मित्राचा फुकटचा सल्ला आणि माझे मतपरिवर्तन...

Submitted by विशाल कुलकर्णी on 8 January, 2013 - 04:48

'केरळला चाललोय फ़िरायला' हे जेव्हा जाहीर केले तेव्हा एका जवळच्या मित्राकडून नेहमीप्रमाणे एक फ़ुकटचा सल्ला मिळाला. केरळमध्ये जिथे काशी घालणार असशील तिकडे घाल, पण तीन गोष्टी चुकवू नकोस..
१. कन्याकुमारीचा सुर्योदय (या बद्दल इथे माहिती आहेच)
२. कोचीनचा सुर्यास्त
३. कन्याकुमारीचा सुर्यास्त होवून गेल्यावर दिसणारा सनसेट पॉईंटचा समुद्र

तसं पाहायला गेलं तर माझ्या या जवळच्या मित्राची कुठलीच गोष्ट मी फारशी मनाला लावून घेत नाही, त्यामुळे हे देखील विसरून गेलो. पण कोचीनमध्ये उतरल्यावर कधी नव्हे ते कुलकर्णीबाईंना आमच्या त्या मित्राची आठवण झाली. "अरे त्या तुझ्या मित्राने सांगितले होते ना कोचीनचा सुर्यास्त चुकवू नकोस म्हणून!"

मी चरफडत त्याला मनोमन चार शिव्या घातल्या. आता अश्या गोष्टी बायकोसमोर सांगायच्या असतात का? ज्या क्षणी "परत गेल्यावर लॅपटॉपसहीत त्याच्या घरी जायचे आणि काढलेला प्रत्येक फोटो दाखवून त्यावेळच्या सर्व परिस्थितीचे अगदी साद्यंत वर्णन करून (तेही वहिनींसमोर - अगदी मीठ-मसाला लावून) बदला घ्यायचा" अशी मनोमन प्रतीज्ञा केली त्याचक्षणी मनाला थोडीशी शांतता लाभली.

कोचीन...
अरबी समुद्राचा राजा म्हणून ओळखले जाणारे हे शहर. अतिशय विस्तृत असा समुद्रकिनारा लाभलेले हे शहर. संध्याकाळी ५ च्या दरम्यान आम्ही समुद्रकिनारी पोहोचलो. (नंतर कळाले की कोचीनचाच असला तरी हा समुद्रकिनारा वेगळा आहे. सर्यास्तासाठी प्रसिद्ध सागरतीर दुसरीकडेच आहे.) पण गेले दोन दिवस ट्रेनच्या प्रवासाने सगळेच कंटाळलेले असल्यामुळे या समुद्रकिनार्‍यावर (दुधाची तहान ताकावर) समाधान मानायचे ठरवले. पण सुदैवाने इथेही आमची निराशा झाली नाही.

पंछी अकेला...
प्रचि १
1

भास्करबुवांना परतीचे वेध लागलेले दिसताहेत हे लक्षात येताच आम्ही सगळे सरसावून बसलो...
प्रचि २
2

प्रचि ३
3

प्रचि ४
4

प्रचि ५
5

प्रचि ६
7

प्रचि ७
6

प्रचि ८
8

प्रचि ९
9

दुसर्‍या दिवशी सकाळी 'त्या' समुद्रकिनार्‍यावर गेलो. पण तोपर्यंत सुर्योदय होवून ४ तास उलटून गेले होते आणि सुर्यास्त व्हायला १२-१३ तास शिल्लक होते. त्यामुळे नुसतेच थोडे इकडे-तिकडे भटकून पुढचा रस्ता धरला. नाही म्हणायला तिथे असलेल्या 'चायनीज फिशींग नेट' ना भेट देणे झाले.

प्रचि १०
10

यानंतर बरोब्बर १२ दिवसांनी कन्याकुमारी...
इथे सुर्यास्त झाल्यावर जा असे मित्राने सांगितले होते. पण तरीही एका ठिकाणी जाता-जाता हळूच डोकावणारे भास्करराव भेटलेच...

प्रचि ११
12

त्यानंतर थेट सनसेट पॉईंट गाठला. सुर्यास्त नुकताच होवून गेला होता. आकाशभर त्याच्या खुणा पसरल्या होत्या...

प्रचि १२
12

हळुहळु तो लालीमा ओसरायला सुरूवात झाली. आकाशाला काळ्या अंधाराच्या पार्श्वभुमीवर त्याच्या मुळच्या निळसर रंगाने वेढायला सुरूवात केली.

प्रचि १३
13

प्रचि १४
14

प्रचि १५
17

प्रचि १६
15

प्रचि १७
16

अर्ध्यातासाने जेव्हा तिथून निघालो तेव्हा अंधाराच्या काळ्या रंगाने आपली जादू दाखवायला सुरूवात केलेली होती.

प्रचि १८
18

मित्रा, तुझे सल्ले यापुढे अपवादात्मक परिस्थितीत पण टाळायचे नाहीत असे ठरवले आहे मी !

विशाल..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कळ्ळं मला कोणत्या समुद्रावर गेलेलास ते Proud
त्यापेक्षा चेराईला एक चक्कर टाकायची होतीस
अजून मस्त फोटो मिळाले असते Wink

रच्याकने तुम्ही फोटो ग्राफर असे कोचीनला फिरून येता आणि भारी भारी फोटो टाकता
मग मी कोचीला काही म्हणलं की लोकांना वाटत असेल की मी खोटच सांगतेय Uhoh
त्याबद्दल तुमचा णीशेध Proud

मग जा वर्षभर राहून ये तिकडे
कान डोळे उघडे ठेवून Proud
अट इतकीच वहिनीला नाही न्यायचं सोबत

तुझा मित्र माझ्याही ओळखीचा आहे वाट्ट.
हा तोच काय बारा राज्याचं पाणी पचवलेला?? Wink

फोटो मस्त. Happy
१६ व्या फोटोत उजव्या खालच्या कॉर्नरला काय झालय? मला तिथे पांढरा रंग दिसतोय.

झकोबा, नाय हा दुसरा हाये..
मला पण नक्की ल़क्षात येत नाहीये आता Wink

शक्य आहे गिरीश...
मी योग्या किंवा चंदन किंवा अतुल नाहीये Happy
पण सांगितल्याबद्दल धन्यवाद Happy