Submitted by _प्राची_ on 11 December, 2012 - 00:07
वसंत बापटांची एक कविता आहे. लग्नाला पन्नास वर्षे झालेल्या जोडप्यावर. ती विचारते की मी त्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसले होते ? तो उत्तर देतो पण ती प्रत्येक उत्तर खोडून काढते. असे अनेक प्रश्न ती विचारते. शेवट छान होता. तो म्हणतो इतकं पक्कं की त्यादिवशी रात्र लवकर सरली होती. शब्द नीट आठवत नाहीयेत. कोणाला पूर्ण कविता माहीत असेल तर टाकल का प्लीज ?
धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही कविता
ही कविता का?
http://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=WRDoUVo2dRM#t=535s
प्रश्न विचारला गेला, उत्तर
प्रश्न विचारला गेला, उत्तर बरोबर.
धन्यवाद !
धन्यवाद !
एकदम झक्कास... कविता
एकदम झक्कास... कविता
सुंदर कविता. कुणाल धन्यवाद!
सुंदर कविता. कुणाल धन्यवाद!
वसंत बापट यांची 'लावणी
वसंत बापट यांची 'लावणी अखेरच्या विनवणीची' ही कोणाकडे लेखी उपलब्ध आहे का? असल्यास प्लीज इथे देणार का? धन्यवाद!
सगळी आठवत नाहिये पण पहिल कडवं
सगळी आठवत नाहिये पण पहिल कडवं असं काहीसं होतं.
लावणी अखेरच्या विनवणीची-
आता जायाचच की कवातरी पटदीशी.
आम्ही साधू नव्हतो, नव्हतो योगी कुणी,
आम्ही छंदी फंदी नादी नाना गुणी
केली फसवा फसवी न कीतीदा पडलो फशी,
इष्काच्या पायी कैक जणींचे रुणी
आता जायाचच की कवातरी पटदीशी
मोस्ट्ली 'रसिया' मधे आहे ही लावणी. माझ्याकडे होतं रसिया. शोधाव लागेल. त्यात एक 'मुंबईची लावणी' पण झकास आहे.
मजकडे तू-नळी दिसत नाही प्लीज
मजकडे तू-नळी दिसत नाही प्लीज कोणीतरी ती कविता ईथे टाका की.
तू- नळीवरची पाहतो आता.. लावणी
तू- नळीवरची पाहतो आता..
लावणी पण मस्तचै..
अखेरच्या विनवणीची लावणी येथे
अखेरच्या विनवणीची लावणी येथे आहे. ऐकुन लिहुन काढता येइल.
http://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=7KfGZ9hLZ6A#t=71s
हा संपुर्ण कार्यक्रम आवर्जुन बघण्यासारखा आहे.