प्रवेशिका - ५ ( sandeep_chitre - सांजवेळी प्रेयसीची गाज नाही... )

Submitted by kaaryashaaLaa on 30 September, 2008 - 00:00

मित्रहो,

ठरल्याप्रमाणे कार्यशाळेत निर्दोष ठरलेल्या प्रवेशिका तुमच्यासमोर सादर करत आहे.
तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहेच, पण आणखी एक जबाबदारीही आहे तुमच्यावर.
प्रत्येक गझलला तुम्ही १० पैकी गुण द्यायचे आहेत.
हे गुणांकन तुमच्या अभिप्रायातच नोंदवायला हरकत नाही.

तर सादर आहे आजची प्रवेशिका....

सांजवेळी प्रेयसीची गाज नाही
रातराणी धुंद झाली आज नाही

कोण रे तो, दंग बैसे गात गाणे?
बासरीला सूर की आवाज नाही?

भोग माझे योग झाले, मात्र आता
संपले ते भोगही हा माज नाही

वागताना बंधने ना पाळली मी
निंदकांची जीभही नाराज नाही

चालले जे पर्वताला हात देण्या
पाय त्यांचे भूषवाया साज नाही?

साजणी का साजणाला भूल पाडे?
धुंद झाल्या यौवनाला लाज नाही?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वागताना बंधने ना पाळली मी
निंदकांची जीभही नाराज नाही

छान!!

माझे गुणः ३

पहीला मस्तच..
माजही वेगळा वाटला..

गुण ६

चौथा शेर आवडला.

३/१०

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

वागताना बंधने ना पाळली मी
निंदकांची जीभही नाराज नाही

खरंच छान जमलाय.. ३ गुण..

सांजवेळी प्रेयसीची गरज नाही, असं वाचतोय मी >>> हो मी ही तसेच वाचले. पुढे गाज बद्दल चर्चा आहे तेव्हा कुठे लक्षात आले.

Pages