Submitted by झंपी on 14 January, 2013 - 18:15
इथे मधूमेही लोकांसाठी झटपट नाश्ता सुचवा.
एकत्र संकलित करु शकतो. आधीच धागा असेल तर हा उडवेन..
तांदूळ, ब्रेड, बटाटा,मैदा,पास्ता ह्या पासूनचे पदार्थ नकोत तसेच गोड साखर, गूळापासूनचे, तेलकट, तूपकट पदार्थ नकोत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धागा योग्य ग्रूपात हलवला आहे.
धागा योग्य ग्रूपात हलवला आहे.
१.तिखट ओटमील ( ओट ब्रॅन
१.तिखट ओटमील ( ओट ब्रॅन उपमा)
२.ओट- मुग डाळ धिरड बारीक चिरलेल्या भाज्या घालून(पालक -गाजर- मटार-पत्ता कोबी-कांदा घालून , टमॅऱो मिक्सर मधून काढलेला धिरड्याच्या बॅटर मधे घालायचा.)
हे पदार्थ मी अमेरिकेतील
हे पदार्थ मी अमेरिकेतील दिनचर्या समोर ठेवून हे पर्याय ठेवले आहेत. काही पदार्थ भारतात उपलब्ध होतीलच असं नाही.
किनवा (quinoa) ची साबुदाणा खिचडीसारखी खिचडी.
भाज्या घालून भाजणीचे थालिपीठ बरोबर दही.
अंड्याचे भाज्या घालून ऑम्लेट त्यामधे चीज.
व्हीट्/मल्टी ग्रेन ब्रेडचे पीनट बटर सँडविच.
२ पोळ्या भाजून त्यात चीज घालून केसीडीया.
स्पेंडा/आगावे नेक्टर घालून केलेली भोपळ्या/रताळ्याची खीर/शीरा.
बदामाचा शिरा.
नॉनव्हेज चालत असेल तर कोल्ड कट्स घालून सँडविच/पोळीची गुंडाळी.
इथे शाकाहारी वि. मांसाहारी असा वाद सुरु करायचा नाहीये पण येथील डॉक्टरच्या म्हणण्यानुसार शाकाहारी मधुमेही व्यक्ती लिमिट्च्या बाहेर साखर घेतातच. कितीही प्रोटीनरिच म्हणलं तरी राजमा, बीन्स, कडधान्ये यामधे काही प्रमाणात साखर असतेच. कडधान्ये मोड आणून वापरली तर अतिशय उत्तम. पण पॉलीश केलेल्या डाळी फार काही बर्या नाहीत. भारतात मधुमेही लोकांचा आहार पाहिला की खरंच वाईट वाटते. कारण कित्येक आयुर्वेदाचे वैंदू मधुमेह बरा होतो अशी आशा लावतात आणि मग दही, भाज्या, फळे, सुकामेवा या खरोखर उपयुक्त गोष्टी बंद करून थोडा भात चालेल, साखरे ऐवजी गूळ चालेल असं चुकीचं सांगतात. पण प्रत्यक्षात मध=गूळ=काकवी=ब्राऊन शुगर====साखर आणि ते सर्व मधुमेहींना वाईटच. आगावे नेक्टर (agave nectar) पण साखरच आहे पण तिचा ग्यायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि चव थोडीफार गुळासारखी त्यामुळे भारतीय पक्वान्ने करता येतात. फक्त खूप कमी प्रमाणात खावीत.
अजून बरंच काही लिहू शकेन यावर.
एग व्हाइट ऑम्लेट विथ
एग व्हाइट ऑम्लेट विथ व्हेजिज..
ऑम्लेटट ची रेसिपी नेहेमीचीच पण थोडसं व्हेरिएशन , सिमला मिर्ची रिंग मधे घालायचं :ऑम्लेट),
शिजल्यावर सगळं एकजीव होतं !
रंगीबेरेंगी सिमला मिरच्या पण वापरता येतील..चीज नाही घालत मी.
हे मी घरत होत्या त्या हिरव्या सिमला मिर्ची रिंग्ज मधे केलेली एग व्हाइट ऑम्लेट्सः
स्टेप १
ही एक बाजु भाजूल उलटलेली
रेडी
धन्यवाद दिपांजली,
धन्यवाद दिपांजली, धनश्री.
तुमच्या आयडिया छान आहेत.
दिपांजली, वरची ऑमलेटची कृती एकदम छान आहे. सर्वांना छान आहे.
काही काही नक्कीच करून बघेन.
प्रॉबलेम हा आहे की माझ्या सासर्यांना ब्रेड, चपाती,भात वगैरे एकदम बंद करायला सांगितलेत काही दिवस. ओट सुद्धा सांगितलेत. कारण त्यांना मधूमेहामूळे किडनीवर परीणाम सुद्धा झालाय. त्यामुळे कार्ब्स नकोतच व काही पदार्थ सुद्धा. त्यामुळे बरीच अडचण आहे त्यांना काय करून घालावे.
पण तरीही ह्या पाकृचा फायदा होइलच.
>>>भारतात मधुमेही लोकांचा
>>>भारतात मधुमेही लोकांचा आहार पाहिला की खरंच वाईट वाटते. कारण कित्येक आयुर्वेदाचे वैंदू मधुमेह बरा होतो अशी आशा लावतात आणि मग दही, भाज्या, फळे, सुकामेवा या खरोखर उपयुक्त गोष्टी बंद करून थोडा भात चालेल, साखरे ऐवजी गूळ चालेल असं चुकीचं सांगत>>><<
+१
भारतात किती ते कार्ब्स खातात. नको तेवढे उपास तपास पण चालतात काहींचे....
ओह ओके प्रमाणा बाहेर प्रोटीन
ओह ओके
प्रमाणा बाहेर प्रोटीन पण डायबेटिक लोकांना नाही सांगतात किडनी वर स्टेस येउ नये म्हणून !
बेस्ट ब्रेकफास्ट - ब्राउन
बेस्ट ब्रेकफास्ट - ब्राउन ब्रेड आणि एग व्हाइट
दिपांजली ब्रेफाची आयडीया
दिपांजली ब्रेफाची आयडीया मस्तच.
वॉव दीपांजली.. हा तर घरातल्या
वॉव दीपांजली.. हा तर घरातल्या सर्वांनाच आवडेल प्रकार, खूपच छान..
अजुन एक पण हे किदनी प्रॉब्लेम
अजुन एक पण हे किदनी प्रॉब्लेम ला चालेल कि नाही याची एकदा खात्री करून घ्यावी लागेल.
ग्रीक योगर्ट+फ्रोजन ब्लु बेरीज+ व्हॅनिला फ्लेवर्ड व्हे प्रोटिन पावडर +थोडं दूध हे घालून ब्लेन्डर मधे स्मुदी बनवायची.(साखर न घालता.)
स्ट्रॉबेरीज-रॉसबेरीज पण घालता येतील पण साखर न घालता रेड बेरीज शेक आंबट लागतो.
हा फोटो, वरच्या रेसिपीने केलीये पण अगदी छोटा केळ्याचा तुकडा आणि २-३ रॉसबेरीजही-ब्लॅक बेरीजही टाकल्यायेत यात .
ग्रीक योगर्ट घट्ट असतं आणि यात प्रोटिन जास्तं असतं म्हणून ग्रीक योगर्ट., हेवी शेक सारखी असल्यामुळे पोट भरतं !
मिनि ऑम्लेट्स मस्त दिसतायेत
मिनि ऑम्लेट्स मस्त दिसतायेत
झंपी, खालीलपैकी काही उपयोगी
झंपी,
खालीलपैकी काही उपयोगी होईल का तुला ?
क्ष... | 10 May, 2011 - 00:29
पेसरट्टू, नुसत्या डाळी वापरून केलेले आडाई, डाळ इडली, डाळ वाटून केलेला ढोकळा, चपातीच्या पिठात वेगवेगळ्या भाज्या (बटाटे आणि मटार वगैरे सोडून) पराठे, मटकी-मुगाची उसळ असे चालू शकेल.
दिनेशदा | 10 May, 2011 - 00:25
पल्लवी८६, डॉक्टर अशा पेशंटसाठी दिवसभराचा आहार लिहून देतात. तो काटेकोरपणे पाळणे आवश्यक असते. (माझी आई गेली १० वर्षे तो पाळतेय.) त्यांना काय आणि किती खाल्ले तर चालेल ते एकदा विचारुन घ्या. त्या घटकांना अनुसरुन इथे पाककृति देता येतील.
पल्लवी८६ | 10 May, 2011 - 00:36
दिनेशदा, त्यांचे वय ८१ आहे. डॉक्टरांनी गोड, भात, बटाटा ही नेहमी प्रमाणे पथ्ये सांगितली आहेत. ती इतर जेवणाच्या वेळेस पाळतोच पण ब्रेकफास्टला नेहमीच उपीट, पोहे, शेवयाचे उपीट इतकेच होते. वेगळ काय करता येइल ?
थॅंक्स मिनोती, डाळ इडली ची पा. कृ. टाकाल का?
दिनेशदा | 10 May, 2011 - 01:20
पल्लवी, राजगिर्याच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, कुरमुरे, पोहे, वगैरे दूधात भिजवून खाता येतात. नाचणीच्या पिठाचे डोसे, ढोकळा, तांदळचे कदंबम, खिमटी, उकडून घेतलेली कडधान्ये.. पण हे सगळे दिवसाच्या आहाराचा तक्ता लक्षात घेऊनच. कमी गोड असणारी फळे जसे कलिगंड, टरबूज, पपई वगैरे.
दिनेशदा | 10 May, 2011 - 02:21
http://www.maayboli.com/node/25649
इथे लिहिलेय.
क्ष... | 10 May, 2011 - 09:04
कुरमुरे, पोहे, तांदळाचे कदंबम, खिमटी यात सगळ्यात तांदूळ आहे. डायबेटीस असलेल्या व्यक्तीला कसे चालेल?
दिनेशदा | 10 May, 2011 - 09:08
डायबेटीसला तांदू़ळ पूर्ण वर्ज्य करायला सांगत नाही हल्ली. सगळे खायचे पण प्रमाणात, असा सल्ला देतात.
आईला तक्ता दिला आहे, त्यात आहे हे सगळे.
अरुंधती कुलकर्णी | 10 May, 2011 - 11:11
नाचणीची ताकातली आंबील, ज्वारीच्या पिठाची उकड, गव्हाच्या पिठाचा फुलका, शेवयांचा उपमा, दलियाचा उपमा, व्हीट फ्लेक्स / पफ्स नुसते दुधातून, दाल शोरबा (डाळ व भाज्यांचे दाटसर सूप) असे पदार्थही डायबेटिसला चालतात.
भाजणीचे पदार्थ, जसे थालिपीठ, चालू शकतात. मिश्र पिठांची धिरडी करता येतील.
डीज्जे, ती ऑमलेट्स काय भारी
डीज्जे, ती ऑमलेट्स काय भारी दिसताहेत. नक्की ट्राय करणार
मस्त आहे हे कलेक्शन. डिजेची
मस्त आहे हे कलेक्शन. डिजेची ऑम्लेटस बेस्टच.
बर्याच आयडिया मिळतील आता.
छान माहिती संकलित होतेय ह्या
छान माहिती संकलित होतेय ह्या धाग्याच्या निमित्ताने.
@झंपी <<<प्रॉबलेम हा आहे की माझ्या सासर्यांना ब्रेड, चपाती,भात वगैरे एकदम बंद करायला सांगितलेत काही दिवस. ओट सुद्धा सांगितलेत. कारण त्यांना मधूमेहामूळे किडनीवर परीणाम सुद्धा झालाय. त्यामुळे कार्ब्स नकोतच व काही पदार्थ सुद्धा. त्यामुळे बरीच अडचण आहे त्यांना काय करून घाला<<<>>>
वर सगळ्यांनि दिलेल्या यादिमधुन फक्त ऑम्लेट (ते हि जर ढोबळि मिरची वजा करुन बनवले तर) हा एकच पदार्थ कार्ब्ज फ्री आहे. तुम्हि जे लिहलय त्यावरुन वाटतय की तुमच्या सासर्यांचा प्रॉब्लेम बराच क्रिटिकल आहे. त्यांच्या आहाराच्या बाबतीत ट्रायल अॅन्ड एरर साठी फारसा स्कोप नाहि. मधुमेहि व्यक्तिंना देखिल कम्प्लिट कार्ब्ज फ्री आहार सांगितला जात नाहि कारण रक्तातिल ग्लुकोज ची पातळि मेन्टेन करण्यासाठी कार्ब्ज ची आवश्यकता असते. ब्लड ग्लुकोज एका मर्यादेच्या खालि गेले तर त्यामुळे अतिशय भयावह कॉम्प्लिकेशन्स निर्माण होउ शकतात. त्यांच्या आहारासाठी कृपया 'सर्टिफाईड डायबेटिक एज्युकेटर' चा सल्ला घ्या. डायबेटिस ह्या विषयात स्पेशलाईझ करणारे हे डायटेशिअन्स असतात. वरिल वर्णन वाचल्यावर डॉ. नी हा पर्याय कसा सुचवला नाहि ह्याच आश्चर्य वाटल. पण शक्य झाल तर त्यांच्या डॉ. नाच ह्यासाठी रेफरल मागा.
@ इतर. मधुमेह हा हळुहळु वाढत जाणारा विकार आहे त्यामुळे इतकि क्रिटिकल परिस्थिति येण्याआधी तो आटोक्यात आणण आणि ठेवण सहज शक्य आहे. त्यामुळे इथे रेसिपिज च संकलन करुन फायदा होइल पण पदार्थ सुचवताना प्लिज आधी खात्री करुन घ्या.
रमा, हो साबूंची कंडिशन खराबच
रमा, हो साबूंची कंडिशन खराबच आहे. तक्ता दिलेला आहे. आता कार्ब्स पुर्ण बंद 'फक्त' काही दिवस सांगितलेत. त्यांना बर्याच अॅलेर्जीक रीयॅक्शन आल्या होत्या.
मूळ प्रॉबलेम हा आहे की त्यांच्या पॅन्क्रीयाला खूप सूज आली होती (मधूमेहाचे भयानक रूप).
आता तसे बरे आहेत पण दिवसभर ते वैतागलेले असतात , हे खाउ नका, ते खाउ नका सांगितले की.
इथे अजून रेसीपी आल्या तर बरे राहील, ज्यांना मधूमेहाचा इतका क्रिटीकल त्रास नाही त्यांनी करून पहाता येतील.
तेव्हा मंडळी लिहित रहा.. मी डॉक ना विचारून करून पाहेन रेसीपी.
झंपी, लो फॅट दूध, उकडलेलं अंड
झंपी, लो फॅट दूध, उकडलेलं अंड (पांढरा भाग), सफरचंद वा तत्सम फळ (केळ आंबा वगैरे नको)
ताक, दूध,अंडी, चिकन, फिश वगैरे? (मी स्वतः चिकन फिश खात नसल्यानं माहित नाही काय परिणाम होईल ते - पण त्यातून सत्व मिळत असेल असं वाटतय), खूप साखर नसलेली फळं, भाज्यांमधले कार्ब्ज चालणार असतील तर भाज्या (गाजर, काकडी वगैरे कच्च्या खाण्यासारख्या)
ज्यूस वगैरे नको - साखर घातली नाही तरीही नको.
सूप्स, वरणाचं पाणी
उसळी, वर दही कांदा वगैरे (आवडत असल्यास) घालून.
>>>मधुमेहि व्यक्तिंना देखिल
>>>मधुमेहि व्यक्तिंना देखिल कम्प्लिट कार्ब्ज फ्री आहार सांगितला जात नाहि कारण रक्तातिल ग्लुकोज ची पातळि मेन्टेन करण्यासाठी कार्ब्ज ची आवश्यकता असते. ब्लड ग्लुकोज एका मर्यादेच्या खालि गेले तर त्यामुळे अतिशय भयावह कॉम्प्लिकेशन्स निर्माण होउ शकतात. >> + १
रक्तातील साखर नियमीत ठेवण्यासाठी कॉम्प्लेक्स कार्ब्ज खाणे महत्वाचे आहे. त्यासाठी जास्त फायबर आहारात असणे चांगले. पण डॉ+डायेटिशियन चा सल्ला आणि जोडीला नियमीत व्यायाम अगदी मस्ट आहे. व्यायाम कधी/किती करताय हे पण खूप महत्वाचे आहे. सकाळी एरोबीक प्रकार, वेट लिफ्टिंग केले तर दिवसभर त्याचा फायदा होतो. पण संध्याकाळी केलेला साधा चालण्याचा व्यायाम मधुमेहींसाठी रात्री सुखाची झोप देतो (बाथरुमला परत परत उठावे लागत नाही).
ग्रीक दही (भारतात चक्का म्हणता येईल) जास्त चांगले कारण दह्याच्या व्हे मधे साखर असते. पण तेच जर कमी केले तर साखरेचे प्रमाण कमी होऊन प्रोटीन्स/कॅल्शिअम तेच मिळते.
बदाम, काजू, अक्रोड अतिशय उत्तम. पण प्रमाणात खावेत. भिजवून वगैरे खाल्ल्यानी फार फरक पडत नाही.
फळांमधे आंबा, केळ, पपई, द्राक्षे, बीट, संत्री अतिशय जास्त साखर असलेली आहेत ती वर्ज्यच करावीत.
मेलन प्रकार - कलिंगड, कँटॅलुप, हनी मेलन, मोसंबी, पेअर, पीच मध्यम साखर असलेली फळे आहेत. ती प्रमाणात असावीत.
स्ट्रॉ/ब्लु/रासबेरीज, चेरी, जांभळे, बोरे, करवंद अतिशय उत्तम. भरपूर खावी. सफरचंद अति पिकलेले नसावे.
भाज्यांमधे साधा बटाटा वाईट पण रताळं, भोपळा, बटरनट स्कॉश प्रमाणात खायला ठीक आहेत. शक्यतो या भाज्या लंचमधे असाव्यात. डिनर नंतर कमी हालचाल तेव्हा साखर वाढण्याची शक्यता असते.
टोफू पण वापरायला हरकत
टोफू पण वापरायला हरकत नाही..कार्ब्स अगदी कमी, प्रोटीन, कॅल्शियम असतात त्याच्यात. मी एग स्क्रॅम्बल सारखं करून खाते कधी कधी..
हे (nutralite) butter खरंच
हे (nutralite) butter खरंच चांगल आहे का cholestrol फ्री म्हणून?
चैत्राली मला तरी इतर
चैत्राली मला तरी इतर कोणत्याही बटर पेक्षा न्युट्रलाईट चंच बटर आवडायचं, आता मी बटरच खात नाही ती गोष्ट वेगळी.
एका कपाला सहा चमचे साखर
एका कपाला सहा चमचे साखर घेतल्यावर काय गरज बटरची ? ::फिदी:
किडनीवर परिणाम झालेला असेल तर
किडनीवर परिणाम झालेला असेल तर तूर डाळ, चणा डाळ, सगळी प्रोटीन्स म्हणजे दही, चीज, पनीर, मासे, चिकन, अंडी सर्व बंद करायला सांगतात. मूग चालतात. जास्त फाय्बरवाल्या भाज्या म्हणजे पालेभाज्या वर्ज्य असतात. रक्तदाबावर अगदी नियंत्रण असायला हवे. त्यामुळे सोडियम-पोटॅशिअमवर लक्ष ठेवावे लागते. मीठ कमी, फळे कमी(पोटॅशिअमसाठी), केळे अगदी वर्ज्य असे चमत्कारिक पथ्य असते. या बाबतीत अतितज्ज्ञ आहारतज्ज्ञांचाच सल्ला घेतलेला बरा.
पुण्याचे एक जुने आणि प्रथितयश मधुमेहतज्ज्ञ डॉ जगदीश हिरेमठ यांनी उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या रुग्णांच्या आहारासाठी पाककृतींची पुस्तके लिहिली होती. अजूनही मिळत असतील तर जरूर वापरावी.
हीरा, जगदीश हिरेमठ
हीरा, जगदीश हिरेमठ कार्डिओलॉजिस्ट आहेत .त्यानी पुस्तजे लिहिल्याचे पाहण्यात नाही. डॉ ह वि सरदेसाई म्हणायचेय का तुम्हाला?
डॉ जगदीश हिरेमठ यांनी
डॉ जगदीश हिरेमठ यांनी व्याखानं दिली आहेत या विषयावर. एकाला अमिताभ बच्चन उपस्थित होते.
दुसरे डॉ. हिरेमठ आहेत ते त्यांचे बंधू. त्यांनी पुस्तक लिहीले असेल तर कल्पना नाही.
नाही, त्यांचे बंधू दुसरे
नाही, त्यांचे बंधू दुसरे हिरेमठ हे भूल तज्ज्ञ आहेत. त्यामुळे ते तर शक्यच नाही. जगदीश हिरेमठांकडे जायचा योग बर्याचदा आला आहे तो कार्डिऑलॉजिस्ट म्हणूनच...
हिरेमटांची पुस्तके पुस्तक विक्रीतही आढळ ली नाहीत कधी.
रॉबिन हूड माफ करा हे हिरेमठ
रॉबिन हूड
माफ करा हे हिरेमठ हृद्रोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी पंधरावीस वर्षांपूर्वी उच्चरक्तदाब आणि त्यामुळे पुढे होणारे विकार यामध्ये घ्यायची आहाराची काळजी यावर पुस्तके नक्की लिहिली आहेत. रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, मूत्रपिंड निकामी होणे या परस्पर गुंतलेल्या गोष्टी आहेत. त्यासाठी त्यांनी काही सोप्या पाककृती दिलेल्या आहेत. आता ही दोन पुस्तके मजजवळ नाहीत. जवळच्या लायब्ररीत असली तर संदर्भ देऊ शकेन.
अहो रॉहु तुम्ही गुगलला का
अहो रॉहु तुम्ही गुगलला का विसरता हो?:दिवा:
http://www.jshiremath.com/Books-CDs-Health-Hearth-Management.htm
नाही, हीरा यानी त्याम्चा
नाही, हीरा यानी त्याम्चा उल्लेख मधुमेहत्ज्ज्ञ म्हणून केला होतो. आम्ही अशा तज्ज्ञाच्या शोधात आहोतच. म्हटले आपल्या नेहमीच्या डॉक्टरबद्दल आपल्याला कशी माहिती नाही.
Pages