Submitted by अभय आर्वीकर on 13 January, 2013 - 21:44
शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)
मी तुझी साथ सोडून गाऊ कसा?
तूच माझा गळा, कंठ, नरडी, घसा
वाटले मोगर्याला तुला पाहुनी
पालखीला मिळालाय भोई जसा
मारली मी मिठी त्या क्षणी वाटले
शेरनीच्याच जबड्यात गेला ससा
झोप पाण्यात घेतोय मासा कसा?
प्रश्न हा फ़ालतू; फ़क्त खावा रसा
कार्य बाकी किती ते उद्याला बघू
मंडळींनो चला भोजनाला बसा
भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा
टक्कलाला तुझ्या तूप मी लावते
दे मला एकदा तू ’अभय’ राजसा
- गंगाधर मुटे
---------------------------------------
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हझल आवडली.
हझल आवडली.
आवडली...छान
आवडली...छान
तुझी साथ ना मुटे? ससा आणि
तुझी साथ ना मुटे?
ससा आणि शेवटचे तीन शेर मजेशीर!
हझल छान आहे. (मध्ये या
हझल छान आहे. (मध्ये या शब्दाचा उच्चार चार मात्रांचा करतात, पण ते असो)
मारली मी मिठी त्या क्षणी वाटले
शेरनीच्याच जबड्यात गेला ससा
झोप पाण्यात घेतोय मासा कसा?
प्रश्न हा फ़ालतू; फ़क्त खावा रसा
कार्य बाकी किती ते उद्याला बघू
मंडळींनो चला भोजनाला बसा<<
भोजनाचा लुटा स्वाद
भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा
>>
तुझी साथ ना?, टायपो झालाय बहुधा
खूप मजा आली धन्स
खूप मजा आली
धन्स
<< तुझी साथ ना मुटे? >> <<
<< तुझी साथ ना मुटे? >>
<< तुझी साथ ना?, टायपो झालाय बहुधा >>
अहो कसला टायपो आणि कसलं काय! तो आमच्या प्रांतीय भाषेचाच परिणाम आहे. मी जेथे राहतो तेथे शुद्ध/प्रमाणभाषा जाऊ द्या, धड वर्हाडी किंवा झाडी बोलीभाषा देखील बोलली जात नाही. आमच्या बाजुला हिंदीभाषिक प्रदेश असल्याने आमच्या बोलीभाषेवर हिंदी भाषेचे प्रभुत्व आहे.
हिंदीमध्ये "तेरा साथ" म्हणतात ना म्हणून आम्ही मराठीत आम्ही "तुझा साथ" म्हणत आलोय.
आता चूक लक्षात आल्यामुळे तशी दुरुस्ती करत आहे.
माझ्या भाषेच्या गमती मी खालील छोटेखानी लेखात लिहिल्या आहेत.
भाषेच्या गमतीजमती-भाग-२
भाषेच्या गमती-जमतीभाग-१
मारली मी मिठी त्या क्षणी
मारली मी मिठी त्या क्षणी वाटले
शेरनीच्याच जबड्यात गेला ससा
झोप पाण्यात घेतोय मासा कसा?
प्रश्न हा फ़ालतू; फ़क्त खावा रसा
कार्य बाकी किती ते उद्याला बघू
मंडळींनो चला भोजनाला बसा
भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा
>> हा हा...
भोजनाचा लुटा स्वाद
भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा
लय भारी शेर..
मारली मी मिठी त्या क्षणी
मारली मी मिठी त्या क्षणी वाटले
शेरनीच्याच जबड्यात गेला ससा
कार्य बाकी किती ते उद्याला बघू
मंडळींनो चला भोजनाला बसा
भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा