विकृती
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
0
विकृती...
तू जगण्यातली कुरुपता
शोधत जगत असतेस
हतबल करुन टाकतेस
तुझ्या सानिध्यात येणार्या
प्रत्येक.. प्रत्येक जीवाला!
तुझ्या पुढे हातपाय टेकतात
सगळे प्रयत्न फोल ठरतात
नरक यातनेचे दर्शन घडवतात
सुखाचे चार क्षण हिरावले जातात!
मिळू नये तुला सोबत कुणाची
तू आधाराला निराधार करणारी!
लाभू नये तुला घरदार
तू अंगणात रक्ताचा सडा शिंपणारी!
येऊ नये तुझ्या वाट्याला नातीगोती
तू नसानसात विष घोळणारी!
फुलू नये तुझा संसार
तू कोवळ्या स्वप्नांना उध्वस्त करणारी!
पाहू नये कधी कुणी तुझी वाट
तू तिष्ठणार्याला जळत ठेवणारी!
लागू नये तुझी सावली कुणाला
तू जन्मभर पिच्छा पुरवणारी!!!
- बी
विषय:
प्रकार:
शेअर करा