Submitted by आनंदयात्री on 10 January, 2013 - 01:00
आज आहे नेमका शुद्धीत मी
आज कळले! ना तिच्या गणतीत मी!
जाच होऊ लागला माझा तुला
आणि रेटत राहिलो ही प्रीत मी!
आपलीशी वाटली दु:खे तिची
कोणत्या होतो अशा धुंदीत मी?
वाट स्वीकारून ती गेली पुढे
अन् तिच्यासाठी उभा खिडकीत मी!
मोडल्या चाली, बदलले शब्दही!
गात गेलो फक्त माझे गीत मी
ही तुझी पुरते नशा गझले, मला!
वेगळी नाही अजुन मग 'पीत' मी!
नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/01/blog-post_10.html)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
खुप मस्त नचिकेत. जाच आणि
खुप मस्त नचिकेत.
जाच आणि खिडकी वाले शेर खुप आवडले.
खास, खास...... संपूर्ण गजल
खास, खास...... संपूर्ण गजल आवडली.
मस्त...
मस्त...
आवडली....
आवडली....
<<<आपलीशी वाटली दु:खे
<<<आपलीशी वाटली दु:खे तिची
कोणत्या होतो अशा धुंदीत मी?
वाट स्वीकारून ती गेली पुढे
अन् तिच्यासाठी उभा खिडकीत मी!>>> भारी
<<<ही तुझी पुरते नशा गझले, मला!

वेगळी नाही अजुन मग 'पीत' मी!>>> खासच!!!!
आवडली
अरे वा. मस्तच रे आंदु.
अरे वा. मस्तच रे आंदु.
मस्तंच! वेगळी नाही अजुन मग
मस्तंच!
वेगळी नाही अजुन मग 'पीत' मी!
>>>
सगळ्यात भारी हा शेर आहे!
वाह।!
वाह।!
क्या बात है... वाह!
क्या बात है... वाह!
छान गझल... मक्ता विशेष आवडला.
छान गझल... मक्ता विशेष आवडला.
(No subject)
सुंदर.....
सुंदर.....
क्या बात सरजी!
क्या बात सरजी!
जाच होऊ लागला माझा तुला आणि
जाच होऊ लागला माझा तुला
आणि रेटत राहिलो ही प्रीत मी!
आपलीशी वाटली दु:खे तिची
कोणत्या होतो अशा धुंदीत मी?
मोडल्या चाली, बदलले शब्दही!
गात गेलो फक्त माझे गीत मी<< वा वा, शेर आवडले. गझलही!
धन्यवाद!
जाच होऊ लागला माझा तुला आणि
जाच होऊ लागला माझा तुला
आणि रेटत राहिलो ही प्रीत मी!
आपलीशी वाटली दु:खे तिची
कोणत्या होतो अशा धुंदीत मी?
वाट स्वीकारून ती गेली पुढे
अन् तिच्यासाठी उभा खिडकीत मी!
मस्त गहिरे शेर....खुप आवडली गझल
चिमुरी, पारे, शशांकजी,
चिमुरी, पारे, शशांकजी, अरविंदजी, उमेशजी, हर्षल, गुब्बे, नानु, रिया, एम., शामभौ, कवे, निंबे, योगुली, बेफिकीर, सुप्रियातै - धन्यवाद!
वाट स्वीकारून ती गेली
वाट स्वीकारून ती गेली पुढे
अन् तिच्यासाठी उभा खिडकीत मी!
मोडल्या चाली, बदलले शब्दही!
गात गेलो फक्त माझे गीत मी
ही तुझी पुरते नशा गझले, मला!
वेगळी नाही अजुन मग 'पीत' मी!
वाहवा... क्या बात है!!!
मस्त गझल.
नेहमीच्या नितळतेने उतरलेली
नेहमीच्या नितळतेने उतरलेली गझल.
आज आहे नेमका शुद्धीत मी
आज कळले! ना तिच्या गणतीत मी!
जाच होऊ लागला माझा तुला
आणि रेटत राहिलो ही प्रीत मी!
सुंदरच.
मस्त!!
मस्त!!
नचिकेतजी! सुंदर गझल आहे आपली!
नचिकेतजी! सुंदर गझल आहे आपली! आवडली.
फक्त मतला व एक मिसरा असा केला तर कसा वाटेल पहा........
मतला.....
आज आलेलो खरा शुद्धीत मी!
ना तिच्या केव्हाच खिजगणतीत मी!!ng>
जाच होऊ लागला माझा तुला
मात्र रेटत राहिलो ही प्रीत मी!
...........प्रा.सतीश देवपूरकर
आपलीशी वाटली दु:खे
आपलीशी वाटली दु:खे तिची
कोणत्या होतो अशा धुंदीत मी?
>>> लै भारी
छान
छान
सुंदर गज़ल!!!
सुंदर गज़ल!!!
छान रे मित्रा, मस्त
छान रे मित्रा, मस्त
डॉक, भारतीजी, सतीशजी,
डॉक, भारतीजी, सतीशजी, चिखल्या, जाई, मुग्धमानसी, rmd (बहुतेक पहिल्यांदाच प्रतिसाद दिलाय आपण), श्रीवल्लभ - मन:पूर्वक धन्यवाद!
मोडल्या चाली, बदलले
मोडल्या चाली, बदलले शब्दही!
गात गेलो फक्त माझे गीत मी
>> हा कमालीचा आवडला, नचिकेत
जाच होऊ लागला माझा तुला आणि
जाच होऊ लागला माझा तुला
आणि रेटत राहिलो ही प्रीत मी!
आपलीशी वाटली दु:खे तिची
कोणत्या होतो अशा धुंदीत मी?
मोडल्या चाली, बदलले शब्दही!
गात गेलो फक्त माझे गीत मी
>>>> व्वाह !!
मस्स्त शेर !
वाह
वाह
खूप आवडली तरही परवा मीही या
खूप आवडली तरही
परवा मीही या ओळीवर तरही करायला घेतली पण अजून पूर्ण होत नाहीये
तर सांगायचे करणकी मीही एक खिडकीचा शेर केला होता तो असा .........
..........हे तुझे आकाशही सामावते
त्या, ....मनाच्या सानुल्या खिडकीत मी
असो
Pages