प्रवेशिका - १४ ( kautukshirodkar - भेटलो शब्दात नाही... )

Submitted by kaaryashaaLaa on 2 October, 2008 - 23:51

भेटलो शब्दात नाही...
आणि प्रत्यक्षात नाही!

जमवले कित्येक मोती
गोवले धाग्यात नाही

बांधतो मी रोज पुल.. पण
सांधणे हातात नाही

पेरतो वाटेत काटे
फूल मज भाग्यात नाही

साजरे केलेत सण मी
'घर' जरी वाड्यात नाही

देव हा ही पावतो ना?
रांग का दारात नाही?

फास घे तू धोतराने
लाज या नेत्यात नाही

आसवे डोळ्यांत त्यांच्या
ओल ती गाभ्यात नाही

माकडे ती तीन... बापू,
आज या देशात नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेर खूप झालेत पण एकाच जमिनीवर आधारीत नाही वाटलेत. शेवटचे ३ शेर वेगळ्या जमीनीवरचे वाटतात आणि त्या आधीच वेगळे.. स्वकेंद्रीय भावनेतून लिहिलेले वाटतात.

ऐकूण गुण - ५

मतला कातील.

मोती, देव, आसवे....आ....हा....!!!

देवच्या शेर बद्दल विशेष अभिनंदन!!

७ गुण
------------------------------------------------------------
अव्यक्ताचे धुके दाटता.....व्यक्त साठते दवबिंदूसम !

बी,

गझलच्या संदर्भात जमीन म्हणजे विषय नाही.

जमीन म्हणजे रदीफ, काफिया, अलामत आणि बेहेर (वृत्त) यांनी बनलेली चौकट, जी मतल्यामुळे ठरते आणि नंतरच्या सगळ्या शेरांना पाळावी लागते. कार्यशाळेत याबाबत चर्चा झाली आहे आधी.
(संदर्भासाठी
http://www.maayboli.com/node/3625
http://www.maayboli.com/node/3647
हे दुवे पहावेत.)

तसंच गझलचे शेर एका विषयावर वा एका मूडचे असावेत असं बंधन नसतं. पारंपारिक गझलमधे ते तसे नसतातही.
त्या अर्थी गझल हा एक सारखी जमीन पाळून लिहीलेल्या ५ किंवा अधिक स्वतंत्र कवितांचा समूह असतो असं म्हणता येऊ शकेल.

==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

ही गझल संमिश्र झाली आहे असे वाटले. काही शेर काढले असते तर छान झाली असती.. जसे 'धोतर'..
तसेच 'पुल' हे बरोबर आहे की ती सूट घेतली आहे? देव, बापू, मोती छान.
माझ्याकडून ५ गुण.

जमवले कित्येक मोती
गोवले धाग्यात नाही>>>इथे गोवले च प्रयोजन कळलं नाही साध सरळ ओवले हा शब्द असताना, साधारण पणे एखाद्या कटात किंवा वाईट कामात गोवलं गेलं अश्या साठी गोवले जाणे असं वापरतात (?)
तसाच अर्थ हवा असेल तर माझी समज तोकडीच पडल्ये. समजून घेण्याचा प्रयत्न करतिये.

सगळे शेर छान----५ गुण

सगळे शेर छान----५ गुण

मतला एकदमच झक्कास.
'पुल'? - साधणे स्पष्टं होत नाहीये.
देव, ओल आवडले.
आणि छोट्या बहर साठी माझ्याकडून खास अभिनंदन!
माझे ६
-----------------------------------------------------
वह सुबह का अहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ खुर्शीद सर्-ए-बाम तो आया

"फूल मम भाग्यात नाही" असं म्हणायचं होतं का?

पण छोटया बहराची गझल खूप आवडली... माझ्या मते, हे एक आव्हान असतं.. ते पेलल्याबद्दल अभिनंदन...
माझे गुण ६
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

मतला एकदम सही.. आवडेश!
देव आणि आसवे.. खासच! सहज उतरलेत सर्वच शेर.

त्यातल्या त्यातही 'देव' खासच. Happy

'मोती, पुल (पूल ?)' हे शेर छान आहेत.
माझ्या मते ५ गुण.
-सतीश

देव हा ही पावतो ना?
रांग का दारात नाही?
>>> सही! मतला आणि शेवटचाही आवडले.

(एखाद-दुसरा शेर गाळला असता तर चालले असते का? 'पुल'ची सूट घेतली आहे, तो शेर नसता घेतला तर?- असे आपले मनात आले Happy )

छोट्या वृत्ताचे अभिनंदन! Happy ५ गुण

--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!

छानच आहे एकुण, सगळेच शेर आवडले
६ गुण

मोती, देव आणि आसवे आवडले. छोट्या बहराचे म्हणून विशेष आवडले.
६/१०
~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

बी आणि कार्यशाला च्या संवादातुन माझे शंका निरसन झाले.
माझ्याकडुन ५ गुण

आनंदयात्रींना मोदक. ७ गुण.
फूल, पुल थोडे खटकले.

व्रूत्त छान सुटसुटीत एकदम.. Happy
थोडे शेर कमी चालले असते..

५ गूण..

खूप कमी शब्दांमधे सगळं व्यक्त झालंय.. आवडली.. ८ गुण..

चांगली गझल.
मतला आणि देव शेर आवडले!
फूल, ओल हे शेर नीटसे कळले नाहीत. असे शेर वरवर स्पष्ट वाटतात आणि आवडतात.. पण. उदा. "माझ्या भाग्यात फुले नाहीत म्हणून मी वाटेत काटे पेरतो" म्हणजे नक्की काय?
"त्याच्या डोळ्यात आसवे आहेत पण मनात ओल नाही" म्हणजे हे अश्रू खोटे / स्वार्थी / मतलबी आहेत असे म्हणायचे आहे का?
माझे गुण - ५.

अतिशय सुरेख गझल..
सगळेच शेर दाद द्यावे असे आहेत.

देव हा ही पावतो ना?
रांग का दारात नाही?
आणि

माकडे ती तीन... बापू,
आज या देशात नाही

हे खास.

गुण -८

प्राजु

मतला बेस्ट पण नंतरची गझल अपेक्षेइतकी चांगली वाटली नाही.
एकूण गुण -- ४

"देवा"चा शेर आवडला. कमी शब्दांमधे अर्थ साधलाय प्रत्येक शेरात. गुण ५

"देवा"चा शेर आवडला. कमी शब्दांमधे अर्थ साधलाय प्रत्येक शेरात. गुण ५

मतला भारी आहे.
पण नंतर झेप कमी झालीय.
असो. केवळ सुरूवातीच्या भरारीसाठी
माझे गुणः ४

Pages