Submitted by वैवकु रीटर्न्स on 14 January, 2013 - 04:24
जी तुझी खाल्लीय थोबाडीत मी
आज आलो नेमका शुद्धीत मी
मूगदाळीचीच तू केलीस होय्
साबुदाणा शोधतोय् खिचडीत मी
ऐकवत नाही तुझे हे घोरणे
म्हणुन म्हणतो झोपुका गच्चीत मी
"एकटा बेडर" म्हणवतो या जगी
फक्त माझ्या बायकोला भीत मी
शेर माझे ठेवतो चखणा म्हणुन
अन् तिचे प्रतिसाद बस्तो पीत मी
पाठ मॅट्रिकचा मला अभ्यासक्रम्
असुनि नसल्यासारखा नववीत मी
_____________________________
टीप :वरील शेर वाचून माझ्याबाबत गैरसमज करून घेवू नये अजूनही मी अविवाहित आहे
हे समजावे यासाठी मक्ता मुद्दाम तसा केला आहे
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
धन्यवाद भरती ताई
धन्यवाद भरती ताई
सुंदर
सुंदर
(No subject)
एक नावाचा कुणी तरी, आपली रचना
एक नावाचा कुणी तरी,
आपली रचना वाचून काहीबाही सुचले, त्या
खालील शेरांवर नजर टाकाल काय?
शेवटी खाल्लीच थोबाडीत मी!
आज आलो नेमका शुद्धीत मी!!
जेवढे घोरायचे ते घोर तू....
यापुढे झोपायला गच्चीत मी!
या जगासाठी जरी निर्भीड मी,
बायकोला मात्र असतो भीत मी!
गझल म्हणजे वाटतो चखणा मला..
खरडतो प्रतिसाद दारू पीत मी!
शायरी येते तशी करतोच मी....
शायारांच्या मोजक्या यादीत मी!
..........प्रा.सतीश देवपूरकर
..
धन्यवाद प्रा. साहेब आपले
धन्यवाद प्रा. साहेब आपले शेवटचे ४ पर्यायी शेर मूळ शेराइतकेच आवडले
खूप खूप आभार !!
पर्यायी शेर २ - पत्नीस ठणकावुन आम्ही सांगत आहोत असा भाव आला जो मूळ शेरात टाळला आहे
पर्यायी शेर ३-एकटा बेडर हा शब्द हलवता येणार नाही एकटा टायगर ची अठवण म्हणून तसाच हवा आहे तो
पर्यायी शेर ४ व ५ आम्हाला व आमच्या वकूबाला लक्षात घेवून केले आहेत हे आम्ही जाणतो !!
________________________________
प्रसादजी अहो सुंदर काय म्हणताय नुसते हसा की ................:हाहा:
______________________________
बाकीजणांचेही आभार
वृत्तातली गडबड सोडली तर...
वृत्तातली गडबड सोडली तर...
वृत्तातली गडबड सोडली
वृत्तातली गडबड सोडली तर...>>>>>>>>
महाशय अ. अ. जोशी साहेब वृत्तातली गड्बड काय ते विषद करून सांगाल काय ?
मलातरी काहीच गडबड दिसत नाही आहे
असो
धन्यवाद प्रतिसादाकरिता
मूगदाळीचीच तू केलीस
मूगदाळीचीच तू केलीस होय्
साबुदाणा शोधतोय् खिचडीत मी
सानी मिसरा तपासा.
साबुदाणा शोधतोय् खिचडीत
साबुदाणा शोधतोय् खिचडीत मी>>>
अस्सलाम् वूआलेकुम् डॉ. साSSब !! कैसे हो आप?? .:)
कमेंट के लिये शुक्रिया
............खैर ....मुद्दा असा होता की ते जे शेवटचे "य् "आहे ते अर्धी मात्रा मानून "तो" या आधीच्या अक्षरात सामिल करता येत नाही काय फोनेटिकली मला तरी काहीच वावगे वाटत नाही आहे सरजी
मराठीत असे चालत नाही काय?
मार्गदर्शन करावे शक्य झाल्यास बदल सुचवावाच
आपला
कृपाभिलाषी
~नवाच एक कुणीतरी
और भी कुछ अर्ज किया है फुर्सत्सेही सही लेकिन ... गौर फर्माइयेगा हुजूर ...........
http://www.maayboli.com/node/41477
.मुद्दा असा होता की ते जे
.मुद्दा असा होता की ते जे शेवटचे "य् "आहे ते अर्धी मात्रा मानून "तो" या आधीच्या अक्षरात सामिल करता येत नाही काय फोनेटिकली मला तरी काहीच वावगे वाटत नाही आहे सरजी >>>>>>
विचार करण्याजोगा मुद्दा आहे खरा पण पटवून घ्यायला तितकाच अवघड आहे हे ही खरे
असो
आज खूप दिवसांनी तुमची आठवण आली म्हणून सहज तुमचे लेखन चाळत होतो विशेष काही नाही
कळावे
आपला
~वैवकु
जबरीच है हझल..!!्
जबरीच है हझल..!!्
जबरीच....
जबरीच....