Submitted by वैवकु on 22 November, 2012 - 22:49
प्रा .साहेबान्नी त्यान्ची पर्यायी गझल उपलब्ध करून दिल्याने मी निर्लज्जपणे मूळ गझल इथे तशीच ठेवण्याची काहीच आवश्यकता उरलेली नाही यासाठी ही रचना काढून टाकत् आहे
ज्यना मूळ रचना वाचायची आहे त्यानी ताकाची तहान प्रा.साहेबानी पुरवलेल्या तरहीच्या दुधावर भागवावी ही नम्र विनन्ती
धन्यवाद
आपला नम्र
वैवकु
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मतल्यातली पहिली ओळ फार आवडली
मतल्यातली पहिली ओळ फार आवडली पण दुसर्या ओळीने साफ निराशा केली. उगाच रचल्यासारखी वाटली.
दुसर्या शेरात विशेष काही सांगीतले गेलेले नाहीये.
वेगळीच इच्छा मनात आहे माझ्या
भाळलोय मी वेगळ्या कुण्या इच्छेवर
मुसमुसून मनपाऊस एवढा झडला
पण तुझ्या दयेला फुटला नाही पाझर
राहतोय मी गेली अठ्ठाविस वर्षे
पण रोज वाटते माझे नाही "हे" घर
हे तीन शेर अपेक्षा वाढवणारे आहेत.
लिहीत रहावे वैभव!
प्रतिसाद परखड वाटला तरी तू खट्टू होणार नाहीस ह्याची खात्री आहे.
मी आपला शतशः आभारी आहे कणखरजी
मी आपला शतशः आभारी आहे कणखरजी
उगाच रचल्यासारखी वाटली.>>>>>तसे नाही आहे पण तसे वाटणे शक्य आहे हे मान्य
दुसर्या शेरात विशेष काही सांगीतले गेलेले नाहीये.>>>>>> माझे वैयक्तिक मत अगदीच भिन्न !!
हे तीन शेर अपेक्षा वाढवणारे आहेत.>>>> मलाही तशी जाणीव होते हे शेर वाचल्यावर ....किम्बहुना गझलच बर्यापैकी जमून आली आहे असे मला व्यक्तिशः वाटते
प्रतिसाद अजिबात परखड वाटला नाही उलट अत्यन्त आवश्यक असाच वाटला
पुनश्च धन्यवाद !
आपला नम्र
-वैवकु
वैभवा! आम्हास तुझी ही गझल
वैभवा!
आम्हास तुझी ही गझल वाचताना जाणवलेल्या बाबी खालीलप्रमाणे........
१) शेर नंबर १.........
सानी मिस-याची उंची वाढवता यावी!
२) शेर नंबर २......
'नंबर' हा काफिया अजून चांगला व अर्थपूर्ण निभावला जाऊ शकला असता.
शेर नंबर ३.....
'वेगळी इच्छा' या शब्दांची शेरातील द्विरुक्ती खटकली. आशयघनतेत शेर कमी वाटतो!
शेर नंबर ४.......
उला मिसरा अजून जोरकस हवा होता.
शेर नंबर ५......
उला मिस-यातील अभिव्यक्ती अजून खुलवता यावी!
वर दिलेल्या शेरनिहाय जाणीवेंवरून, आम्ही तुझी गझल कशी वाचली ते देतो......
वैभवा! हे शेर तुझ्या गझलेला पर्यायी नव्हेत!
आम्ही दिलेल्या प्रत्येक शेरात तुझ्याच मनातील अर्थ असेल असे नाही!
निव्वळ काही खयाल म्हणून पहावे.
ही गझल तुझीच आहे!
तूच आहेस या गझलेचा जनक व मालक!
आम्हास सुचलेले शेर खालीलप्रमाणे............
नसतेच कधी जग दिसले इतके सुंदर!
जर तुझा न असता माझ्यामध्ये वावर!!
हा देह निसर्गामध्ये विलीन होतो.....
कोणाचा प्रथम, कुणाचा शेवट नंबर!
हे असे पाहिजे....तसे पाहिजे म्हणतो.....
जग चालत नाही असे तुझ्या इच्छेवर!
आभाळ फाटले, दुभंगली धरणीही!
पण, तुझ्या दयेला फुटला नाही पाझर!!
दारावर माझ्या नावाची पाटी, पण;
दररोज वाटते माझे नाही 'हे' घर!
...........प्रा.सतीश देवपूरकर

टीप: काहीही स्वीकारायचा आग्रह नाही!
प्र का टा आ
प्र का टा आ
वैभवा! आम्हास तुझ्याबद्दल आदर
वैभवा! आम्हास तुझ्याबद्दल आदर व जिव्हाळा आहे.
वडिलकीच्या(वयानेच फक्त बर का ) नात्याने काही सांगू का?
१) स्वत:वरचा, आपल्या लेखणीवरचा, चिंतनावरचा, विठ्ठलावरचा विश्वास कधीच ढळू देवू नकोस!
२) जे चांगले वाटते आपल्या आत्म्यास ते कधीही लाथाडू नकोस!
३) याचा अर्थ आम्ही वा अन्य कुणीही काही लिहिले की, ते स्वीकार असा नाही!
४) अंतर्मनास विचार, जसे उत्तर येईल, त्यप्रमाणे खुशाल वाग! बघ प्रसन्नता काय असते ते! आणि मग बघ शायरी कशी फुलते ती!
५) लिहून घेणारा विठ्ठल असतो, आपण फक्त निमित्ते असतो. अरे कसली आली तुलना? व कसला आलाय अहंकार? वा मीपणा?
६) तुझ्या मतल्यातील उला मिसरा इतका सुंदर आहे की, वाचता वाचताच आम्ही त्याच्या प्रेमात पडलो!
व लगेच ट्रान्समधेच गेलो व क्षणार्धात सानी मिसरा ओठावर आला, जो आम्ही वर दिला आहे
७) तुला सुचलेला पहिला मतला हाच जास्त चांगला होता. फक्त सानी मिस-यातली लय जरा सांभाळायला हवी. सानी मिसरा असा होवू शकतो,,,,,,,,,,,
हृदयात माझिया विठ्ठल, जर नसता तर!
८) नेहमी कुठलाही शेर लगेच फायनल करू नकोस. ब-याचदा गुणगुणत जा. गुणगुणताना मूळ हृदयातील काव्याचा विसर पडू देवू नकोस. त्याच्याशी तडजोड करू नकोस. त्याच्याशी पूर्ण तादात्मय पावण्याचा प्रयत्न कर. बघ काय फरक पडतो ते!
९) बढाई म्हणून सांगत नाही. पण जेव्हा हे चांगले की ते चांगले असा संभ्रम होतो, तेव्हा आम्हीच एकेका शेराला चार चार पर्यायी शेर देतो, त्या विठ्ठलाला साकडे घालून मग शेर फायनल करतो, बाकीचे पर्याय आनंदाने व प्रसन्नतेने बाजूस सारतो. करून पहा वैभवा! तू म्हणशील तुम्ही कोण मला सांगणारे? शिकवणारे? पण आम्ही तुला काही शिकवत नाही आहोत. फक्त आम्ही काय करत आलो आहोत ते सांगत आहोत!
१०) आपल्याला आलेल्या प्रत्ययाला नीट समजून घ्यावे, तटस्थतेने त्या प्रत्ययाला न्याहाळावे! त्यातील काव्यात्मकता चाचपून पहावी व मगच शेराकडे वळावे. बघ करून वैभवा!
११) बाकी शेरनिहाय काय म्हणायचे ते आम्ही लिहिले आहे व आम्ही दिलेल्या शेरांतून प्रात्यक्षिकही दाखविले आहे. याउपर तुझी मर्जी!
१२) आमच्या गझलेत संख्यात्मक वाढ करण्यासाठी आम्ही हे लिहीत नाही, आमचेच कितीतरी मतले वर्षानुवर्षे पडून आहेत, ज्यांच्यामधील गझला आमचा पिच्छा पुरवत असतात.
१३) कालचेच उदाहरण घे. कोण गंभीर विनोदी समीक्षक बरेच काहीबाही बरळून गेला. पण आमचा आमच्या लेखणीवरील विश्वास तिळमात्रही ढळला नाही! कारण आम्ही काय लिहितो ते आम्हास चांगलेच ठाऊक आहे
१४) उत्तर देता देता थांबलो कारण जी व्यक्ती आपले खरे नाव देखिल सांगू शकत नाही, कुठल्यातरी गोंडस बुरख्यातून/झग्यातून/झूल पांघरून काही तरी बरळते आहे व आम्ही आमचा बहुमूल्य वेळ, आमची प्रज्ञा, प्रतिभा का खर्ची पाडावी?
१५) हे तुला जे काही लिहीत आहे, त्यात आमचा वेळ सत्कारणी लागला असेच वाटत आहे कारण तू आतून बाहेरून आम्हास निर्मळ व पारदर्शक वाटलास! पोटात एक व ओठात दुसरे अशांच्या सावलीलाही आम्ही उभे रहात नाही, कारण आजवरच्या ५८वर्षात ब-याच विभूती पाहून झाल्यात ज्या आम्हास बरेच काही शिकवून गेल्या.
१६) वैभवा, तुझ्यापेक्षा आमची दोन्ही मुले(१मुलगा व १ मुलगी) वयाने ५/६ वर्षांनी तरी वडील आहेत.
मुलाला जे सांगितले असते तेच तुला सांगत आहोत . तू स्वत: सूज्ञ व उच्चविद्याविभूषीत आहेस, तुला आम्ही म्हातरे काय अजून सांगणार?
थांबतो!
....................प्रा.सतीश देवपूरकर
जाउद्या सर जे झाले ते विसरून
जाउद्या सर जे झाले ते विसरून टा़कण्याचा मीही प्रयत्न करतो आहे पण एक गोची आहे माझ्या स्वभावाची ........तुम्हाला आजवर अनुभव आलाच असेल माझा..
झाले-गेले विसरू म्हणता
झाले हेच कळाले नाही !!!
असो ! एक अशीच अप्रकाशित गझल पेश करतोय थोड्याच वेळात ..आस्वाद घ्यावा ही विनन्ती (म्हणजे विदाउट पर्यायी शेर आस्वाद घ्यावा असे म्हणायचे आहे
)
आणि हो ; मी बोलतो त्याचे वाईट वाटून घेवू नका ..कधी कधी मी डोके फिरल्यावर माझ्या बाबानाही असेच काहीबाही सुनावतो ..नन्तर वाटते वाईट.....पण उपयोग नसतोच!!
तुमच्याशी बोलताना तोच भाव असतो हे वेगळे सान्गायला नको ना?
तुमचा
-वैभवा
हा धागा मला समजलाच नाही. काय
हा धागा मला समजलाच नाही. काय झाले काय इथे, हे कृपया कळेल का?
धन्यवाद
भेटल्यावर सान्गीन बेफीजी
भेटल्यावर सान्गीन बेफीजी ............
(No subject)
. (सहानुभूतीपूर्वक)
.
(सहानुभूतीपूर्वक)