Submitted by समीर चव्हाण on 26 December, 2012 - 14:31
उरले न आता चांदणे हृदयात पहिल्यासारखे
ते क्षण-प्रहर, महिने-ऋतू, दिनरात पहिल्यासारखे
मधुमास सरला, बहरही, ते मीलनाचे प्रहरही
कोठे जिव्हाळा, प्रेमही अपुल्यात पहिल्यासारखे
गंमत न आता राहिली वाटा नव्या जोखायची
ठेचाळणे उरले कुठे रस्त्यात पहिल्यासारखे
झाल्या प्रसंगातून तू शिक नेमके विसरायचे
हल्ली कुठे मी ठेवतो लक्षात पहिल्यासारखे
कुठल्या प्रभावातून मी घडलो कळेना नेमक्या
मंजूर नाही राहणे त्याच्यात पहिल्यासारखे
समीर चव्हाण
(हौस संग्रहातून)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सा. दंडवत गुरुवर्य !
सा. दंडवत गुरुवर्य !
समीर, अर्थात अनेकदा वाचलेली
समीर,
अर्थात अनेकदा वाचलेली आहेच, तरीही रसरशीतच वाटणारी गझल! ही तुम्ही 'गुलमोहर-गझल' या विभागातही देऊ शकालच.
दर्जेदार गझल!
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
सुर्रेखच...
सुर्रेखच...
मस्तच! गझल विभागात
मस्तच!
गझल विभागात टाकण्याबद्दल बेफिकीर ह्यांच्याशी सहमत.
झाल्या प्रसंगातून तू शिक
झाल्या प्रसंगातून तू शिक नेमके विसरायचे
हल्ली कुठे मी ठेवतो लक्षात पहिल्यासारखे...व्वाह
झाल्या प्रसंगातून तू शिक
झाल्या प्रसंगातून तू शिक नेमके विसरायचे
हल्ली कुठे मी ठेवतो लक्षात पहिल्यासारखे << व्वा ! >>
--- सुंदर गझल
सर्व शेर आवडले
सर्व शेर आवडले
झाल्या प्रसंगातून तू शिक
झाल्या प्रसंगातून तू शिक नेमके विसरायचे
हल्ली कुठे मी ठेवतो लक्षात पहिल्यासारखे
व्वा!!
सगळ्यांचेच मनःपूर्वक
सगळ्यांचेच मनःपूर्वक आभार.
समीर
समीर! छान आहे गझल! फक्त एक
समीर!
छान आहे गझल!
फक्त एक शंका आहे.......
शिकणे....क्रियापद
(तू)शिक बरोबर की, (तू) शीक हे बरोबर?
दोन्ही बरोबर आहेत.
दोन्ही बरोबर आहेत.
उत्तम गझल.. कुठल्या
उत्तम गझल..
कुठल्या प्रभावातून मी घडलो कळेना नेमक्या
मंजूर नाही राहणे त्याच्यात पहिल्यासारखे
मोठा कॉम्प्लेक्स शेर आहे !
कॉम्प्लेक्स शेर म्हणजे काय ?
कॉम्प्लेक्स शेर म्हणजे काय ?
ठेचाळणे आणि मक्ता दोन्ही
ठेचाळणे आणि मक्ता दोन्ही आवडले.
मस्तच ... सहज कळणारी,
मस्तच ... सहज कळणारी, गझल...
खरे तर गझल सहज कळणारीच हवी .. उगा चिंतन आणि प्रतिमांचे अन्वय लावण्यास रसिकास वेळ नसतो असे माझे मत आहे.
गंमत न आता राहिली वाटा नव्या जोखायची
ठेचाळणे उरले कुठे रस्त्यात पहिल्यासारखे>>>>> खूपच आवडला
व्व्वा ह ...
धन्यवाद!
कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंत
कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंत असलेला.. याचा दुसरा अर्थ एक संपुर्ण अनेक पदरी विचार असाही होतो.
गझल ही एक कॉम्प्लेक्सेस ची मालिका असते अशी देखील एक व्याख्या केली जाते.
सर्वच गझल छान आहे. पहिले २
सर्वच गझल छान आहे. पहिले २ शेर विशेष आवडले.
गझल आवडली. झाल्या प्रसंगातून
गझल आवडली.
झाल्या प्रसंगातून तू शिक नेमके विसरायचे
हल्ली कुठे मी ठेवतो लक्षात पहिल्यासारखे
>> व्व्वा!!! व्वा!!!!
गझलेची हीsssssssच मजा आहे... अगदी हीच... शब्दात सांगता येत नाहीये.. पण ये ब्बात है!!
धन्यवाद!
क्या बात है!
क्या बात है!
झाल्या प्रसंगातून तू शिक
झाल्या प्रसंगातून तू शिक नेमके विसरायचे
हल्ली कुठे मी ठेवतो लक्षात पहिल्यासारखे
कुठल्या प्रभावातून मी घडलो कळेना नेमक्या
मंजूर नाही राहणे त्याच्यात पहिल्यासारखे
वा वा वा
अप्रतिम गझल.
कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंत
कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंत असलेला.. याचा दुसरा अर्थ एक संपुर्ण अनेक पदरी विचार असाही होतो.
गझल ही एक कॉम्प्लेक्सेस ची मालिका असते अशी देखील एक व्याख्या केली जाते.>>>>>>>
धन्यवाद ढवळे सर