Submitted by भुंगा on 1 October, 2012 - 06:35
खास गणपतीच्या दिवसातला कोकणचा घरचा मेनू.............
मेनू तयार
विलायती फणसाची भाजी
चिबुडाची कोशिंबीर
काकडीची कोशिंबीर
ओल्या नारळाची चटणी
बाप्पाला मोदक
.
.
.
.
आता बसा मिटक्या मारत
तळटीपः
आगामी आकर्षण - ऋषीपंचमीची भाजी अर्थात "बडम"
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमच्यात दही पोहे, वाटली डाळ
आमच्यात दही पोहे, वाटली डाळ आणि उमो- पण आम्ही देशावरचे.
निंबे, लाल भोपळ्याला डांगर म्हणतात विदर्भात (???) बहुतेक हे चिबुड म्हणजे शेंदाड (पिकलेली गोल काकडी) असेल त्याची कोशिंबीर करतात किंवा नुसतेच खातात सोलापूरसाईडला.
भुंग्या, ती फणसाची भाजी
भुंग्या, ती फणसाची भाजी तोंपासु दिसतेय तू खायला घातल्यावर कमेंट करीन.
चिबुड म्हणजे खरबुजाचाच भाऊ...
चिबुड म्हणजे खरबुजाचाच भाऊ... तरबुज, खरबुज, चिबुड सगळे एकाच कुटुंबातले
भूंग्या अरे कुठे फेडशील हे
भूंग्या अरे कुठे फेडशील हे पाप? २ दिवसापूर्वीच घरात चिबुडाचा विषय निघाला. नवीन पिढीला माहित नाही. आम्ही मात्र इथे मिळत नाही म्हणून त्याची चव आठवत राहिलो. आणि तू इथे कोशिंबीरीचे फोटो टाक. २-४ घेऊन आला असतास तर काय तुझे पंख फाटले नसते.


मामी, आपल्या फणसाच्या भाजीची चव नाही पण याला.....>>>>>>>हे मात्र खरं.
फोटो छान आलेत. कोकण आठवल.
सगळंच तों पा सू..... नुस्त्या
सगळंच तों पा सू.....
नुस्त्या प्र चि टाकताहेत मंडळी, एक पदार्थ काही पाठवत नाही की खा म्हणून आग्रह करत नाहीत...... अरेरे रे रे...
बहुतेक हे चिबुड म्हणजे शेंदाड
बहुतेक हे चिबुड म्हणजे शेंदाड (पिकलेली गोल काकडी) >>> असच वाटतय मलाही. पिकलेल्या काकडीला देशावरचे - परभणी- नांदेड साईडचे वाळुक किंवा वाळके म्हणतात. आतून खरबुजाच्या रंगाचे अन खूप बियावाले फळ असते हे.
मेनू मस्त आहे अन प्रचि सुध्दा.
विचारुन बघ कमळीला करुन देते
विचारुन बघ कमळीला करुन देते का ..आयतं गिळायला माझं काय जातयं
काकडीची कोशिंबीर, ओल्या
काकडीची कोशिंबीर, ओल्या खोबर्याची चटणी नि मोदक वगळता इतर प्रकार कधी ना पाहिले ना चव माहितीये

असा मेनू तयार करून गटगला कधी बोलावतोस ते सांग आधी
असा मेनू तयार करून गटगला कधी
असा मेनू तयार करून गटगला कधी बोलावतोस ते सांग आधी
>>>
वाट बघ
रिया, असे (च) काही नाही,
रिया, असे (च) काही नाही, बोलावेल की तो आपल्याला (कदाचित :फिदी:)
(No subject)
हे घ्या चिबुड.....
हे घ्या चिबुड.....
लाजो, सायो हा तिसर्या
लाजो, सायो हा तिसर्या दिवशीचा मेनू होता...... विसर्जनाला पोहे असतातच
चिबूड + दही + साखर = तोंपासु
चिबूड + दही + साखर = तोंपासु
अल्टिमेट मेन्यु. कोकण, फणसाची
अल्टिमेट मेन्यु.
कोकण, फणसाची भाजी, चिबुड अशा आठवणी जागवल्याबद्दल भुंग्याचा निषेध
भालावली - आडिवरे>>>>>>> अरे वा मामाचा गाव पण जवळ्च. मज्जाय ब्वा
>>>चिबूड + अधमुरं दही + साखर
>>>चिबूड + अधमुरं दही + साखर = तोंप>>><< +१
बागेश्री +१ बाकीचे पदार्थ
बागेश्री +१ बाकीचे पदार्थ खरेच नाही माहीत
मस्त नैवद्य रे भुंग्या !
मस्त नैवद्य रे भुंग्या !
भुंग्या मस्तच रे. मी कालच
भुंग्या मस्तच रे. मी कालच संकष्टीला विलयती फणसाची (नीर फणसाची) काप तळलेली. चीबुडाचा खातमा आज.
ओय्.... चिबडाला 'काकडी' कोण
ओय्.... चिबडाला 'काकडी' कोण म्हणतंय ते??

ते 'मेलन' वंशातलं फळ आहे.
'चिबुडाची कोशिंबीर' असा शुद्ध उच्चार न करता 'चिबडाची कोशिंबीर' म्हणा, तर त्याची खरी चव जीभेवर उतरेल
बरोबर मंजूडी... मोठ्या
बरोबर मंजूडी...
मोठ्या काकडीला आमच्या गावाला "तवसं" म्हणतात.
भुंगा, मे महिन्यात जाण्याचा
भुंगा, मे महिन्यात जाण्याचा योग आल होता तुमच्या मामाच्या घरी . मामींच्या हातचा स्वयंपाक चखता आला होता!. तोच इतका मस्त होता. फोटो पाहुन तर तो.पा.सु
ती चुल, मांडणी सगळ घर डोळ्या समोरुन तरळुन गेल.
विवन ++++१
विवन ++++१
Pages