काळाच्या पंजाचा अंगठा छोटा ..
मी पहातो आहे घड्याळ ;
तसा घड्याळाचा एकेक काटा ..
सेकंद काटा
चोवीस तास वणवणणारा..
सेल संपेपर्यंत .
भोवळ आल्यासारखा गरगरणारा ..
काळाचा नेमका किती संचय करणार;
काहीच कसे ठाऊक नसणारा ..
आसक्तीच्या कोठल्या नशेत
धावतो आहे बिचारा ..
सेकंदांच्या बोळी ;
मिनिटांच्या गल्ल्या ;
तासांचे राजरस्ते ....
धावतो आहे बिचारा ..
काळाच्या जीवघेण्या मरणवाटा ;
सेकंद काटा ..
मिनिट काटा ;
चार पुस्तके वाचलेल्या ;
चार कीर्तने ,प्रवचने ,व्याख्याने ऐकलेल्या
मध्यमवर्गीय ..समज आलेल्या
सुजाणासारखा .
वणवणीची भणभण थोडी कमी करून
थोडा स्वत:साठी जगणारा .
प्रवृत्ती-निवृत्तीच्या तारेवर ;
थोडा चालत, थोडा थांबत
सावरण्याची कसरत करणारा ..
घाम पुसण्याइतका
कौटुंबिक विश्राम घेणारा .
सावध बेटा ..
मिनिट काटा
तास काटा ;
स्थिर तसा म्हणवत नाही ;
फिरतांना दिसत नाही .
तासांच्या मर्यादेत
काळाचे छोटे छोटे घास ..
दुनियेला भरवणारा .
अखंड कर्मयोगाच्या हातांनी ..
सन्यासाची दीक्षा देणारा ..
काळाच्या पंजाचा ;
अंगठा छोटा ..
तास काटा
ग्रेट ........ प्रतिभावंताला
ग्रेट ........
प्रतिभावंताला स्थूलापलीकडील दिसतं म्हणतात ... ते आता कळलं .
घड्याळ . वेळ सांगणारं वैज्ञानिक उपकरण . पण ,त्याच्या तीन काटयांचे जे अर्थ आपणास गवसले .. त्याबद्दल काय बोलू ... निशब्द .....
आभारी आहे ज्ञानोबाराया .
आभारी आहे ज्ञानोबाराया .
खूपच छान!
खूपच छान!