Submitted by मामी on 14 September, 2012 - 02:26
ठिकाण/पत्ता:
पार्ल्यात किंवा दादरात. कोणी आपल्याला उठवणार नाही असं धृवबाळासारखं अढळपद मिळवून देणारं कोणतंही ठिकाण /कॉफीशॉप. सुचनांचे स्वागतच स्वागत!
तर पटापट नाव नोंदणी करा!!!!
काय म्हणता? हे कशाबद्दल आहे तेच कळत नाहीये? काय हे! साधी चायनीज भाषा येऊ नये तुम्हाला? कसं होणार तुमचं?
बरं घ्या आता मराठीतून भाषांतर ....
आपली चायनीज वर्षु नील भारतात येतेय. तिला भेटण्यासाठी शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी किंवा रविवार, २१ ऑक्टोबरला सकाळी किंवा २१ ऑक्टोबरला संध्याकाळी असं गटग करायचं आहे.
त्याबद्दल आपापल्या नावाची नोंदणी करा. ठिकाण सुचवा आणि तारीखही कोणती ते सांगा.
जास्त मंडळींना सोईची तारीख ठरवण्यात येईल याची कृपया नोंद घ्या. कोणी याबाबत तक्रार केल्यास त्यांच्याशी चायनीज मधून भांडण्यात येईल.
वर्षु नील गटग शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता फुड हॉल, फिनिक्स मार्कॅट सिटी, कुर्ला इथे आयोजित करण्यात येत आहे.
माहितीचा स्रोत:
भारतीय हेरखाते
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, October 20, 2012 - 07:30 to 14:29
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संजीव (म्हमईकर), थॅंक्स अरे
संजीव (म्हमईकर), थॅंक्स
अरे तू अटेंड करत जा जेव्हा जमेल तेव्हा गटग. माबोवर आपण आयडी थोड्याफार प्रमाणात ओळखू लागतो. प्रत्यक्ष भेटत जातो तसतसे आपण त्या आय्डीमागची माणसंही ओळखू लागतो 
Thanks once again Ashwini,
Thanks once again Ashwini, pudhchya gtg la yenya che prayatn karin.
Good Night
Good Night
मामी... माझे नाव अॅड करा. मी
मामी... माझे नाव अॅड करा. मी फोनवरून कांगारू होतो...
ओके. ओके. केलं हं सेनापती.
ओके. ओके.
केलं हं सेनापती.
फोंकारू...
फोंकारू...
मामी मला पण अॅड कर
मामी मला पण अॅड कर कांगारुंमधे. मी मनातल्या मनात तिथेच होते.
अगदी खरंच
मामे, अजिबात करू नकोस तिला
मामे, अजिबात करू नकोस तिला अॅड. ती कायम स्वरूपी टांगारू आहे.
मला मजा आली गटगला. वर्षूताईला परत भेटून मस्त वाटले. तिच्यामुळे आलेली एक नवीन मैत्रिण पण मिळाली.
भौगोलिक अंतरामुळे आणि मी अति दमलेली असल्यामुळे आणि उठूनही दुसरीकडे जायचा मार्ग बंद झालेला असल्याने पल्याडच्या टेबलावरच्या लोकांशी फारश्या गप्पा झाल्या नाहीत.
मज्जा आली गटगला. ८ वर्ष
मज्जा आली गटगला. ८ वर्ष माबोकर असूनही गटगला गेले नव्हते. गेल्या महिन्यात ' परतोनी' आल्यावर मात्र माबोकरांना भेटायचे ठरवले होते .निघण्यापूर्वी ंमाझे मुग्धा आणि मंजूडी यांच्याशी बोलणे झाले होते. ठरल्याप्रमाणे फूड मॉलला गेले तर तिथे वर्षूताई, ललिता, ़ केश्वी, म्हमईकर , आशुतोष, ़ जिप्सी, नरेंद्र गोळेकाका ही मंडळी हजर होती. ललिताची पर्स घेण्याची इश्टाइल बघुन मी तिला ओळखले. वर्षूताईंचा फोटो माबोवर पाहिला होताच, त्यामुळे आपली टोळी लग्गेच ओळखली. मोकिमी पण भेटली. मग आम्ही 'रेनफॉरेस्ट ' मधे गेलो. मग हळूहळू ट्रॅफिक जॅममधून सुटलेलं पब्लिक हजर झालं.मी सुरूवात केली आहे.आता पुढचा वृत्तांत बाकीच्यांनी लिहा. एक मात्र खरे, या सगळ्यांना मी ़ कधी अग- तुग करायला लागले ते मलाच कळले नाही. आणि घड्याळात आठ कधी वाजले हेही... वर्षूताईंनी आग्रह करुन दिलेली बिस्कीट माझ्या लेकाला खूप आवडली.
ऑर्किडला वृत्तांत लिहायच्या
ऑर्किडला वृत्तांत लिहायच्या क्लासला घालायला हवय.
महत्त्वाचे मुद्दे लिहा:
१. खादंती
२. गप्पाटप्पामधले महत्त्वाचे पॉइंट्स
३. कुणी कुणी काय काय विनोद केले.
४. टांगारूंचा निषेध कसा करण्यात आला
५. नविन आयडींची गंमत
हे असले मुद्दे नसतील तर गटगावृत्तांत बाद ठरवण्यात यावा.
नंदिनी , मी सुरूवात करुन दिली
नंदिनी , मी सुरूवात करुन दिली गं. वरची पोस्ट बघं ना.इथे लिहीलयं यापेक्षा जास्त एका दिवसात टाइपणं अशक्य आहे माझ्यासाठी.
हजर असलेल्यांना गटगचे फोटो
हजर असलेल्यांना गटगचे फोटो विपत्रातुन लवकरच धाडण्यात येईल याची नोंद घ्यावी.
जिप्स्या, तिसरा फोटो खतरा आणि
जिप्स्या, तिसरा फोटो खतरा आणि योग्य. जे आले नाहीत त्यांना टुकटुक!!!
अरे, तो आशुतोष घरी व्यवस्थित पोहोचला ना? आणि लली????
अगं ए, जरा मला आणि निलिमालाही
अगं ए, जरा मला आणि निलिमालाही विचार ना आम्ही व्यवस्थित पोहोचलो ना आणि कसे गेलो ते!
(मस्करी करतेय, दिवा घे)
मी, निलिमा मॉलमधून लिफ्टने खाली उतरल्यावर आम्हाला एस्कलेटरने खाली गेलेले जिप्सी आणि गोळेकाका भेटलेच नाहित. पण जिप्सी अधून मधून फोन करुन रस्ता सापडला का?, ऑटो मिळाली का?, रस्त्याचा वाईट वस्तीचा पॅच संपला का? आता कुठपर्यंत आलात (by road गेल्यामुळे)? घरी पोहोचल्यावर कळवा वगैरे विचारत होता
मी, निलिमा मॉलमधून लिफ्टने
मी, निलिमा मॉलमधून लिफ्टने खाली उतरल्यावर आम्हाला एस्कलेटरने खाली गेलेले जिप्सी आणि गोळेकाका भेटलेच नाहित. पण जिप्सी अधून मधून फोन करुन रस्ता सापडला का?, ऑटो मिळाली का?, रस्त्याचा वाईट वस्तीचा पॅच संपला का? आता कुठपर्यंत आलात (by road गेल्यामुळे)? घरी पोहोचल्यावर कळवा वगैरे विचारत होता >>>> बापरे, अमानवीय.
मी थोSSSडीच उशीरा म्हणजे ६.३०
मी थोSSSडीच उशीरा म्हणजे ६.३० ला रेनफॉरेस्टला पोचले. आत शिरून माझ्या नजरेच्या टप्प्यात मायबोलीकरांचा कंपू आला नाही तोच "आली, आली" असे पाच सहा वेगवेगळ्या आवाजाचे आणि आशयाचे ध्वनी कानावर आले. (१)'आली एकदाची', (२)'ही आत्ता आली', (३)'संयोजक म्हणे, किती उशीरा यायचं त्याला काही सुमार', (४) 'आली का? नेहमीच उशीरा येते', (५)'चला आली तरी. नशीब!', (६)'अच्छा, ही का? श्या':!' अशा अनेक छटा त्यातून स्पष्टपणे ऐकू आल्या. पण 'डगमनेका नै' हे ब्रीदवाक्य मनाशी घोकून मी सरळ जाऊन कंपूत मिसळले.
तोवर संयोजनाची सूत्रं आशुतोषनं अलगदपणे स्वत्:च्या हातात घेतली होती आणि मी गेल्यागेल्या माझ्यापुढे झक्कासपैकी स्टार्टर्स आलेही.
मुग्धानंद, मोकीमी आणि ऑर्किड तसंच म्हाईमकर यांना पहिल्यांदाच भेटले. मुग्धानंद आणि मंजूडीच्यात गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे मंजूडी आली नाही हे बरंच झालं.
मोकीमी गप्प गप्प वाटली (का बरं? तू गप्प बसणार्यातली वाटत तर नाहीस.
). ऑर्किड मंद मंद हसत होती. संजीव बी ऊर्फ म्हाईमकर माझ्या आणि नीधपच्या समोर बसल्याने काही जास्त बोलले नसावेत. 
आशुतोषनं संयोजकत्व छानच पार पाडलं.
सगळ्यात लहान आवाजात बोलणारी वर्षुताईच होती. मी तिच्या शेजारीच बसल्याने मला ऐकू येत होतं. वर्षुताईनं आणलेली बिस्किटं मस्तच होती.
वृत्तांत जमेल तितके बोअर लिहा
वृत्तांत जमेल तितके बोअर लिहा रे.. उगाच मसालेदार बनवून न आलेल्यांची जळवू नका...
अगं खरंच ते दिसलेच नाहीत कारण
अगं खरंच ते दिसलेच नाहीत कारण लिफ्ट कुठेतरी भलतीकडेच होती आणि तिथून बाहेर यायला रस्ता वेगळीकडेच दाखवला गेला आम्हाला. मॉलच्या बाहेर आल्यावर रस्ता लागेपर्यंत अगदी निर्मनुष्य होतं
घाईघाईने आम्ही तिथून चालत असतानाच नीरजाचा फोन आला होता. रस्त्यावर आल्यावरही कुणी मुलुंड चेक नाक्याला यायलाच तयार होईनात. मॉलपासून लांब जाऊन ऑटो शोधणं म्हणजे अजून फुफाट्यात पडल्यासारखं झालं असतं म्हणून तिथेच दिसेल त्या ऑटोला प्लिज प्लिज न्या करत होतो. मिळाली एकदाची पण घाटकोपरपर्यंत टुकुटुकु गेलो आणि मग सुसाट सुटलो. मुलुंड चेक नाक्यालाही ५ मिनिटांत रिक्षा मिळाली आधीचं वेटिंग पब्लिक असतानाही आणि सव्वा दहा साडे दहाला घरात पाऊल
(हा माझा गटग नंतरचा न विचारलेला वृत्तांत
)
१ तास आधीच निघालो असतो तर वेळेवर घरी पोहोचायचं टेन्शन आलं नसतं. घरचं अतीवयस्क पब्लिक वयोमानाप्रमाणे टेन्शन घेतं नजरेसमोर मी दिसेपर्यंत.
या वेळेस देवाने ध्यानीमनी नसताना अचानक निलिमाला गटगला आधीच धाडली घरपर्यंत सोबत म्हणून. त्यालाच माहित होतं की एकटंच निघावं लागणार आहे. जिप्सी आणि गोळेकाकाही हरवले होते
मामी, तुझा आणि नीरजाचा ड्रेस लई आवडला.
वर्षूताईने आणलेली बिस्किटं मी तिथेच खाऊन टाकली.. मस्त होती
वर्षूताईने आणलेली बिस्किटं मी
वर्षूताईने आणलेली बिस्किटं मी तिथेच खाऊन टाकली.. मस्त होती >>>> बॅगेत जागा नाही म्हणून बिस्किटं चुरा करून नेण्याची तुझी आयडिया महान होती. ते आम्ही हाणून पाडलं म्हणून तू तिथेच खाल्लीस? धन्य आहेस.
ती बिस्किटं माझी नव्हती. ती
ती बिस्किटं माझी नव्हती. ती आशुतोषची अमानत होती. माझ्या पर्शीतून घाईघाईत घरी आली. ज्याची अमानत त्याच्या बायकोला आज पोहोचती केली (चुरा न करता) भाजी मार्केटात जाता जाता. त्याने मुलांसाठी राखली असतील या कल्पनेने मलाच गट्टम करवली नाहीत
तात्पर्य : हम किसी की भी विश्वासके साथ हमारेपास दी हुई अमानत डॅमेज किये बिना वैसी की वैसी वापस करते है
Chyaaa.. Asa tuktuk naka buva
Chyaaa.. Asa tuktuk naka buva karu :-/
थरारक गटग. नेहमीप्रमाणे ५:३७
थरारक गटग.
नेहमीप्रमाणे ५:३७ ला मामीला ठाण्यातून फोन करुन तीला माझं येणं गुप्त ठेवायला सांगून , नेहमीप्रमाणे उशीरा निघालो, नेहमीप्रमाणे धावपळ करुन हळूहळू
बाईकत असताना नेहमीप्रमाणे (स्वतःच्या) बायकोचा फोन आला, नेहमीप्रमाणे तीला ठरलेल्या बेताचा सुगावा लागू न देता, नेहमीप्रमाणे बाहेर आहे, उशीर होईल एव्हढ मोघम सांगून फोन ठेवला.
अपेक्षेपेक्षा लवकरच मॉल दिसला, नेहमीप्रमाणे नक्की ठिकाण माहिती नसल्याने मामीला समसून रेन फॉरेस्ट कळून घेतले.
बायकोचा कात्रज केल्याची परत फेड अश्वीने पोहोचल्या पोहोचल्या "तू बायकोला घेउनच आलायस की ती डायरेक्ट येत्येय ?" हे विचारुन बाबूचा पार बाबूगेनू केला.
तीला सरप्राईज देतोय असं सांगून मी बाजी सावरायचा प्रयत्न केला.
उशीरा गेल्याने जागा बदलत बदलत, समोर ठेवलेली प्लेट कोणाची आहे आणि त्यात काय आहे याचा विचार करता खानपान उरकले.....
वर्षूमध्ये काही फरक पडला नाहीये, बाकीही कोणी फारसं सुधारलेलं नाहीये. रेन फॉरेस्ट ड्रेन फॉरेस्ट करुनच माबो ग्यान्ग बाहेर पडली.
बाहेरचं माकड बघून सगळ्या टांगारुंची आठवण आली
निलिमाने ती ऑफिसमधून सायनला
निलिमाने ती ऑफिसमधून सायनला पोहोचताना सहजच मला फोन केला तेव्हा मी नुकतीच त्या रेन फॉरेस्टमध्ये स्थानापन्न होत होते. मी तिला गटगला कुर्ल्याला आले आहे आणि तू पण ये की असं म्हणताच ती कुणाचं गटग? वगैरे विचारुन लगेच तयार झाली आणि लागलीच विद्याविहारला उतरली. देख, क्या टायमिंग था! ती तर जशी काही माझ्यासाठीच आली होती
तू येणार आहेस हे मलाही माहित नव्हतं आणि तिलाही.
बायकोचा कात्रज केल्याची परत फेड अश्वीने पोहोचल्या पोहोचल्या "तू बायकोला घेउनच आलायस की ती डायरेक्ट येत्येय ?" हे विचारुन बाबूचा पार बाबूगेनू केला. >>> म्हणूनच साध्या सरळ व्यक्तीचा कात्रज करु नये...

थरारक गटग: नेहमीप्रमाणे
थरारक गटग::D
नेहमीप्रमाणे -नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे आणि नेहमीप्रमाणेच
vruttant lihale aahe, udya
vruttant lihale aahe, udya sandhyakali ushira prakashit karnyache manas aahe, baghu kase jamte te.
हल्लो फ्रेन्ड्स... खूप खूप
हल्लो फ्रेन्ड्स...
.. तुझ्यातही एकाही इन्चाचा फरक नाही पडलाय.. 


खूप खूप धन्स... रेन फॉरेस्ट मधे तुमच्या सर्वान्च्या प्रेमाच्या रेन मधे भिजूनन बर बर वाटल
पायच निघत नव्हता... !!!!
ममईकर.. टान्गारून्साठी जर्रा जास्त चमचमीत टाक रे वृत्तान्त....
अम्या.. 'बाबूगेनू '..
दिनेश, सेना.. धन्स रे आथवण करून फोन केल्याबद्दल.. आमच्या गोन्गाटामुळे तुम्ही विचारलेल्या प्रश्नान्ची कदाचित चुकीची उत्तर दिली गेली असतील..
अश्विनी.. आशु. ची बिस्किट त्याला चुरा न करता पोचवल्याबद्दल ठान्कु....
जिप्स्या फोटो सुप्पर्ब आलेत रे.. बर झाल मी माझा कॅमेरा बॅग मधून काढलाच नाही...
जस्जसा वेळ मिळल मी येईनच माबो वर चक्कर मारायला..
आज से पुणे निवासी हू.. क्रोम मधे इत्कच शुद्ध लिहिता येत...
तायडे... खरच... ईतका गोंधळ की
तायडे... खरच... ईतका गोंधळ की काय बोलतेस तेच कळेना. त्यामुळे नीट बोलणेच झाले नाही.
मी नंबर घेतलाय मामीकडून तुझा. करतो फोन काही दिवसात. 
अरे व्वा मस्त गटग झालं
अरे व्वा मस्त गटग झालं दिसतयं, वर्षुताई पुण्यात मजा कर .
बाबूचा पार बाबूगेनू केला.>>> म्हणुन माणसाने कधी खोटं बोलु नये ( विशेषतः बायकोशी) , नाहीतर असं हुतात्मा व्हावं लागतं .
म्हणूनच साध्या सरळ व्यक्तीचा
म्हणूनच साध्या सरळ व्यक्तीचा कात्रज करु नये.. <<<
यावर बाब्या म्हणेल 'तू माझा बाबूगेनू केलास त्याचं काय!'
त्यावर केश्वी म्हणेल 'तू साधा सरळ आहेस का?'
त्यावर बाब्या उत्तरेल 'मी साधाच आहे फोडणीचा नाही. अजूनतरी सरळ आहे, वाकलेलो नाही.. '
त्यावर केश्वी म्हणेल '.................................'
त्यावर बाब्या म्हणेल '.................................'
त्यावर केश्वी म्हणेल '.................................'
असोच!!
काय करणार नी, मराठी माणूस...
काय करणार नी, मराठी माणूस... मोडेन, पण वाकणाSSSSSSर नाही.
Pages