Submitted by वैभव फाटक on 24 October, 2012 - 22:59
कंठ आहे दाटलेला, मूक वाणी
वाच माझ्या लोचनांमधली कहाणी
साफ केला काळजाचा कोपरा मी
आठवांची जळमटे होती पुराणी
टाकले होतेस तू पाऊल जेथे
आजही फुलतात बागा त्या ठिकाणी
हक्क माझा राहिला नाही स्वतःवर
ही तुझ्या प्रेमात पडल्याची निशाणी
यायची दु:खा, पुन्हा घाई कशाला
आजही आहे जुने, डोळ्यात पाणी
वैभव फाटक ( २४ ऑक्टोबर २०१२)
http://vaibhavphatak12.blogspot.in/2012/10/blog-post_24.html
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कंठ आहे दाटलेला, मूक वाणी वाच
कंठ आहे दाटलेला, मूक वाणी
वाच माझ्या लोचनांमधली कहाणी<<< अच्छा मतला है मियाँ
साफ केला काळजाचा कोपरा मी
आठवांची जळमटे होती पुराणी<<< वा वा, शैली वेगळी
टाकले होतेस तू पाऊल जेथे
आजही फुलतात बागा त्या ठिकाणी<<< मस्त
अच्छी गझल, ताझा गझल
आज मायबोलीवर काही खरे नाही.
आज मायबोलीवर काही खरे नाही. सकाळपासून तिसरी दमदार, फ्रेश गझल आली.
आता मलाही एक गझल 'टाकावीशी' वाटू लागली आहे.
( गझलेच्या तक्रारी करणार्यांनो, आजची सकाळ जरा निरखा )
स्वच्छ! जळमटे आणि पुराणी - ही
स्वच्छ!
जळमटे आणि पुराणी - ही पुनरुक्ती वाटली मला तरी.
आपण ह्यापेक्षा भारी लिहीता पण.
शुभेच्छा!
वाह! मस्त..! कंठ आहे दाटलेला,
वाह!
मस्त..!
कंठ आहे दाटलेला, मूक वाणी
वाच माझ्या लोचनांमधली कहाणी
'ठीक ठाक' मतला वाटला.
साफ केला काळजाचा कोपरा मी
आठवांची जळमटे होती पुराणी
अगदी सहज.. आणि थेट !
टाकले होतेस तू पाऊल जेथे
आजही फुलतात बागा त्या ठिकाणी
जुनाच खयाल... पण छान मांडलास.
हक्क माझा राहिला नाही स्वतःवर
ही तुझ्या प्रेमात पडल्याची निशाणी
जे ब्बात! खरा 'आशिक़' शेर! मस्तच !
यायची दु:खा, पुन्हा घाई कशाला
आजही आहे जुने, डोळ्यात पाणी
परत एकदा 'ठीक ठाक..'
एकंदरीत 'टू गुड' गझल!
अभिनंदन!
बेफिजी, कणखरजी, रणजीत
बेफिजी, कणखरजी, रणजीत सर्वांचे आभार..
छानच बाकी सर्वान्चे सान्गूनच
छानच
बाकी सर्वान्चे सान्गूनच झाले आहे तेच मलाही सान्गायचे होते
छान आहे
छान आहे
खुप सुंदर गझल
खुप सुंदर गझल
वाह!!!!!!
वाह!!!!!!
आश्वासक लेखन आहे तुमचे.
आश्वासक लेखन आहे तुमचे.
वैभव फाटक! गझल आवडली. मतला
वैभव फाटक!
गझल आवडली.
मतला सुंदर!
खालील शेर आम्हास स्फुरले, तुझी उर्वरीत गझल वाचून..........
साफ केला कोपरा अन् कोपरा मी.....
केवढी अडगळ मनामधली पुराणी!
येवुनी वाटेवरी गेलीस ज्या, तू.....
ताटवे फुलतात आता त्या ठिकाणी!
मी न माझा, तू तुझी ना राहिलेली.....
काय ही प्रेमात पडल्याची निशाणी?
यायचे दु:खा तुला तर ये कधीही;
मात्र नाही राहिले डोळ्यात पाणी!
...........प्रा.सतीश देवपूरकर
छान ! आवडली !!
छान ! आवडली !!
वैभव.. गझल आवडली. छान आहे
वैभव.. गझल आवडली. छान आहे एकद. पाणी.. आवडले.
अति सुन्दर
अति सुन्दर
यायची दु:खा, पुन्हा घाई
यायची दु:खा, पुन्हा घाई कशाला
आजही आहे जुने, डोळ्यात पाणी
सुंदरच. गझल आवडली.
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार..