Submitted by वैवकु on 16 October, 2012 - 12:33
कसा दिसणार होतो म्हणा मी साजणीला
बिलगला चंद्र होता तिच्या त्या चाळणीला
तुला जाऊन आता किती वर्षे उलटली
अजुनही गंध येतो तुझा या पैठणीला
इथे दुःखेच दुःखे कुठे जागाच नव्हती
तसे मग सूख बसले मनाच्या वळचणीला
'तुझा' मी शेर जेंव्हा मुळी केलाच नाही
गझल मुकलीच माझी खर्या साकारणीला
कसा जाऊ पुण्याला नि शोधू नोकरी मी
कुणी नसणार आई तुझ्या वेणी-फणीला
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फारच आग्रह आसेल तर पुर्ण गझल
फारच आग्रह आसेल तर पुर्ण गझल लिहून देऊ का???<<<
इच्छा तुमची, हे कोणतेही आव्हान वगैरे नाही. मला फक्त पैठणी हा काफिया कसा अधिक निभावला जाऊ शकेल हे पाहण्याची उत्सुकता आहे. बाकी काही नाही.
तुझ्या सा-याच, आई, स्मृती
तुझ्या सा-याच, आई, स्मृती रेशीमस्पर्शी!
कसर लागे न केव्हा स्मृतींच्या पैठणीला!!
'तुझा' मी शेर जेंव्हा मुळी
'तुझा' मी शेर जेंव्हा मुळी केलाच नाही
गझल मुकलीच माझी खर्या साकारणीला
कसा जाऊ पुण्याला नि शोधू नोकरी मी
कुणी नसणार आई तुझ्या वेणी-फणीला
हे अगदी खास वैभवी शेर, खूप आवडले.अनेक शुभेच्छा वैभव.
आता मी काही बोलू का ? दोन
आता मी काही बोलू का ?
दोन शेरान्बाबत सान्गतो ..आता शेर माझेच आहेत म्हणून मला जे दिसले ते स्पष्ट करून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे
चू भू द्या घ्या !!
१)तुला जाऊन आता किती वर्षे उलटली
अजुनही गंध येतो तुझा या पैठणीला
यात ती =आई नाही !! मक्त्यात आई आहे ......
(आई जिवंत आहे म्हटल्यावर तिच्यावर पैठणीचा हा शेर माझ्यातला गझलकार आयुष्यात लिहू शकणार नाही हे मी स्पेशली व्यक्त करू इच्छितो !!)
दोन्ही शेर वेगळे आहेत
ती कोण? = काल्पनिक आहे!! हा शेर ज्या त्या वाचकास जी गवसेल तीच ती समजावी .
पैठणीच का = काफिया म्हणून.... तरीही आधी काफिया सुचला मग शेर केला असे झाले नाही या वेळी काफियाकारता माझ्या मेंदूला खूप राबावे लागले आहे !!
पैठणी बद्दल = अस्सल मराठमोळी चीज ..माझ्या विठ्ठला सारखीच !!
गझल म्हटले की ती एक कवितेची कविता असते असे एका शायरास सांगावे लागत नाही तसेच पैठणी म्हटले की मोर-कोयर्या हे मराठी माणसाला सांगावे लागत नाहीच ....त्यामुळे मोर वगैरेचा मुद्दा विचारात घेण्यासारखा नाही वाटत आहे मला तरी
काफिया म्हणून = सुंदर काफिया आहे हा . निभावण्याची हातोटी जमली नाही हे मत वैम म्हणून आदरास पात्र पैठणी ऐवजी बांधणीला असेही करावे वाटले होते पण मराठमोळेपणाचा विचार केला ..जो पहिल्या शेरात करायचा राहून गेला होता !!
अन्वय :बेफीजीन्नी सांगितला आहेच !!
हा शेर संवादात्मक आहे
मला का आवडला =एका जीवित व्यक्तीने (स्त्री/पुरुष ) एका मृत व्यक्तीशी (स्त्रीच) ती गेल्यावर ती आहेच अशा पद्धतीचा हा संवाद साधला आहे . आता या प्रस्तावनेस न्याय देणारी /पुरावा देणारी एक दुसरी ओळ खाली समारोपात आली आहे .
अजूनही गंध आहे...असे लिहिणार होतो मग त्या ऐवजी येतो असे लिहिले. आहे पेक्षा येतो असे म्हटल्याने गंधातला एका प्रकारचा लाईव्हनेस मलातरी जाणवतो. येणे ही प्रक्रिया हालचाल दर्शवते
सुमार का नाही ?= ... आता असलेला/ली एक तो/ती ..... नसलेली एक ती....... एक पैठणी अन तिला येत असलेल्या नसलेल्या तिचा गंध आणि तोही तिला जाउन अनेक वर्षे उलटल्यानंतरही !!
स्पष्ट असे एक चित्र समोर उभे करतो हा शेर !! तसा परीणामाकारक आहे हा .
ती जावून = मरून असा अर्थ न काढता फक्त निघून जावून असा अर्थ मी काढला अन हा शेर माझ्या सासरी गेलेल्या बहिणीनाही लागू होतो असे आढळले
प्राजुच्या आगामी उद्घोषित शेराच्या प्रतिक्षेत
धन्यवाद
_________________________________________
२)इथे दुःखेच दुःखे कुठे जागाच नव्हती
तसे मग सूख बसले मनाच्या वळचणीला
नक्कीच डोक्याचा कीस पाडणारा शेर..... माझ्यासाठीतरी !
सुख ची सूट घेतोय हे लक्षातच आले नाही !!
पर्यायी शेरांचे स्वागत !!
अट : लक्षात ठेवायची बाब हीच की इथे दुःखेच दुःखे(अनेक ) -सुख(एकुलते एक ! ) असाही काँट्रा साधणे अनिवार्य..मला तेच अपेक्षित आहे ....
असाच एक शेर मी केला होता त्यावरून हा मुद्दा लक्षात राहिला होता तो "उकरून" काढला मग..हा शेर करताना !!
मी म्हणालो "या सुखांनो !".... एकदा
दु:ख मी बोलावले कितिदातरी !!!!
कावळोजीरावांनी सौख्य असे करायला सांगितले ....सौख्य ही एक संकल्पना आहे सुख हे त्याचे मूर्त स्वरूप असते हा एक्झ्याक्ट फरक मी विचारात घेतला व म्हणून बदल स्वीकारला नाही
देवसरांच्या पर्यायीत परसदार इत्यादी इत्यादी आले आहे माझ्या पहिल्या ओळीतल्या 'कुठे ' मध्ये ते आलेच आहे असे मला वाटते. वळचणीकडे सहसा कुणाचे लक्ष जात नाही ...माझे ही लक्ष "कुठे जागाच नव्हती" असे म्हणून झाल्यावर तिकडे गेले ..........त्यामुळे त्या 'कुठे'त तीच तेवढी नाही आहे
दु:खेच दु:खे मनभर एकुलते एक सुख आले तरी ते मनाच्या वळचणीला बसणार ...पहा माझी काय अवस्था झाली आहे नै !! ------------हेच सान्गायचे होते
असो
सर्वांचे पुनश्च धन्यवाद
चर्चा छान होते आहेच अशीच सुरू रहावी ही विनंती ..आता मी बोललो म्हणजे संपली असे नाही आहे !!
सर्वांचे पुनश्च धन्यवाद
आपला नम्र ,ऋणी
वै व कु
भारतीताई धन्यवाद !!
भारतीताई धन्यवाद !!
बेफि, तुम्ही प्रथम
बेफि, तुम्ही प्रथम प्रतिसादात
चर्चेच्या उद्देशाने - का सुमार वाटला?
(आईचे कांबळे, गोधडी काव्यात चालते, तिच्या उबेने, गंधाने आई आठवते, मग पैठणी का नाही?)>>> असे लिहल्यामुळे मी, शेर त्याचा आशय , अर्थाचे पदर आणि व्यक्तिसापेक्ष आवड निवडी बद्दलच्या शक्यतांची चर्चा केली, पण तुमच्या प्रतिसादांवरून तुम्हाला फक्त प्राजूशी चर्चा करायची होती असे दिसते. तसे लिहायला हवे होते....
--------------------------------------------------------------------------------------
पण कोणी असे म्हणाले का की 'काहीच हाती लागले नाही'? (कारण कोणाबद्दल शेर आहे हेच कळले नाही?)>>> त्या न कळण्यातच एक मजा आहे हे तुम्हीही जाणता.
येथेही तेच आहे.. मग तुम्ही उगाच त्याला "आई" वगैरे सारख्या चौकटी लावून त्यावर चर्चा करण्यात काय अर्थ आहे.
तुम्ही लिहल्या प्रमाणे...
१) दुसरा वेणीफणीचा शेर आई वारल्यानंतरही जिवंत असल्याचा भास होऊन भानहीन अवस्थेत कवीने लिहिला आहे हीसुद्धा एक शक्यता
२)तुम्ही लहानपणीची सख्खी आई आणि मोठेपणीची सावत्र आई या संकल्पना क्षणभर स्वीकारल्या असत्यात तर दोन आईवरचे शेरही पटले असते....
तुम्ही तुमच्या मनाचे मांडे दुसर्याला खाऊ घालत आहात..
असो... माझ्याकडुनची चर्चा संपली.
धन्यवाद!
........................................................................................शाम
फारच आग्रह आसेल तर पुर्ण गझल
फारच आग्रह आसेल तर पुर्ण गझल लिहून देऊ का???<<<
इच्छा तुमची, हे कोणतेही आव्हान वगैरे नाही. मला फक्त पैठणी हा काफिया कसा अधिक निभावला जाऊ शकेल हे पाहण्याची उत्सुकता आहे. बाकी काही नाही.>>>>
>>>> बेफीजी इर्शाद !!
(इर्शादच म्हणतात ना ? की चुकलो मी ....चुभु द्याघ्या!!)
गझल कराच ही विनन्ती

कसा जाऊ पुण्याला नि शोधू
कसा जाऊ पुण्याला नि शोधू नोकरी मी
कुणी नसणार आई तुझ्या वेणी-फणीला << खास !
तुला जाऊन आता किती वर्षे
तुला जाऊन आता किती वर्षे उलटली
अजुनही गंध येतो तुझा या पैठणीला
कसा जाऊ पुण्याला नि शोधू नोकरी मी
कुणी नसणार आई तुझ्या वेणी-फणीला <<<
या ओळी मस्त.
तुझ्या सयींनी गंधित, मोहक
तुझ्या सयींनी गंधित, मोहक कशिदाकारी!
पुन्हा मी व्याकुळ होतो पाहुन पैठणीला
हा पर्यायी शेर नव्हे.. पण वैभव च्या शेरामध्ये तिच्या आठवणींचा गंध त्या पैठणीला येतो असा अर्थ आहे.. मी अर्थ तोच ठेवायचा प्रयत्न केला आहे. फक्त 'पैठणी' या काफियाची खासियत त्यात मांडता येते का हे थोडे लक्षपूर्वक पाहिले. कदाचीत वैभव ला हा शेर आवडणार नाही. पण.. या शेरामध्ये पैठणीला... कांबळी, गोधडी, घोंगडी इ. इ. नक्कीच रिप्लेस करू शकणार नाही. एकूण चर्चा खूप आवडली.
एकूणच ही चाललेली चर्चा अभ्यासपूर्ण आहे याबद्दल मायबोलीवरच्या गझलकारांचे अभिनंदन. अशीच चर्चा चालू राहो आणि नविन नविन प्रयोग होत गझल शिकायला मदत होत राहो.. ही गझलकारांच्या चरणी प्रार्थना.
अमित . प्राजक्ता कुलकर्णी ,
अमित . प्राजक्ता कुलकर्णी , धन्यवाद
प्राजु ....विशेष आभार तुझा शेर मी माझ्या शेराशी मुळीच कम्पेयर करत नाही आहे
मला तो जास्त नाही आवडला ... कारण
१- व्रुत्तात जरा गड्बड जाणवते
२- मी तुला फार आधीच सान्गणार होतो..पण म्हटले आधी तुझ्या शेराची वाट पहावी . प्राजु पैठणीत कशिदाकारी नसते जरीकाम असते ...कशिदा हा कर्नाटकी मुसलमानी प्रकार आहे . त्यामुळे मला नाहीच आवडली कशिदाकारी पैठणीवर
(आता तू पैठणी काधिन्कधी वापरली असशील तुलाच माझ्यापेक्षा जास्त माहिती असण्याचीही एक शक्यता मी गृहित धरतो आहे माझी माहीती चुकत असल्यास क्षमस्व बरका !!)
आसो
कधी कधी मला वाटते आपल्या मनातला अर्थ आपल्या शेरात जसाच्या तसा उतरवणे अन तो वचकानाही जसाच्या तसा जाणवणे ही खरी कामियाबी आहे
तुझ्या शेरात तुला जे मनात आहे तेच उतरवता आले आहे अन तुला जे म्हणायचे आहे ते मला जसेच्या तसे समजले आहे ...हे माझ्याकरता जास्त महत्त्वाचे !!!!
पुनश्च धन्स !!

शाम, रसप, आकाश, प्राजु यांची
शाम, रसप, आकाश, प्राजु यांची प्रगल्भ मते आवडली.
धन्यवाद वैभव!!
धन्यवाद वैभव!!
गझल थोडी चर्चा फार नव्या
गझल थोडी चर्चा फार
नव्या म्हणी
वैभवा, हा शेर तुझा झाला आहे.
वैभवा, हा शेर तुझा झाला आहे. माझा त्यावर काही अधिकार नाही, कारण खयालाचा मूळ जनक तू आहेस! घे बेट्या ऎश कर!
टीप: आम्ही आधी दिलेला शेर व आता दिलेला शेर यांची बारकाईने तुलना कर, म्हणजे आपल्याच शेराचा आपण कसा इस्लाह करू शकतो, चिंतनानंतर हे तुझ्या लक्षात येईल!<<<
हे वाचलंच नव्हतं मी
तुम्ही तुमच्या मनाचे मांडे
तुम्ही तुमच्या मनाचे मांडे दुसर्याला खाऊ घालत आहात..<<<
हेही वाचलं नव्हतं! मनातले कसले आलेत मांडे? सरळ शेर आहे की तुला जाऊन किती वर्षे झाली तरी तुझा गंध पैठणीला येतो. येथे तुम्हाला व्यामिश्रता मिळते, बहुपदरीत्व मिळतं पण हाती काही लागत नाही म्हणता. शेर कोणावर आहे हे क्लीअर होत नाही असे काहीसे म्हणता. मग आता तिथे मी आई बसवून पाहिली, प्राजू म्हणतात तसे पत्नी बसवून पाहिली, प्रेयसी बसवा. इतका काय अंधारात मारलेला खडा आहे काय तो शेर?
भूषणराव! पैठणीच्या आम्ही
भूषणराव! पैठणीच्या आम्ही सुचवलेल्या शेरामधे काही खटकते काय?
आपले उद्बोधक मत वाचायला आवडेल!
एक उत्सुकता म्हणून विचारले!strong>
तुझ्या सा-याच, आई, स्मृती
तुझ्या सा-याच, आई, स्मृती रेशीमस्पर्शी!
कसर लागे न केव्हा स्मृतींच्या पैठणीला!!
चान्गला शेर आहे ....प्राजु म्हणत होती तशी पैठणीची वैशिष्ट्ये आली आहेत
एक जरीचा पदर/काठ असता तर अजून मजा आले आसती ...(प्राजुला नक्कीच आली असती )
मतला अगदी जबरी.!! घरी वैगेरे
मतला अगदी जबरी.!!
घरी वैगेरे वापर करण्यासारखा आहे...:डोमा:
मस्त!
धन्यवाद खुरसाले आवर्जून शोधून
धन्यवाद खुरसाले
आवर्जून शोधून वाचलेली दिसते ही गझल तुम्ही .त्यासाठी विशेष धन्स
Pages