Submitted by हर्षल_चव्हाण on 1 November, 2012 - 05:56
आपण आपले भले बुरे,
हवे कुणाला हार तुरे?
उभ्या रहिल्या भिंतीना,
प्रेमाचा आधार पुरे...
घरट्यामधले पिलू मोकळे,
आभाळाची कास धरे...
रोख कुणाचा कसा असावा,
कुणी सांगावे; काय बरे?
गोंधळ जगती फार जाहला,
कानी कोण हे गूज करे?
अफलातून ही दुनिया रे,
खोट्याचेही करे खरे...
दोन क्षणांचा प्रवास जीवन,
जगता जगता सहज सरे...
म्हणून जगणे समजून घ्यावे,
सरल्यावरती काय उरे?
------------------------------------------------------------------------------------
हर्षल (१/११/१२ - दु. ३.२०)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दोन क्षणांचा प्रवास
दोन क्षणांचा प्रवास जीवन,
जगता जगता सहज सरे...
<<< वा
(गझलेच्या अंगाने जाणारी चांगली रचना )
बेफिंशी सहमत आहे. आवडली रचना.
बेफिंशी सहमत आहे. आवडली रचना.
आवडलीच रचना हर्षल..
आवडलीच रचना हर्षल..
धन्यवाद बेफिजी, प्राजू आणि
धन्यवाद बेफिजी, प्राजू आणि बागेश्री
चांगली रचना आहे !
चांगली रचना आहे !
धन्यवाद मुक्तेश्वर
धन्यवाद मुक्तेश्वर
सहज,सुलभ,अतिसुंदर!
सहज,सुलभ,अतिसुंदर!
धन्यवाद
धन्यवाद
आवडली,
आवडली,
सुर्रेखच.
सुर्रेखच.
सर्वांशी सहमत ! ज्जाम आवडली
सर्वांशी सहमत !
ज्जाम आवडली
कविता सहज सुंदर आहे ,वाचता
कविता सहज सुंदर आहे ,वाचता वाचता कवितेत एक कविता दिसली ती अशी
भले बुरे
हार तुरे
भिंतीना
आधार पुरे..
पिलू मोकळे,
कास धरे
रोख असावा,
काय बरे?
गोंधळ जाहला,
गूज करे
ही दुनिया रे,
करे खरे..
प्रवास जीवन
सहज सरे...
समजून घ्यावे
काय उरे
शशांक, वैभव : खूप धन्यवाद
शशांक, वैभव : खूप धन्यवाद प्रतिसादाबद्दल
विक्रांत : हे ही छानच आहे धन्यवाद