प्रवेशिका - १४ ( kautukshirodkar - भेटलो शब्दात नाही... )

Submitted by kaaryashaaLaa on 2 October, 2008 - 23:51

भेटलो शब्दात नाही...
आणि प्रत्यक्षात नाही!

जमवले कित्येक मोती
गोवले धाग्यात नाही

बांधतो मी रोज पुल.. पण
सांधणे हातात नाही

पेरतो वाटेत काटे
फूल मज भाग्यात नाही

साजरे केलेत सण मी
'घर' जरी वाड्यात नाही

देव हा ही पावतो ना?
रांग का दारात नाही?

फास घे तू धोतराने
लाज या नेत्यात नाही

आसवे डोळ्यांत त्यांच्या
ओल ती गाभ्यात नाही

माकडे ती तीन... बापू,
आज या देशात नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला सगळेच शेर खूप आवडले. चपखल रचना आणि आशय यांचा सुरेख मेळ. गुणगुणाविशी वाटावी इतपत छान.

देव हा ही पावतो ना?
रांग का दारात नाही?

आसवे डोळ्यांत त्यांच्या
ओल ती गाभ्यात नाही

हे दोन शेर एकदम जमेश... माझे ५ गुण..

Pages