजी विपू
धन्यवाद बेफीजी
बेफीजी विपू पाहा मदत हवी आहे
हा बदलता चेहरा माझाच आहे
हा बदलता चेहरा माझाच आहे ना
चेहर्याच्या आत मी सधाच आहे ना >> साधाच की सधाच
बाकी गझल आवडली
वर्षाजी धन्स !! सॉरी टायपिंग
वर्षाजी धन्स !!
सॉरी टायपिंग मिस्टेक झाली होती दुरुस्त केली
सधा च मी सुध्धा विचारणार
सधा च मी सुध्धा विचारणार होते.
ते शेवटी अहे आहे ते ही टायपो आहे का?
अरेरे खरंच की ........लग्गेच
अरेरे खरंच की ........लग्गेच दुरुस्त करतो ....
पुनश्च क्षमस्व
धन्स ........सुस्मित
ठीक आहे गझल. तुझा फोन का लागत
ठीक आहे गझल.
तुझा फोन का लागत नाही रे गृहस्था?
धन्स कणखरजी गेले १५-२० दिवस
धन्स कणखरजी
गेले १५-२० दिवस शेतात आहे(डाळिंब बागेत ..सीझन होता ...तोडणी झाली आहे ) माझ्या नेटवर्कला इथे कनेक्टिविटी नाही आहे पंढरपुरात असलो की फोन लागतो शेतात नाही लागत
१-२ दिवसात पुण्यात असेन फोन करीन
तसदीबद्दल दिलगीर आहे
क्षमस्व
डाळिंब बागेतून अधिक गझला
डाळिंब बागेतून अधिक गझला आल्या पाहिजेत
गझल छानेय.
डाळिंब बागेतून अधिक गझला
डाळिंब बागेतून अधिक गझला आल्या पाहिजेत <<<
प्रोफेसर डाळिंब बागेत राहतात काय?
हे मला वाटू नये मी
हे मला वाटू नये मी भेटल्यावरती
भेट ज्याची घ्यायची तो हाच आहे ना
शेर मिस्किल आहे. आवडला.
प्रोफेसर डाळिंब बागेत राहतात काय?
मायबोलीचा गझलविभाग थंड वाटतोय.
नक्कीच।. पुण्यास अलो की
नक्कीच।. पुण्यास अलो की एखादी चक्कर मुंबईलाही टाकावी म्हणतोय ....येताना डाळिम्बच आणणार होतो पण ठीकय तुम्ही गझल मागत आहत तर गझलच आणतो ...:)
धन्स भारतीताई
प्रोफेसर डाळिंब बागेत राहतात
प्रोफेसर डाळिंब बागेत राहतात काय?>>>>>
समीरजी खूप खूप धन्स
बेफीजी विपू पाहिलीत का ?
प्रोफेसराना नका बुवा पाठ्वू
प्रोफेसराना नका बुवा पाठ्वू इकडे
पिकात संख्यात्मक वाढ होईल हो...पण गुणात्मक वाढीचे काय ??
हा बदलता चेहरा माझाच आहे
हा बदलता चेहरा माझाच आहे ना
चेहर्याच्या आत मी साधाच आहे ना... वा भिडला मतला
हास पाहू तू तुला माझी शपथ आहे
हे रडत म्हणतोय... मी वेडाच आहे ना.....वा !
हे रडत म्हणतोय... मी वेडाच आहे ना.....वा वा वा....खुप आवडला हा मिसरा
हे मला वाटू नये मी भेटल्यावरती
भेट ज्याची घ्यायची तो हाच आहे ना.....मस्त मस्त
डाळिंबे आणि गझला दोन्ही
डाळिंबे आणि गझला दोन्ही आवडतील.
धन्स सुप्रियातै भारतीताई आज
धन्स सुप्रियातै
भारतीताई आज खूप खूष दिसताय
अश्याच रहा............
चांगली आहे कि. पण डाळींबांचा
चांगली आहे कि. पण डाळींबांचा रंग नाही उतरला कुठल्या शेरात.

एक सहज जाणवलं म्हणून सांगू? तुमची ही गझल गोल झाली आहे, वर्तुळाकार. शेवटचा शेर हळूच पहिल्या शेरापाशी आणून सोडतो अर्थातून.
हास पाहू तू तुला माझी शपथ
हास पाहू तू तुला माझी शपथ आहे
हे रडत म्हणतोय... मी वेडाच आहे ना >>> हा सगळ्यात जास्ती आवडला. बाकी गझल ठिकठाक.
बाय द वे.... डाळिंब इकडे पाठवून देणे पुण्याला. पत्ता कळवेन.
व्वा !...
व्वा !...
खूप सहज आल्यासारखे वाटलेत
खूप सहज आल्यासारखे वाटलेत शेर.. त्यामुळे मजा आली वाचताना.
मतल्यातला खयाल नेहमीचा असला तरी, तू ज्या पद्धतीने मांडलास तो वाचताना फील फार छान आला....!
पारिजाता प्राजु अरविंदजी बागे
पारिजाता
प्राजु
अरविंदजी
बागेश्री
खूप खूप धन्स !
______________________
पारिजाता मतला-मक्ताबद्दल निरीक्षण बरोबर आहे तुमचे.....बागेश्री तुझे गझलेवरचे प्रतिसाद आजकाल खूप छान व अभ्यासपूर्ण वाटत आहेत ....आता तुमच्या दोघ्रींच्याही गझला येवूद्यात
फक्त प्रतिसादातून किती भेटायचे... एकदा गझलेतूनही भेटा की .....:)
प्राजु पुण्यात आहेस काय ?? कुठे आहेस पत्ता कळव नक्की भेटेन !(डाळिंबही आणेन बरका सोबत
)
_______________________
सर्वांचे मनःपूर्वक आभार
चुकून एक प्रतिसाद इकडे दिला
चुकून एक प्रतिसाद इकडे दिला होता संपादित केला आहे
क्षमस्व!!!!!!
हा बदलता चेहरा माझाच आहे ना
हा बदलता चेहरा माझाच आहे ना
चेहर्याच्या आत मी साधाच आहे ना
हास पाहू तू तुला माझी शपथ आहे
हे रडत म्हणतोय... मी वेडाच आहे ना
हे दोन शेर विशेष आवडले
धन्यवाद नाहिदभाई
धन्यवाद नाहिदभाई
मस्तच
मस्तच
>> हे मला वाटू नये मी
>>
हे मला वाटू नये मी भेटल्यावरती
भेट ज्याची घ्यायची तो हाच आहे ना
<<
आवडला शेर.
सुरेख!
सुरेख!
वैभव, गझलेवर प्रतिसाद द्यायचे
वैभव, गझलेवर प्रतिसाद द्यायचे धाडस करतोय. बर्यापैकी समजली आणि आवडली.
मृगजळाबाबत होणे हे क्रियापद जरा खटकतेय. मृगजळ असते किंवा भासते. कुणाचे मृगजळ होत नाही, असे मला वाटते.
वैभव ! चांगली गझल लिहिली
वैभव !
चांगली गझल लिहिली आहेत.... मृगजळासकट...
शेवटचा शेर छानच..
Pages