'पुणे ५२' - चित्रबोध शब्दशोध स्पर्धा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 8 January, 2013 - 00:27

'विश्व नेमकं कसं निर्माण झालं?', 'विश्वात आपण एकटेच आहोत का?'पासून अगदी, 'खून झाला तेव्हा घरात कुणीच नव्हतं, मुख्य दार आतून बंद आहे. एसी चालू असल्याने खिडकीही बंद आहे. मग खून केला कुणी आणि कसा?', '...एका दारावरचा पहारेकरी नेहमी खरं बोलतो आणि एका दारावरचा नेहमी खोटं. केवळ एकच प्रश्न विचारून तुम्ही योग्य दार कसं शोधाल?' अशी माणसाला पडणारी असंख्य कोडी, अनेक रंजक प्रश्न. आणि त्या कोड्यांची बरोबर उत्तरं गवसली की मिळणारा आनंद. समोर दिसणार्‍या गोष्टींमधून मिळणार्‍या क्ल्यूंची साखळी जोडत, मेंदूला ताण देत, फसव्या क्ल्यूंना वेळीच ओळखून न भरकटता बरोबर उत्तरापर्यंत पोचणं, हा बहुतेकांना आवडणारा खेळ असतो.

'पुणे-५२'च्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत असाच एक खेळ.

pune52-30x40-trio-poster-hi-res_0.jpg

ही स्पर्धा सोपी आहे.

http://vishesh.maayboli.com/node/1322 या दुव्यावर दहा कोडी आहेत. प्रत्येक कोड्यात काही चित्रं आहेत.

या चित्रांचा एखाद्या व्यक्तीशी, घटनेशी, अंकाशी किंवा शब्दाशी संबंध आहे. ही व्यक्ती, घटना, अंक किंवा शब्द ओळखून तुम्ही त्या कोड्याचा क्रमांक असलेल्या चौकटीत लिहायचं आहे. चौकटी सर्व चित्रे संपल्यावर सर्वात खाली आहेत.

सर्वच्या सर्व दहा कोड्यांची उत्तरं ओळखलीत, की ही उत्तरं माध्यम प्रायोजकांच्या इनबॉक्सात पाठवण्यासाठी ’सुपूर्त करा’चं बटन दाबा. तुमच्या उत्तरांबरोबर अर्थातच तुमचा मायबोली आयडीही माध्यम प्रायोजकांपर्यंत पोहोचेल.

सर्व दहा कोड्यांची अचूक उत्तरं देणार्‍या पहिल्या पाच स्पर्धकांना मिळतील १७ / १८ जानेवारी, २०१३ रोजी मुंबई / पुणे इथे होणार्‍या 'पुणे ५२' या बहुचर्चित चित्रपटाच्या शुभारंभाच्या खेळाची प्रत्येकी दोन तिकिटं.

सर्व दहा कोड्यांची उत्तरं बरोबर आली नाहीत, तर जास्तीत जास्त बरोबर उत्तरं देणार्‍या स्पर्धकांना बक्षीस दिलं जाईल. बरोबर उत्तरं देणार्‍या दोन स्पर्धकांच्या प्रवेशिका एकाच वेळी आल्यास लकी ड्रॉ पद्धतीनं विजेते निवडले जातील.

या स्पर्धेची उत्तरं देण्याची मुदत १६ जानेवारी, २०१३, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ६ वाजेपर्यंत आहे.

१६ तारखेला विजेत्यांची नावं याच बाफवर घोषित केली जातील.

महत्त्वाच्या सूचना -

१. 'अरेच्चा, ते जोलीबाईंचं चित्र असलेल्या कोड्याचं उत्तर नेमकं चुकलं', (फोटोकडे बघत बसण्याचा हा परिणाम!!! :P) असं तुम्ही 'सुपूर्त करा'चं बटन दाबल्यानंतर लक्षात आलं, तरी हरकत नाही. तुम्ही पुन्हा एकदा योग्य उत्तर लिहून प्रवेशिका पाठवू शकता.

अशी दुसरी प्रवेशिका पाठवल्याची सूचना माध्यम प्रायोजकांना संपर्कातून द्यायला कृपया विसरू नका.

तुम्ही पाठवलेली शेवटची प्रवेशिका निकाल जाहीर करताना ग्राह्य धरली जाईल.

२. या कोड्यांची उत्तरं या बाफवर कृपया लिहू नका. उत्तरं जाहीर लिहिल्यास त्या आयडीची प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.

एखादं कोडं खूप कठीण वाटत असेल, तर तसं इथे लिहू शकता. माध्यम प्रायोजक एखादं कोडं सोडवण्यासाठी क्लू इथे देतील.

३. शुभारंभाच्या खेळाची तिकिटं चित्रपटनिर्मात्यांकडून देण्यात येतात. अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमात बदल झाल्यास तसं विजेत्यांना कळवण्यात येईल.

http://vishesh.maayboli.com/node/1322

तर मग तुमच्या 'करड्या पेशीं'ना लावा कामाला आणि पाठवा आम्हांला कोड्यांची उत्तरं! शक्य तितक्या लवकर! वेळेची उलटमोजणी सुरू झाली आहे...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रांवर नजर टाकली. प्रथमदर्शनी काही म्हणता काही कळत नाहीये...
पपसं-एक्सपर्ट शुरू हो जाओ...

एखादं उदाहरण दिलं असतं तर बरं झालं असतं >> +१ खरंच काही कळत नाहीये! Uhoh

मागे विपत्रामधून ते 'चित्रांवरून गाणी ओळखा' आलं होतं ते आठवलं!

थोडं काय बरंच अवघड आहे! चांगलंच खाद्य आहे डो़क्याला!

प्रथमदर्शनी काही म्हणता काही कळत नाहीये... +१ खरंच काही कळत नाहीये! Sad

पाहता पाहता दोन दिवस संपलेसुद्धा. वेळ वेगाने धावतो आहे. Happy

लोकहो, सगळ्या कोड्यांची उत्तरं पुणे-५२शी निगडित आहेत आणि चित्रं लक्षपूर्वक पाहिल्यास अगदी सोपी आहेत. तसेच, कोडी सोडवण्यासाठी क्ल्यू हवे असल्यास इथेच विचारू शकता.
मग करताय ना प्रयत्न?

माप्रा,

पहिल्यामधे "अपघात" अथवा "प्रेक्षणीय स्थळ" अपेक्षित आहे का?
दुसर्यामधे अचाट सिनेमा असा क्लू आहे का? की काही पौराणिक संदर्भ अपेक्षित आहे?? दोन सुटले तर पुढचे बघू!!!!

(....क्लूलेस नंदिनी)

२ उत्तर.खलनायक ???? विनोद खन्ना ने सुध्दा सुरुवातीला खलनायक भुमिका केलेली..तसेच विवेक ने सुध्दा आणि शाहरुख ने सुध्दा ......

नंदिनी, उदयन.. नाही.

कोड्यांची उत्तरं कुठल्या ना कुठल्या प्रकारे पुणे-५२शी निगडित आहेत. पुणे-५२शी संबंधित माहिती एकदा तपासा आणि मग कोड्यांतील चित्रांचा त्याच्याशी संबंध लागतो का पहा.

अवांतरः मी एक गोष्ट मार्क केली आहे. पण हा प्रॉब्लेम मलाच येतोय की अजूनही काही जणांना हे विचारायला इथे लिहित आहे. त्या कोड्याच्या लिंक वर गेल्यावर वरती नवीन लेखन ची जी लिंक दिसत आहे, त्यावर क्लिक केल्यास अजब पेज वर रीडायरेक्ट व्हायला होते आहे. Uhoh (http://vishesh.maayboli.com/navinlekhan - हे ते पेज)

हे काय गौडबंगाल आहे? Wink

उदयन, रंजक कनेक्शन. परंतु हा योग्य दुवा नाही. चित्रातील सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करा आणि त्याचा संबंध पुणे-५२शी कसा लागतो ते बघा.

नंदिनी, पुणे-५२ चित्रपटाच्या ग्रूपमधील माध्यम प्रायोजकांच्या पानांवर चित्रपटाची माहिती दिली आहे. उत्तरं त्या माहितीशी निगडित आहेत.

भेटले..............२ क्रमांकाचे उत्तर Wink
.
.
आता मी एकाचेच उत्तर दिले तर चालेल का????????

sandip,
Uttara krupaya war dilelya link war jaun submit kara. Ithe lihileli uttara grahya dharali janar nahit. Happy

पुणे ५२ ला "ए" सर्टीफिकेट मिळालय?..... का ही माहिती मिळेल का? लेकी बरोबर पुढच्या मंगळवारी जाणार होते... पण ए असेल तर हा सिनेमा सुट्ला हातातुन....

'पुणे ५२' हा चित्रपट १५ वर्षांखालील मुलांसाठी नाही.>>>>

पोपट!!!! माझा हुकला मग..... जेंव्हा केंव्हा टिव्ही किंवा सीडी येइल तेंव्हा पहाणे !!!!!

कथा, 'पुणे-५२'च्या तिकिटासंदर्भात संपर्क साधण्यासाठी तुमचा फोन नंबर कृपया chinmay@maayboli.com या पत्त्यावर कळवाल का?