Submitted by वैवकु on 4 January, 2013 - 07:43
संध्याकाळी तुळशीपाशी आई पणती लावत असते
तशीच माझ्या दु:खांना माझ्या गझलांची सोबत असते
नात्याची प्रत्यंचा ताणत शब्दबाण सोडुन मी थकता
डोळ्यांमधल्या पाण्यावर ती अख्खे भांडण जिंकत असते
सूर लावणे ठेका धरणे सगळे माझ्या हाती असते
तर माझे माणुसपण कुठल्या तालावरती नाचत असते
***गंतव्याची पाटी पाहुनही मी चढलो नसतो जर का ....
....आधी माहित असते की , श्वासांची गाडी लागत असते
"गालांवरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली".... म्हणताना ;
सावरकर "शायर"ही होते .... ही गदगद हेलावत असते !!
इथे वाह तू ..मनात माझ्या.. सांगितले पण ऐकत नाही
विठ्ठल काठावरती नसतो तरी भीवरा वाहत असते
__________________________
*** = कणखरजींचा एक शेर ट्रिगर सारखा वापरलाय
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नात्याची प्रत्यंचा ताणत
नात्याची प्रत्यंचा ताणत शब्दबाण सोडुन मी थकता
डोळ्यांमधल्या पाण्यावर ती अख्खे भांडण जिंकत असते
सूर लावणे ठेका धरणे सगळे माझ्या हाती असते
तर माझे माणुसपण कुठल्या तालावरती नाचत असते
***गंतव्याची पाटी पाहुनही मी चढलो नसतो जर का ....
....आधी माहित असते की , श्वासांची गाडी लागत असते
"गालांवरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली".... म्हणताना ;
सावरकर "शायर"ही होते .... ही गदगद हेलावत असते !!<<<
व्वा व्वा
सुंदर गझल
धन्स बेफीजी
धन्स बेफीजी
आयुष्याची गाडी लागत
आयुष्याची गाडी लागत आहे
वासाने अस्तित्वच भडभडलेले
असा माझा एक जुना शेर आठवला
पहिले चार शेर आवडले पण ते
पहिले चार शेर आवडले
पण ते "गंतव्याची" नाही कळालं मला
त्याला काही अर्थ आहे का?
बेफीजी होय ! बेफीकीरीत आहे तो
बेफीजी होय ! बेफीकीरीत आहे तो शेर मलाही आता आठवला धन्स
रिया मूळ शेर कणखरजींचा होता <<<<<<<<<<<<<
तुमची गाडी गंतव्याला घेउन जाते म्हणून केवळ
तुम्ही न पटले तरी निवडले असे यंत्रवत सोबत जाणे
गंतव्य म्हणजे मृत्यु असा अर्थ मी लावला ; गंतव्याचे ठिकाण = जिथे पोचायचे आहे ते ठि़काण
मग श्वासांची गाडी =आयुष्य व त्यावर गंतव्याची पाटी असे कल्पून रचना केली आहे
गाडी लागणे याचा एक अर्थ गाडीत बसल्यावर नॉशिया -ओमेटिंग होणे मळमळणे उलटी होणे
असा प्रकार 'मरापममं' च्या बस मधे (लाल डब्बा )अनेकदा पहायला मिळतो तोही अख्ख्या जगात फक्त महाराष्ट्रातच व तोही एस्टीतच बहुधा पहायला मिळत असावा
धन्स रिया !!
ओके ओके मी असाच काहीसा अर्थ
ओके ओके

मी असाच काहीसा अर्थ गृहित धरला होता
सुंदर गझल वैभव! प्रत्यंचा,
सुंदर गझल वैभव!
प्रत्यंचा, गाडी लागणे, नाचत सगळेच उत्तम शेर.
सावरकर आणि भांड्ण हे सुद्धा
सावरकर आणि भांड्ण हे सुद्धा सुंदर
कीप इट अप....
कसदार खयाल.अभिनंदन वैभव.
कसदार खयाल.अभिनंदन वैभव.
संध्याकाळी तुळशीपाशी आई पणती
संध्याकाळी तुळशीपाशी आई पणती लावत असते
तशीच माझ्या दु:खांना माझ्या गझलांची सोबत असते
नात्याची प्रत्यंचा ताणत शब्दबाण सोडुन मी थकता
डोळ्यांमधल्या पाण्यावर ती अख्खे भांडण जिंकत असते
गालांवरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली".... म्हणताना ;
सावरकर "शायर"ही होते .... ही गदगद हेलावत असते !!
इथे वाह तू ..मनात माझ्या.. सांगितले पण ऐकत नाही
विठ्ठल काठावरती नसतो तरी भीवरा वाहत असते
हे चारही शेर खूप आवडले.... जबरी गझल. कीप इट अप वैभवशेठ.
वैभव, संध्याकाळी तुळशीपाशी आई
वैभव,
संध्याकाळी तुळशीपाशी आई पणती लावत असते
तशीच माझ्या दु:खांना माझ्या गझलांची सोबत असते ...व्वा!
आवड्ला शेर.
पण...
नात्याची प्रत्यंचा ताणत शब्दबाण सोडुन मी थकता
डोळ्यांमधल्या पाण्यावर ती अख्खे भांडण जिंकत असते
या शेरात "ती" म्हणजे कोण? ..... नात्याची प्रत्यंचा..?
(कारण... (ती) नात्याची प्रत्यंचा, (ते) शब्दबाण, (तो) मी असे होईल.
दुसर्या ओळीतील "ती" म्हणजे नात्याची प्रत्यंचा असे मला वाटले. पण, प्रत्यंचा कशी जिंकेल...?
गझल आवडली. विशेषतः पहिला आणि
गझल आवडली.
विशेषतः पहिला आणि शेवटचा शेर.
सावरकर "शायर"ही होते .. छान
सावरकर "शायर"ही होते ..
छान
कणखरजी, डॉ.साहेब, जोशी साहेब
कणखरजी, डॉ.साहेब, जोशी साहेब , समीरजी , अकाश नील .धन्यवाद
भारतीताई विषेश आभार (' हेलावत' हा काफिया सुचवल्या बद्दल )
सुंदर..... नाव ''वैभव'' सार्थ
सुंदर.....
नाव ''वैभव'' सार्थ होऊ लागले.
व्वाह.... वैवकु, आज तुला
व्वाह.... वैवकु, आज तुला 'वैभ्याsssss' म्हणावेसे वाटते आहे !! लै भारी गझल... जाम म्हणजे जामच आवडली यार !
संध्याकाळी तुळशीपाशी आई पणती लावत असते
तशीच माझ्या दु:खांना माझ्या गझलांची सोबत असते
अप्रतिम !
सूर लावणे ठेका धरणे सगळे माझ्या हाती असते
तर माझे माणुसपण कुठल्या तालावरती नाचत असते
जबरदस्त !
हाच शेर असाही वाचून पाहिला -
माझे माणुसपण कुठल्या तालावरती नाचत असते तर/ जर
सूर लावणे ठेका धरणे सगळे माझ्या हाती असते
तीन स्वतंत्र मजा आल्या !!
***गंतव्याची पाटी पाहुनही मी चढलो नसतो जर का ....
....आधी माहित असते की , श्वासांची गाडी लागत असते
नीट कळला नाही.... पण मी फार मनावर घेतलं नाही !
"गालांवरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली".... म्हणताना ;
सावरकर "शायर"ही होते .... ही गदगद हेलावत असते !!
______/\______ !
इथे वाह तू ..मनात माझ्या.. सांगितले पण ऐकत नाही
विठ्ठल काठावरती नसतो तरी भीवरा वाहत असते
______/\______ ______/\______ ______/\______ ! !
अफ़ाट्ट!!
संध्याकाळी तुळशीपाशी आई पणती
संध्याकाळी तुळशीपाशी आई पणती लावत असते
तशीच माझ्या दु:खांना माझ्या गझलांची सोबत असते
नात्याची प्रत्यंचा ताणत शब्दबाण सोडुन मी थकता
डोळ्यांमधल्या पाण्यावर ती अख्खे भांडण जिंकत असते
इथे वाह तू ..मनात माझ्या.. सांगितले पण ऐकत नाही
विठ्ठल काठावरती नसतो तरी भीवरा वाहत असते
>> सुंदर!
अरविंदजी ,जितू , यात्रीजी खूप
अरविंदजी ,जितू , यात्रीजी खूप खूप आभार
______________________________________
'वैभ्याsssss' म्हणावेसे वाटते आहे >>>> मग म्हण ना यार !! मला खूपच आवडेल ते
धन्यवाद जितू या वाक्यासाठी
खुप सुन्दर गझल. >> नात्याची
खुप सुन्दर गझल.
>> नात्याची प्रत्यंचा ताणत शब्दबाण सोडुन मी थकता
डोळ्यांमधल्या पाण्यावर ती अख्खे भांडण जिंकत असते
हा फार आवडला.
>> इथे वाह तू ..मनात माझ्या.. सांगितले पण ऐकत नाही
विठ्ठल काठावरती नसतो तरी भीवरा वाहत असते
हा पण.
अप्रतिम गझल वैवकु !!
अप्रतिम गझल वैवकु !!
छान गझल... आवडली!
छान गझल... आवडली!
पारिजाता , प्रसाद्पंत , शामजी
पारिजाता , प्रसाद्पंत , शामजी , खूप खूप धन्स
मस्त रे ! आवडली आख्खी गझल.
मस्त रे ! आवडली आख्खी गझल.
गेले दिवस ते गेले, आता मी
गेले दिवस ते गेले, आता मी एकटा असतो |
संध्याकाळी आई आता, सिरिअल तुलसी ची बघत असते ||
प्रत्यंचा.. भीवरा..क्लास
प्रत्यंचा.. भीवरा..क्लास क्लास..!!
सुंदर..... सुंदर !! सगळेच शेर
सुंदर..... सुंदर !!
सगळेच शेर कमाल !!
प्रिया तै, प्रसाद , बागेश्री
प्रिया तै, प्रसाद , बागेश्री , जयश्री जी धनयवाद