मसाप मध्ये डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचा जंगी सत्कार

Submitted by अ. अ. जोशी on 3 November, 2012 - 10:34

मसाप मध्ये डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचा जंगी सत्कार

डॉ. नागनाथ कोतापल्ले यांची ८६व्या अ.भा.साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष्यपदी निवड झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सायंकाळी कोत्तापाल्लेन्चा सत्कार पुण्याच्या मसापच्या सभागृहात झाला.

त्यावेळी अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. त्यातही रावसाहेब कसबे आणि अनंत दिक्षित हे विशेष. त्याचबरोबर उल्हास पवार, न.म.जोशी ई. उपस्थित होते.

कोत्तापल्ले यांचे स्वागत करण्यासाठी खास चौघडा वादन झाले. चौघड्यातील विविध तालांनी वादकांनी कमाल केली. स्वत: कोत्तापल्लेही त्यामुळे भारावून गेले.

मसापच्या अध्यक्ष असलेल्या डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी कोतापल्ले यांचा सत्कार करताच टाळ्या आणि चौघड्याने सभागृह दणदणून गेले.

त्यानंतर आमच्या सुचेतानांत प्रकाशनासह ४-५ प्रकाशक, साहित्य संस्था यांनी कोतापल्ले यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमातील बराचसा महत्वाचा भाग वर्तमान पत्रांमध्ये आलाच आहे. मात्र काही गमतीदार गोष्टी मी सांगतो.

परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांनी नेहमीप्रमाणेच दमदार भाषण केले. त्यात एक मुद्दा त्यांनी असा घेतला ...

'' सर, मला विशेष आनंद होतो आहे की तुमची आत्ता निवडा झाली. कारण, तुम्ही हलते- फिरते असतानाच्या वयात तुमची अध्यक्षपदी निवड होणे हेसुद्धा विशेष आहे.''

अरुण जाखडे यांनी सांगितले,

'' सर, निवड झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी सत्कार करताना आनंद होतो आहे. म्हणजे कसं की, लग्न झाल्याबरोबर सत्यनारायण केला कि सगळीकडे फिरायला मोकळे.''

रावसाहेब कसबे म्हणाले,

'' काही वेळा एकही ओळ न लिहीणारेसुद्धा अध्यक्ष झाले आहेत. मात्र आता एक अभ्यासक अध्यक्ष झाला हे चांगले झाले. आपल्या प्रचंड बहुमताने झालेली निवडच हे सांगत आहे.''

डॉ. कोतापल्ले यांनीही काही गमती सांगितल्या,

'' मला भांडण करणारे विद्यार्थी आवडतात. पूर्वी एकदा मी संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी बोरकरांचे नाव सूचित केले होते. तसे त्यांच्या विरुद्धही माझेच स्नेही उभे होते. निवडणूक झाली, बोरकर हरले. माझे विद्यार्थी माझ्याकडे पेढे घेउन आले. मला कळेना. पण विद्यार्थी म्हणाले, सर आम्ही म्हणता होतो ना! तुमचे खोटे झाले, आमचेच खरे झाले, बोरकर हरले आणि आमहाला जे हवे होते ते जिंकले. हे घ्या पेढे!"

डॉ. कोतापल्ले पुढे म्हणाले,

" ४-५ वर्षांपासून अनेक लोक मला सांगत आहेत कि तुम्ही संमेलनाची निवडणूक लढवा. मी पुढे ढकलत होतो. पण मी त्यांना सांगितले, की एक लक्षात ठेवा की, अ.भा. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्याशिवाय मी काही मरणार नाही हे नक्की! "

अतिशय मनमोकळेपणे साजरा झालेला हा सोहळा साहित्य विश्वाला नक्कीच पुढे घेउन जाणारा होता असे वाटते.

धन्यवाद!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.. ते सोडून कुठल्या उच्चभ्रू जातीवर म्हणे अन्याय झाला, त्यांचे मी पुनरुत्त्थान करणार, असला आक्रोश माजला, तेंव्हा कुणी काही नाही बोलले, आणि एक बहुजन मनुष्य अध्यक्ष झाला तर चालू झाले दळण , की हे सामान्यांचे प्रतिनिधित्व करत नाहीत म्हणून.>>>>> ह्या तथाकथित उच्चभ्रुंनी कोणती अस्सल साहित्य निर्मिती केली आहे? अमेरिकन, इंग्लिश, जर्मन लेखकांचे साहित्य, कविता ,नाटके बेमालुमपणे चोरायची ,इथे मराठीत आपल्याच बापाचे असल्याचा आव आणत छापायचे. पैसा कमवायचा.
पुरस्कार देणार्यात यांचेच जातभाई असल्याने उघड जातियवाद करायला मोकळे.
मानवी जीवनाचे वास्तववादी दर्शन, कंगोरे, दाखवणारे, सामान्य माणसाच्या जगण्याचं प्रतिनिधित्व करणारे साहित्य या बाजारबुणग्यांनी निर्मिले आहे काय?
हे तथातकथित साहित्यप्रभु फॅण्टसीतच जगणारे आणि तितकेच तकलादू लेखन करणारे आहेत.यांचे वास्तववादी लेखन म्हणजे मुलाकडे मुलीकडे अमेरीकेत गेलो तिथे आमच्या घराजवळच एक चायनिज कुटुंब राहत होते ते सकाळी पार्कात आम्हाला भेटायचे.... हे असले काहीतरी...
म्हणे उच्चभ्रुच

Befikirji, Very appropriate post. Even the politicians have to prove before the voters every 5 or less years . Apart from their stories of corruptions , they have to do something for society or country and listen to the sentiments and expectations of people.

These Sahitya Sammelan ppl especially The Adhyaksha do nothing for literature.He is not responsible to anybody once he is elected. Once upon a time there was a fashion to give 'Baang' from the stage about the Maha-karnataka border dispute. Now that has been stopped.

The Adhyaksh-Pad is a ornamental qualification like Padma Puraskaar. and final destination of a writer. Thats why they say Ï would not have died, unless I become Adhyaksha.

चोवीस तास कार्यरत असलेला एक 'कवी मंच' स्थापन करण्यात येऊन त्यावर सूत्रसंचालक म्हणून 'नकवींची' वर्णी लागते आणि वय वर्षे दहा ते वय वर्षे नव्वद यातील कोणताही इच्छुक स्टेजवर येऊन पाऊस, माहेर असल्या चोथा कविता ऐकवत बसतो.

काय चूक आहे त्यात? तुमच्या मते कसे असायला हवे? आणि वय वर्षे ४ -९० इतका स्पेक्ट्रम असेल तर पुन्हा हे जनतेचे प्रतिनिधित्व नाही, असे का म्हणायचे?

पुस्तकांची विक्री होते पण कोणाला आपली पुस्तके छापताच येत नाहीत हे अध्यक्ष आपल्या भाषणात सांगत नाहीत.

पुन्हा तेच! अहो, समजा केक तयार करण्याची एक स्पर्धा/ सम्मेलन असेल, तर तिथे लोकानी आपले केक मांडावेत, लोकानी आस्वाद घ्यावा.. आवडलेले केक खपतील. इतकेच अपेक्षित असते ना? आता तुम्ही म्हणालात की ज्यांची केक करण्याची पात्रता आहे, पण त्यांना केकचे मटेरियल मिळायला पैसे नाहीत, अशा लोकांचे अश्रू तिथे सम्मेलनाध्यक्षानी पुस्त बसावेत, तर ते योग्य आहे का? सम्मीलनाचा हा उद्देश असतो का? असे काम करायचेच असेल तर ते बॅक स्टेजला, निरंतर आणि दुसर्‍या टीमने करावे लागेल. की अध्यक्षाने अश्रू ढाळत बसावेत?

ह्या तथाकथित उच्चभ्रुंनी कोणती अस्सल साहित्य निर्मिती केली आहे?
साहित्यच कशाला, यानी काहीच चांगले निर्माण केलेले नाही. काम शून्य आणि बडबड दांडगी, असले उत्तरकुमार कोल्हे ठोकून ठोकून घालवले पाहिजेत,

पादुकानन्द | 6 November, 2012 - 02:29 नवीन
Befikirji, Very appropriate post. Even the politicians have to prove before the voters every 5 or less years. Apart from their stories of corruptions , they have to dosomething for society or country and listen to the sentiments and expectations of people.
These Sahitya Sammelan ppl especially The Adhyaksha do nothing for literature.He is not responsible to anybody once he is elected. Once upona time there was a fashion to give 'Baang' from the stage about the Maha-karnataka border dispute. Now that has been stopped.>>>>> अरे आनंदपादर्या, इंग्रची पावटे खाऊन इथे अपानवायु कशाला सोडतोस .तिकडे तुझ्या इग्रंजी बापाच्या घरी जा. कळले काय रे आनंदपाद्या.

काम शून्य आणि बडबड दांडगी म्हणजे तो महाभारतातील उत्तरकुमार.

असले लोक स्वतःला मिळाले नाही की द्राक्षे आंबट असे म्हणत फिरतात.

म्हणून असे लोक म्हणजे उत्तरकुमार कोल्हे. महाभारत + बालकथा कॉकटेल.

फार्टुकानंदा , समजले का?

hahaha ... is it son of Arjun and uttara?

Proud
व्यासमुनी मरतील रे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

अर्जुन आणि उत्तरा यांचा मुलगा उत्तरकुमार नव्हे,

उत्तरा ही अर्जुनाची बायको नव्हे, सून होती... अभिमन्युची बायको.

उत्तरकुमार हा उत्तरेचा भाऊ होता.

>>>
प्रातिनिधिक स्वरुपात मतदार निवडले जातात. म्हणजे मागील वर्षी 'अ' सदस्य कोल्हापूर शाखेतील पात्र मतदार असेल तर तो याही वर्षी मतदार असेलच असे होत नाही. त्याच्या जागी ती संस्था 'ब' चे नाव सुचवू शकते.
<<<

अशोकजी,
आपण म्हणता ते खरे आहे. कारण, दभिंनी मला ही गोष्ट सांगितली होती.

>>>
मराठी साहित्या मधला अजुन एक दुर्देवी दिवस.
<<<

कुठल्या अर्थाने...>>

कोत्तापल्लेंना साहित्यिक म्हणले जावे हा!!!

त्यांच्या बद्दल वयक्तीक काही वाईट नाही मनात

आतापर्यंत असे जाणवले आहे की श्री अशोक पाटील खरच संयमीत लिहीत असतात. पण कुठे ब्राम्हण, मराठे ( ह मो मराठे ) असा उल्लेख आला की इथल्या काहीजणांची कपाळाची शीर तडतडलायला लागते. मग ते डायरेक्ट जातीवरच घसरतात, मग साडे तीन टक्के काय, उच्चवर्णीय काय वाटेल ती मुक्ताफळे उधळली जातात. काही धरबंदच नाही.

ते प्रसाद बोलले की ह मो निवडले गेले नाही म्हणून तर लगेच ब्राम्हणांवर घसरण्याची काय गरज? प्रसाद यांचे एकट्याचे मत म्हणजे अखिल ब्राम्हण समाजाचे मत होत नाही हे कृपया लक्षात घ्यावे. आणी पुढे विचार करुन लिहावे, भाषा कृपया शुद्ध असावी, ( म्हणजे लिखाणात शिवीगाळ, वैयक्तीक आरोप, हेवेदावे नसावेत) आपण कुठे काय लिहीत आहोत याची सुद्धा शुद्ध नसेल तर काय उपयोग?

शनी आवरा आता, बास झाले.

>>साडेतीन आकडा वापरला तर एकेकांच्या पोटात का दुखतं, समजत नाही.
कृपया अशी चर्चा या धाग्यावर पण करू नये ही विनंती. (खरेतर कोणत्याच धाग्यावर करू नये)

ह मो निवडले गेले की नाही हा मुद्दाच नाहिये. कोत्तापल्ले ह्यांनी काय असे साहित्य निर्माण केले आहे ते मला कळले नाही. माझा आक्षेप कोत्तापल्ले निवडुन आल्या बद्दल आहे, ह मो न निवडुन आल्या बद्दल नाही.

ह मो काय, तेंडुलकर ( विजय ) जरी उभे राहिले असते तरी पडले असते ह्या जातिय राजकारणात.

कोत्तापल्ले ह्यांनी काय असे साहित्य निर्माण केले आहे ते मला कळले नाही.

साहित्याची क्वालिटी किंवा क्वांटिटी यावर अध्यक्षपद अवलंबून नसते, हे आपल्या बथ्थड टाळक्यात अजुन आलेले दिसत नाही. चार पुस्तक लिहिलेला साहित्यिकही निवडणूक लढवू शकतो आणि हजार पुस्तके लिहिलेलाही. कोतापल्ले साहित्यिक आहेत, इतकं क्वालिफिकेशन निवडणूक लढवायला पुरेसे असते.

भूतकाळात काय लिहिले आहे, याच्यापेक्षा भविष्यकाळातील त्यांचा अजेंडा याला मतदार अधिक पसंती देतात.

हे तुमच्या लक्षात येणारच नाही, कारण कधीकाळी लिहिलेली जुनी पोथी काखोटीला मारून तीच प्रत्येकवेळी वाचून चार दमड्या मिळवणे, यांचीच तुम्हाला सवय असणार.. साहित्य सम्मेलनातील अध्यक्षपद असे जुन्या पोथ्यांच्या इतिहासावर चालत नाही.

ह मो काय, तेंडुलकर ( विजय ) जरी उभे राहिले असते तरी पडले असते ह्या जातिय राजकारणात.

अनुमोदन, जातीय हँडबिलं वाटून अध्यक्षपदं मिळत नाहीत. अगदी अनुमोदन. हमोनी जातीय राजकारण केले, म्हणूनच ते पडले.

निवडणुकीला साधारण ९०० मतदान झाले म्हणे. ( ९०० लोक की मते माहीत नाही. ) साडेतीन टक्केंच्या हिशोबाने हमोना ४० - ५० मते पडायला हवी होती. पण प्रत्यक्षात त्याना १५० मते मिळाली.. हे नक्कीच चिंताजनक आहे.. बहुजनांमध्ये साहित्य अजून पसरायला हवे, त्यांचे लोक अजुन वाढायला हवेत. तरच हमोसारख्यांना साडेतीन टक्क्यावरच रोखता येईल. त्यापेक्षा एकही मत अशा लोकाना अधिक मिळू नये.

प्रसाद.....

वरील प्रतिसादात श्री.आंबा १ यानी जे लिहिले आहे "....साहित्याची क्वालिटी किंवा क्वांटिटी यावर अध्यक्षपद अवलंबून नसते....." याला माझे पूर्ण अनुमोदन आहे. ते एवढ्यासाठी की अशा निवडणुकीत मतदार [तो सूज्ञ आहे की नाही हा मुद्दा इथे घेण्यात अर्थ नाही] मतदान करताना उमेदवारांची साहित्यातील कर्तबगारी (च) पाहतो असे बिल्कुल घडत नाही.

योग्य असा जनसंपर्कही सातत्याने राखावा लागतो अशाप्रकारच्या निवडक मतदारांच्या पाठिंब्यांसाठी. मसापचे मतदार कशाप्रकारे ४ विभाग आणि ५ सहयोगी संस्थांच्या गावात विखुरले आहे याचे विवेचन या आधीच्या प्रतिसादात झाले आहेच.

त्या अनुषंगाने आता डॉ.नागनाथ कोतापल्ले आणि श्री.ह.मो.मराठे याना मतदारांशी जवळीक कशाप्रकारे साधता आली असेल याचा मागोवा घेतला गेला तर तुम्हाला असे आढळून येईल की, डॉ.कोतापल्ले हे सन १९८८ पासून १. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, २. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, ३. पुणे विद्यापीठ, ४. मुंबई विद्यापीठ, ५. एसएनडीटी विद्यापीठ, ६. सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बडोदा, ७. गुलबर्गा विद्यापीठ, ८. कर्नाटक विद्यापीठ, धारवाड, ९. विक्रम विद्यापीठ, उज्जैन, १०. बनारस हिंदू विद्यापीठ, या ठिकाणाच्या "मराठी विषयाच्या अभ्यास मंडळाचे" सदस्य....अगदी चेअरमन पदावरसुद्धा....कार्यरत आहेत. शिवाय महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, भारती विद्यापीठ, पुणे इथेही ते कार्यरत आहेतच. साहजिकच "मतदार...मतदार" म्हणून आपण ज्याना ओळखतो ती सारी मंडळी याच मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, इंदूर, गुलबर्गा, सांगली येथील "शैक्षणिक विश्वा'शी संलग्न आहेत आणि बोर्ड ऑफ स्टडिजच्या बैठकी दरम्यान अशा इच्छुक साहित्यिक-प्राध्यापक मंडळींचा आणि यांचा वारंवार संवाद, बैठका घडत असतातच. निवडणुकीला उभे राहण्याच्याही अगोदर कित्येक वर्षे यांचा एकमेकांशी अगदी अरेतुरे पातळीवर संबंध प्रस्थापित झालेले असतात....या सर्वांचा प्रत्यक्ष मतदानावर निश्चितच परिणाम होत असतो.

श्री.ह.मो.मराठे हे या जनसंपर्काबाबतीत डॉ.नागनाथ कोतापल्ले यांच्याशी कधीच स्पर्धा करू शकणार नव्हते......[बाकी तुमचा तो जातीय मुद्दा इथे कृपया वारंवार चर्चेला घेऊ नका....अकारण कटुता वाढीला लागत आहे.]

राहता राहिला मुद्दा डॉ.कोतापल्ले यांचा "साहित्यिक" या पदाला पात्र असण्याचा. तुम्ही लिहिले आहे वर...."कोत्तापल्ले ह्यांनी काय असे साहित्य निर्माण केले आहे ते मला कळले नाही." हे वाक्य डॉ.कोतापल्ले यांच्या लेखन कर्तृत्वावर अन्याय करणारे आहे....तेव्हा याबाबत इतकेच म्हणत आहे की, महाराष्ट्र राज्य शासन 'उत्कृष्ट वाङ्मयीन' कृतीला दरवर्षी पुरस्कार प्रदान करीत असते.....त्यातील कादंबरी, कविता, लघुकथा, समीक्षा, ललित....अशा प्रत्येक विभागात त्याना उत्कृष्ट कलाकृतीचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ही मिळकत त्याना 'साहित्यिक' दर्जाला पात्र ठरवितेच.

अशोक पाटील

आंबा१
आपण म्हटल्याप्रमाणे,
"साडेतीन टक्केंच्या हिशोबाने हमोना ४० - ५० मते पडायला हवी होती." असेल असे वाटत नाही. कारण एकूण ९०० की काय त्या मतांमध्ये कोणत्या जातीचे किती मतदार होते हे निदान मला तरी माहित नाही. तुम्हालाही माहित नसणार. मात्र इतके नक्की आहे कि जातीयवाद सोडून कोत्तापल्लेंना मतदान झालेले आहे. कारण, तुम्हाला ज्या ३.५ टक्यांबद्दल अनादर आहे त्यापैकी अनेकांनी प्रथमपासूनच कोत्तापल्ले यांचे नाव सांगायला सुरूवात केली होती. याचे कारण अशोकजी यांनी दिले आहेच.

अशोक पाटिल तुमच्याशी मी तरी ( अशोकराव म्हणणे श्रेयस्कर होते, पण औपचारीकता वाढते आणी माबोवर ती नसावी) एकदम १००००० टक्के सहमत.

मागे आपले प्रसिद्ध साहित्यीक आणी संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. यु. म. पठाण म्हणाले होते की संतांना सुद्धा जातियतेत आणी धर्मात अडकवु नका. म्हणजे ज्ञानेश्वर ब्राम्हणांचे, सावता माळ्यांचे. गोरा फक्त कुंभारांचे आणी चोखा फक्त महारांचे ( आता संत चोखा हे महार जातीतले असल्याने त्यांच्या पुढे कायम तेच नाव लावले गेलेय, पण म्हणून ते एकट्या महारांचे नव्हे तर अखिल मानवजातीचे होतात ) असे नाव लावु नका.

पण आज दुर्दैवाने नेमके तेच घडते आहे. संत असो, साहित्यीक असो वा कलाकार यांना जातीयतुन बाहेर काढा. एकमेकांना जातीवरुन वा जातीवाचक शिव्या दिल्याने काय समाधान मिळते आहे तेच मला कळत नाही.:रागः

उलट कोणी कोणी काय साहित्य निर्माण केले याचीच इथे माहिती देऊन ती वाचण्याचा आनंद मिळवा म्हणजे मनातले काळेबेरे पण जाईल.

आमच्या इथे प्रत्येक चर्चेला जातियवादी रंग चढवून मिळेल अशी पाटी लावली पाहिजे.

आम्ही कोतापल्ली काय ,मराठे काय दोघांपैकी एकाचीही एकही साहित्यकृती वाचलेली नसल्याने या प्रश्नाला पास देत आहोत.
Happy

अशोक, टुनटुन +१

अशोकजी,
पुन्हा आपले म्हणणे खरे आहे. कारण, या सर्व गोष्टींचा उल्लेख या सभेत झाला होता. बोलता बोलता प्रा. मिलिंद जोशी यांनी, 'आपण मॅनेजमेंट गुरूंना भेटला असतात तर आणखी उपयोग झाला असता.' असे डोळे मिचकावित गंमतीने सांगितले. तर त्यावर बोलताना कोत्तपल्ले यांनी, 'आपण निवडणुकी पूर्वी मॅनेजमेंट गुरूंना भेटलो होतो' असे मिष्किलतेने सांगितले.

जनसंपर्क हा कोणत्याही निवडणुकीत महत्त्वाचा ठरतो. कारण, उत्कृष्ठ साहित्यिक म्हणून अनेक पुरस्कार अनेकांना देता येतील. पण, अध्यक्षपद हे नाही म्हटले तरी थोडे व्यवस्थापकीय पद आहे असे मला वाटते. त्यामुळे कोत्तापल्ले यांचा विजय तसा निर्विवादच होता.

pan Kottapalle Brahman nasalyane nivadoon yaayalaa nako hote ase Prasad 1971 yaanche mhaNane disatey...
Tyaamule te Kotapalle yanchya sahityik kaaryakaDe durlaksh kareet aahet.
tyaanaa Hamo chi pustake mahit aahet aaNi Kotapallenchi maatra nahit mhanaje Prasad sahityache jaNkar naaheet. mag te hi charcha kashi karu shaktat?

@ टुनटुन ~
तुम्ही माझ्या प्रतिसादाबद्दल व्यक्त केलेल्या भावनांबद्दल मी आपला आभारी आहे. खरे तर 'साहित्य' तसेच 'साहित्यिक' हे दोन्ही विषय फार जिव्हाळ्याचे आहेत....माझ्यासाठीच नव्हे तर इथल्या प्रत्येक मराठी भाषा प्रेमींसाठी. पण [दुर्दैवाने] होते असे की अकारण असो वा सकारण असो कुठेतरी केव्हातरी चर्चेची गाडी रुळावरून घसरू लागते आणि मग मूळ विषय दूर सांदरीत जाऊन पडतो आणि ग्यानबातुकारामापासूनची ती जातीयवादाची जुनीपुराणी भूते कबरीतून बाहेर येऊन आपल्याभोवती रिंगण घालू लागतात. सांप्रत महाराष्ट्र देशाला अशाच या जातीयवादाने पार ग्रासले असताना किमान 'साहित्य' हे क्षेत्र तरी या गर्हणीय अशा वादापासून अलिप्त राहावे असे ज्याना वाटते त्यात मी माझा समावेश नक्की करत असतो.

१९७४ मध्ये इचलकरंजी इथे पु.ल.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या साहित्य संमलेनापासून जवळपास प्रत्येक संमेलनाला मी केवळ हजेरी लावली नसून १९८३ मध्ये अंबेजोगाई इथे व्यंकटेश माडगूळकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या संमेलनाच्या प्रक्रियेमध्ये अगदी खारीचा का असेना पण वाटा उचलला आहे. १९९२ चे कोल्हापूर {रमेश मंत्री}, १९९३ चे सातारा {विद्याधर गोखले}, २००३ कराड {सुभाष भेंडे}, २००८ चे सांगली {प्रिं.म.द.हातकणंगलेकर} या निवडणूकीमध्ये तर या विजेत्या उमेदवारांसमवेत मतासाठी दौरेही केले आहेत..... आमच्या कोल्हापूरचा याबाबतीतील अनुभव तर वैयक्तिक पातळीवर माझ्यासाठी फार कटुता निर्माण करणारा होता, ज्याचा इथे उल्लेखही आता करणे जरूरीचे नाही, कारण ते सारेच कांड आता इतिहासजमा झाले आहे.

~ मुद्दा असा की, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी उभे राहाणार्‍या प्रत्येक इच्छुक उमेदवाराला आपले हात कशाप्रकारच्या रंगाने या प्रकरणी रंगणार आहेत याची पुरेपूर कल्पना असते. मतासाठी कोणत्या राजकीय नेत्याच्या दारात जाऊन उभे राहावे लागणार आहे याची माहितीही त्याना पाठिंबा देणार्‍यांनी.....यात प्रकाशक लॉबीही येते.... अगोदर सांगितलेले असतेच. उच्चपदस्थ राजकारणी तर जाऊ देत, पण तालुका पातळीवरील एखाद्या साखर कारखान्याचा चेअरमनदेखील 'तुम्हाला अमुकतमुक यांची मते मी आणून देतो...' असे आश्वासन ज्यावेळी देतो, त्यावेळी हे साहित्यिक ते कसे काय घडू शकते ? याचा अजिबात विचार करीत नाही...इतका मिंधेपणा नंतरनंतर उमेदवारांच्या हाडामांसी भिनला जातो.

असो....पाहिले तर साहित्य संमेलन ही साहित्य विश्वातील ही एक निर्मळ घटना असली पाहिजे, पण सद्यस्थितीत त्याला कुस्त्याच्या मैदानाचे स्वरूप प्राप्त झाले आहे ही मानली तर खेदाची बाब.....पण तसा खेद वा खंत ना विजयी उमेदवाराला, ना पराभूताला.....शिवाय "उद्या पुन्हा हाच खेळ...." नावाचे न-नाट्य पुढील साली दिमतीला त्याच उत्साहाने तंबू घेऊन येतेच.

त्यामुळे तुमच्यामाझ्यासारख्या साहित्यप्रेमीनी एकदा का निवडणूक निकाल जाहीर झाला की विजयी उमेदवाराला त्याच्या वर्षभराच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊन आपल्या नित्यनेमाच्या कामाला लागणे हेच हितकारक समजणे योग्य.

अशोक पाटील

अगदी बरॅक ओबामा व रोम्नींबद्दलही आपल्याला थोडीफार माहिती असते पण अलिकडे मराठी साहित्य इतके मुबलक प्रकाशित होत आहे व तरीही दुर्दैवाने त्यातली बरीचशी केवळ हौस/ स्वतःचे महत्व वाढवण्याचे साधन/ प्राध्यापकांच्या चरितार्थातले एक बाय-प्रॉडक्ट/कंपूशाहीतून पोसलेल्या 'प्रतिभे'चे आविष्करण अशा प्रकारची लागवड असते असे दिसते. अशा स्वरूपाच्या पुस्तकांच्या मार्‍यामुळे व एकीकडे गतीमान व्यग्र जीवनशैलीमुळे चांगली पुस्तकेही नजरेतून निसटू शकतात.

मा.कोत्तापल्ले यांचे काहीच लिखाण न वाचल्याने मलाही त्यांच्याबद्दल कोणतेच विधान करता येणार नाही.. ते मराठवाड्याचे आहेत, कधीकधी मराठवाड्यातील विद्वान माणसे पुण्यामुंबईच्या रडारवर न आल्याने उपेक्षित रहातात हे मान्यच आहे,पण त्यांनी सांगितलेली बोरकर यांची 'गंमत' आवडली नाही. बोरकरांना मात देणारा या कथेतील कोणीतरी क्षुल्लक जीव केवळ निवडणुकीच्या तंत्रावर निवडून येतो यातच सारे आले !

रच्याकने कोमसापच्या संमेलनाध्यक्षपदी निवडून आलेले अशोक नायगांवकर निदान एक असे चांगले कवी तरी आहेत, मनाला बरे वाटले त्यांच्या निवडीने..तो दर्जा अशोक बागवे यांना देता आला नसता. ह.मो. चांगले लेखक आहेत पण चुकीच्या वादात शिरले. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती.

शेवटी, केवळ मुक्तःछंद लिहून कवी म्हणून प्रस्थापित झालेल्यांबद्दलचे बेफिकीर यांचे विचार अगदी बरोबरच..चांगल्या कवीला चांगलं छंदोबद्ध लिहिता आलंच पाहिजे.
इथे मी माझा प्रतिसाद स्वयंसंपादित करत आहे कारण त्यामुळे विषयांतर होते आहे.

प्रभा गणोर्कर अनि (पति वसन्त दहाके )यान्ची सहित्यसेव कहिच नाही असे म्हनयचे आहे का? किमान ३५ वर्षे तरी त्या कवित लिह्त अहेत्.आनि मुक्तचन्दतील कविता म्हनत येतात का? तन्त्रपेक्शा आशय अणि अनुभुति महत्वचि नही का? तन्त्रच महत्वचे असेल तर ट ला ट लवणरे कवि माबो बरच ढीगने मिलतिल.

मराठी माध्यमात शिकणार्‍या १०वी पर्यंतच्या ९०% मुलांना शांताबाईंचेही काही 'पट्कन उद्धृत; करता येणार नाही. मग काय करावे?

ओबामा अन रोम्नी मधे इंटरेस्ट असला तर माहिती होते. आमच्या गावात रोम्नी कोण असे विचारत फिरलात तर हजारातून २ देखिल निघणार नाहीत माहिती असलेले. जो माहितीच नाही त्याच्या बद्दल आपल्याला असेच वाटते.

शिवाय प्रतिसाद संपादित करून अर्थाचा रोख बदलला, तर 'स्वयंसंपादित' असे लिहावे म्हणजे खालचे प्रतिसाद भडकाऊ इ. वाटत नाहीत.

Pages