अवांतर : मायबोलीकर गझलकार बंधुभगिनींनो नमस्ते
मी नवाच एक कुणीतरी आपल्या चमूत दाखल होवू पाहत आहे तसे मी इथे काही महिने भेट देत आलो आहे पण सदस्यत्व आजच घेतले आहे
खालील रचनेत कोणावरही राग म्हणून शेर केले नाहीत हे आपण जाणालच म्हणा !!
खरे सांगू ...तुमच्या सगळ्यांकडूनच मी गझल शिकत आहे या रचनेत मी तुमच्यावरची श्रद्धा प्रकट करण्याचा प्रयत्न केला आहे
माझी गोड चिमटे काढत काढत लिहायची शैली तुम्हाला नक्की आवडेल !!
आपण दुखावले जाणार नाही याची शक्यतो काळजी घेतो आहे तरी चूक झाल्यास माफ करावे माझा अपराध पोटात घ्यावा ही विनन्ती
गझल :
वाद थांबावा असे काही करावे लागते
बेफिकिरसे भांडण्याला घाबरावे लागते
एक वाक्यच सांगुनी शिकवीन पर्यायी गझल
शेर असुदे कोणताही भादरावे लागते
जीत आणिक हार यांची काय तुलना मी करू
जर स्वत:ला जिंकताना मी हरावे लागते
तो तुझा प्राजक्त फुलतो दूरदेशी का असा
गंध येतो मायदेशी पण झुरावे लागते
ती तुझी आनंदयात्रा नेमकी भरते कधी
एकदा !!... पण वर्ष जावे आकरावे लागते
यार तू कणखर किती पण शेर हळवा केवढा
वाचला नाही तरी मन सावरावे लागते
शेकडो गझला तसे दसलाख मिसरे शोधले
ओळ तरहीची मिळाया डॉकटरावे लागते
या मनाच्या अंबरी निशिकांत पिकतो शेवटी
प्रथम हे आयुष्य अवघे नांगरावे लागते
सोडले आहे समाधी-ध्यान धरणे मी जरी
देसले साहेब दिसले की धरावे लागते <<<<<( ओळीचा चुकीचा अर्थ काढू नये )
ज्यास कंगाली खयालांची सतावे रोजची
खर्च करण्या विठ्ठलाला वापरावे लागते
एवढी रंगात मैफलयौवना येते ;कि उफ् !!
हाय .... पण मम शायरीला शंभरावे लागते !!<<<<<<<<(
)
~ नवाच एक कुणीतरी !!
आणखी काही आवडत्या गाझलकारांबद्दल जसे की शामजी ,अरविन्दजी ,जयन्ताजी, फाटक जी यांबद्दल शेर लिहिले असते पण काफिये आठवले नाही आहेत कृपया त्यांनीही मला आज माफ करावेच ही विनंती कुणाबद्दल अधिक -उणे बोललो असेन तर मोठ्यामनाने माफ करा
लोभ असूद्या !!
आता तुमच्यातलाच पण..... ~ नवाच एक कुणीतरी !!
मायबोलीवर हार्दिक स्वागत !!
मायबोलीवर हार्दिक स्वागत !!
बरेच मुरलेले दिसता की ......................
अनेक ओळी भावुक करून गेल्या !! गोड चिमटे जरा जास्तच दुखतात राव !!
ज्यास कंगाली खयालांची सतावे रोजची
खर्च करण्या विठ्ठलाला वापरावे लागते >>>> बर अस्सय होय .......मला माहीतच नव्हतं !!
आता तुमच्यातलाच पण..... ~ नवाच एक कुणीतरी !!>>>>हे वाक्य ज्जाम भारीये राव

-आता हा भरीचा शब्द वाटला
- तुमच्यातलाच़ काय ?? आज ना उद्या पितळ उघडं पडेलच !! जरा थांबा...........मग मी आहे अन तुम्ही आहात !!.............बघूया काय होते ते !!
स्वागत आहे! एन्ट्री तर एकदम
स्वागत आहे!
एन्ट्री तर एकदम सल्लू मियांवाली घेतली आहे तुम्ही ! लै भारी....!
धन्यवाद जितू सर वैवकु सर आपण
धन्यवाद जितू सर वैवकु सर
आपण महान आहात मी तुमची गम्मत केली तरी तुम्ही नाराज नाही झालात सर
कृपा अशीच राहुद्या
आपलाच
-एक कुणीतरी
स्वागत आहे , सुंदर
स्वागत आहे ,
सुंदर
धन्यवाद अनिलजी
धन्यवाद अनिलजी
is fun reading replies od
is fun reading replies od duplicate id to self. and calling self SIR too.
मस्त इयर एंडिंग मूड , पण
मस्त इयर एंडिंग मूड , पण कळतंय बरं का कुणीतरी कोण आहे ते. . :))
आवडली गझल.
थँक्स इब्लिस जी (इन्ग्रजी
थँक्स इब्लिस जी
(इन्ग्रजी अक्षरे कशी टाईप् करतात ते समजू शकेल कय प्लीज)
भारतीताई धन्स (सगळे तुम्हाला ताई म्हणतात म्हणून मीही म्हणत आहे नाहीतर.............आईच म्हणालो असतो!! .............गम्मत आहे बरका ही !!! {पण मनापासून केलेली}...)