Submitted by kaaryashaaLaa on 30 September, 2008 - 00:00
मित्रहो,
ठरल्याप्रमाणे कार्यशाळेत निर्दोष ठरलेल्या प्रवेशिका तुमच्यासमोर सादर करत आहे.
तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहेच, पण आणखी एक जबाबदारीही आहे तुमच्यावर.
प्रत्येक गझलला तुम्ही १० पैकी गुण द्यायचे आहेत.
हे गुणांकन तुमच्या अभिप्रायातच नोंदवायला हरकत नाही.
तर सादर आहे आजची प्रवेशिका....
सांजवेळी प्रेयसीची गाज नाही
रातराणी धुंद झाली आज नाही
कोण रे तो, दंग बैसे गात गाणे?
बासरीला सूर की आवाज नाही?
भोग माझे योग झाले, मात्र आता
संपले ते भोगही हा माज नाही
वागताना बंधने ना पाळली मी
निंदकांची जीभही नाराज नाही
चालले जे पर्वताला हात देण्या
पाय त्यांचे भूषवाया साज नाही?
साजणी का साजणाला भूल पाडे?
धुंद झाल्या यौवनाला लाज नाही?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही काही
काही काही ओळीत प्रश्नचिन्ह उगाच आलेत असे वाटते.
'माज' शब्द गझलेचा प्रासादिक भाव कमी करतो.
प्रेयसीची 'गाज'.. गाज हा शब्द 'हाक', 'साद' अशा अर्थी वापरलेला दिसतो पण सहसा आपण समुद्राची गाज असा वापरतो. असो.. प्रयत्न केला त्याचे कौतुक.
१) गझलेचा आशय - ०.५ गुण
२) शैली - १ गुण
३) शब्दरचना - १ गुण
४) प्रवाह - १ गुण
५) शेर - ०.५ गुण
============
ऐकूण - ४ गुण
वागताना
वागताना बंधने.. आवडला.
गुण? - मीच शिकायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे...
पुढील गझलेसाठी शुभेच्छा!
भोग माझे
भोग माझे योग झाले, मात्र आता
संपले ते भोगही हा माज नाही >> आवडलं
वागताना
वागताना बंधने ना पाळली मी
निंदकांची जीभही नाराज नाही
जास्त पटला. पाच गुण.
गाज? हं! गाज
गाज? हं! गाज हा शब्दं समुद्राच्या सतत आवाजासाठी. शक्यतो त्यामुळे एखाद्या सततच्या क्रियेसाठी वापरला जातो, नाही?
इथे चाहूल ह्या अर्थाने वापरलेला दिसतो...
निंदकाचा शेर आवडला.
माझे ५
-----------------------------------------------------
जान दी, दी हुई उसी की थी
हक तो यह है, के हक अदा न हुआ
>> वागताना
>> वागताना बंधने ना पाळली मी
>> निंदकांची जीभही नाराज नाही
हे विशेष आवडले.
एकूण गुण ५
वागताना
वागताना बंधने ना पाळली मी
निंदकांची जीभही नाराज नाही
चपखल आलाय....
माझे गुण - ३
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||
वागताना
वागताना बंधने ना पाळली मी
निंदकांची जीभही नाराज नाही
चपखल आलाय....
माझे गुण - ३
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||
>>वागताना
>>वागताना बंधने ना पाळली मी
निंदकांची जीभही नाराज नाही
हा तर सर्वानुमते छान आहे.
पण हाही खास..
>> चालले जे पर्वताला हात देण्या
पाय त्यांचे भूषवाया साज नाही?
व्वा!
पण यापुढे ? नसते तरी चाल्ले असते.
४
४ गुण
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....
निंदकाचा
निंदकाचा शेर आवडला.
गुण ४
चालले जे
चालले जे पर्वताला हात देण्या
पाय त्यांचे भूषवाया साज नाही?
हा शेर आवडला.
गुण - ५
प्राजु
वागताना
वागताना बंधने ना पाळली मी
निंदकांची जीभही नाराज नाही
- हा आवडला. ५ गुण
-----------------------------------------------
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!
निंदक शेर
निंदक शेर चांगला आहे.
माझे गुण - ४
छान आहे
छान आहे गझल.. बासरीचा शेर आवडला..
माज शब्द टाळायला हवा होता असं मलाही वाटलं..
५ गुण..
चालले जे
चालले जे पर्वताला हात देण्या
पाय त्यांचे भूषवाया साज नाही? >>> मस्त...५ गुण
शब्दरचना
शब्दरचना चांगली जमून गझल छान मिळून आलीय. फक्त पहिला शेर आणि शेवटचा हा थोडा विरोधाभास आहे , नाही का? बाकी उत्तम.
भोगाचा शेर
भोगाचा शेर जास्त आवडला. ५ गुण.
overall impact बरा
overall impact बरा आहे. माझे ४ गुण.
-क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे
४ गुण मला
४ गुण
मला थोडंसं इकडे तिकडे झाल्यासारखं वाटलं खरेतर माझी योग्यता नाही अधिक काही भाष्य करण्याची.
छान
छान छान.
सांजवेळी प्रेयसीची गाज नाही
रातराणी धुंद झाली आज नाही
गुणः ६
वागताना
वागताना बंधने ना पाळली मी
निंदकांची जीभही नाराज नाही
हे मस्त..!
४ गुण
=================मी वैशाखातला दर्द, तू श्रावण हिरवागर्द..!
वागताना
वागताना बंधने ना पाळली मी
निंदकांची जीभही नाराज नाही
आवडला
३ गुण
८ गुण छान
८ गुण
छान जमलीये
------------------------------
दिसलीस तू...फुलले ॠतू..................
४
४ गुण
-----------------------------------------------
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!
मतला वाचून
मतला वाचून ही 'गजल' नाही तर 'हजल' असावी असं वाटलं. ('प्रेयसीची गाज' या वाक रचनेमुळे)
वागताना बंधने ना पाळली मी
निंदकांची जीभही नाराज नाही >>> आवडला.
परागकण
प्रत्येक
प्रत्येक शेर स्वतंत्र असला तरी त्यांची एकमेकांत कांहीच बांधिलकी वाटत नाही. नियमानुसार बरोबर असलं तरी मेकॅनिकल वाटतं. ४मार्क्स
अज्ञात, गझल
अज्ञात,
गझल ही 'होमोजिनियस' असावी अशी आवश्यकता नसते.
गझल मधले पाच शेर पाच वेगवेगळ्या विषयांवरचे आणि मूडचे असू शकतात - आणि पारंपारिक गझल मधे ते तसे असतातही.
त्यात फक्त 'जमीन' सारखी असते, बाकी काही बंधन नाही.
कविता आणि गझलमधे हाच मोठा फरक असतो.
म्हणजे त्या अर्थी गझल हा सारखी 'जमीन' असणार्या ५ किंवा अधिक कवितांचा समूह असतो असंही म्हणता येईल.
ज्या गझलमधे 'प्रवाह' असतो, तिला मुसलसल गझल किंवा रवानी गझल असं म्हणतात. आणि मी वर्णन केलेल्या पारंपारिक गझलला 'गैर-मुसलसल गझल' असं म्हणतात.
==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही
kaaryashaalaa08@maayboli.com
ठीक
ठीक वाटली.
माझ्या मते ४ गुण.
-सतीश
अरे वा...
अरे वा... कार्यशाळा चालक -- परवा वृत्तभंगाबद्दल माहिती मिळाली आणि आज मुसलसल / गैर मुसलसल गझलबद्दल.
Every day one learns something new असं म्हणतात ते अगदी खरंय
Pages