दु:ख झाले पाखरू

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 31 October, 2012 - 05:13

आज माझ्या वेदनेला
पंख हसरे लाभले
दु:ख झाले पाखरू
अन नाचु गाऊ लागले

भिरभिरीची पाखराच्या
सवय होऊ लागली
वेदनेच्या जाणिवेची
गरज भासू लागली

दूर झाले मग सुखाच्या
पाश सारे तोडले
जीव जडला वेदनेवर
दु:ख मिरवू लागले.

भेटते जेव्हा नव्याने
वेदनेला त्या जुन्या
जाग येते जीवनाच्या
मैफिलीला मग सुन्या

जयश्री
३१.१०.२०१२

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचताना लय तुटतेय! Sad <<<

कुछ लेते क्यूं नही? Light 1 (नाचू चे नाचु करणे सोडले तर लय ठीक आहे बुवा)

यात मैफील सुनी आहे.

अभिनंदन, कालपरवाच नाचणं सुधारा असे कोणी कोणाला म्हंटल्याम्हंटल्या अंगण कित्ती वाकड्डंय म्हणून कट्टी घेण्यात आली आणि त्या कट्टीची गट्टी होण्यासाठी कवितेकडे ढुंकून न बघणार्‍यांची रीघही लागली

कविता आवडली, लोभस आहे, हे कडवे अधिक आवडले:

>>>भिरभिरीची पाखराच्या
सवय होऊ लागली
वेदनेच्या जाणिवेची
गरज भासू लागली<<<

Happy

मी 'मन वढाय वढाय' च्या चालीत वाचली होती. सॉरी!<<<

त्यात काय राव सॉरी, गंमत चाललीय! (म्हणूनच दिवा दिला)

Happy

माझं ना जनरली असं होतं की एखादी कविता वाचली की तिची लय डोक्यात राहते आणि पुढची प्रत्येक कविता आपोआप त्याच लयीत वाचण्याचा चुकून प्रयत्न होतो Proud
अगदी "नवीन लेखन" मधल्या धग्यांची शीर्षकेही तशीच वाचली जातात माझ्याकडनं Sad
(गझल वाचून पण तेच होते.)

अगदी "नवीन लेखन" मधल्या धग्यांची शीर्षकेही तशीच वाचली जातात माझ्याकडनं <<< हे अतोशय भारी विधान आहे. आवडले. Biggrin आवडून हासत आहे, तुम्हाला हासत नाही आहे.

(गझल वाचून पण तेच होते. <<< Lol

हसू नका Proud

आता "मन वढाय वढाय" ह्या चालीत "पुण्यातले पुणेकर", "जपानबद्दलच्या गप्पा", "सय्यद मकबुल सय्यद हजमियॉँच्या निमित्त्याने" इ. शीर्षके वाचून बघा. Wink

सॉरी. कवितेच्या प्रतिसादांमध्ये आपण यडपटपणा चालवलाय. Sad

कवे, निंबी बघ काय म्हणतेय "अगदी "नवीन लेखन" मधल्या धग्यांची शीर्षकेही तशीच वाचली जातात माझ्याकडनं अरेरे
(गझल वाचून पण तेच होते.)

त्यला म्हणतेय मी, Proud