Submitted by मामी on 14 September, 2012 - 02:26
ठिकाण/पत्ता:
पार्ल्यात किंवा दादरात. कोणी आपल्याला उठवणार नाही असं धृवबाळासारखं अढळपद मिळवून देणारं कोणतंही ठिकाण /कॉफीशॉप. सुचनांचे स्वागतच स्वागत!
तर पटापट नाव नोंदणी करा!!!!
काय म्हणता? हे कशाबद्दल आहे तेच कळत नाहीये? काय हे! साधी चायनीज भाषा येऊ नये तुम्हाला? कसं होणार तुमचं?
बरं घ्या आता मराठीतून भाषांतर ....
आपली चायनीज वर्षु नील भारतात येतेय. तिला भेटण्यासाठी शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी किंवा रविवार, २१ ऑक्टोबरला सकाळी किंवा २१ ऑक्टोबरला संध्याकाळी असं गटग करायचं आहे.
त्याबद्दल आपापल्या नावाची नोंदणी करा. ठिकाण सुचवा आणि तारीखही कोणती ते सांगा.
जास्त मंडळींना सोईची तारीख ठरवण्यात येईल याची कृपया नोंद घ्या. कोणी याबाबत तक्रार केल्यास त्यांच्याशी चायनीज मधून भांडण्यात येईल.
वर्षु नील गटग शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता फुड हॉल, फिनिक्स मार्कॅट सिटी, कुर्ला इथे आयोजित करण्यात येत आहे.
माहितीचा स्रोत:
भारतीय हेरखाते
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, October 20, 2012 - 07:30 to 14:29
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामे, तुझ्यासाठी हिंदी कोकाटे
मामे, तुझ्यासाठी हिंदी कोकाटे शोधायचं घेतलय मी मनावर
माननीय मामीजान यांच्या आवाहनाला प्रतिसाद देउन हजारोंच्या संख्येने सामील व्हा!!!!
भारी आकडों मे नावनोंदणी
भारी आकडों मे नावनोंदणी करो....
चलो गटग..
मामी, तुसी ग्रे8 हो ! दादरला
मामी, तुसी ग्रे8 हो ! दादरला कुठेही ठेवा, मी येईन.निवांतपणा शिवाजीपार्कच्या कट्ट्यावरच मिळतो दादरमध्ये. पण तिथे गटग कसं करणार ?
पार्ल्यातलं शॅक आपलंच
पार्ल्यातलं शॅक आपलंच आहे.
वेबमास्तर गटग तिथेच केले होते.
तिथे कितीही वेळ बसा कोण्णी काही म्हणत नाही.
वर्षूला पार्ले जास्त बरे पडणार असेल तर शॅकमधे करू गटग.
अजून एक नवीन झालंय हाटेल त्यांची परिक्षा घेऊन मग सांगते
मामी, दादर नैतर ठाण्यातच होऊदे गटग<<<
जिप्स्या तू वर्षूला भेटायला येणारेस की ती तुला?
हे ठाणेकरांचं अस्संच
(पार्ल्यात गटग ठरल्यास...)
(पार्ल्यात गटग ठरल्यास...) शॅक जरा कंजेस्टेड वाटलं मला. तस्मात, दुसर्या हाटेलाची परिक्षा नक्की घेणे.
जास्त मंडळींना सोईची तारीख
जास्त मंडळींना सोईची तारीख ठरवण्यात येईल याची कृपया नोंद घ्या. कोणी याबाबत तक्रार केल्यास त्यांच्याशी चायनीज मधून भांडण्यात येईल.
>>>
मामे, हे वाक्य चायनीजमधेही इथे टाकावे, तरच भांडणाच्या धमकीवर विश्वास ठेवण्यात येईल
मामी ..... नोंदणी करण शक्य
मामी
.....
नोंदणी करण शक्य नाही , कारण मी गेले बरेचदा टांगारु झालो होतो ..
लले, पार्ल्यात म्हणल्यावर
लले, पार्ल्यात म्हणल्यावर कंजस्टेड ला पर्याय नाही.
अजून १ उडपी टाइप गुज्जु हाटेल आहे. आदिती म्हणून. स्टेशनपासून अगदी जवळ मात्र पार्कींगचा लोचा मजबूत. पण प्रशस्त आहे. तेही चालेल.
महिन्याभरानंतरची हजर असण्याची कबुली आज देता येत नाहीये त्यामुळे मी पण टांगारू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण पार्ल्यात होणार असेल तर हाटेल बुकींग इत्यादी मॅनेज करून ठेवेन.
नी, ठिकाण सुचवल्याबद्दल आणि
नी, ठिकाण सुचवल्याबद्दल आणि बुकिंग करून देणेबद्दल धन्यवाद.
ठाणे सजेस्ट करणार्या सगळ्या स्वार्थी मंडळींचा णिशेद! सतत आपलं ठाणं..... ठाणं.....! अरे पाहुणीची काय सोय बघाल की नाही?
या की जरा एक दिवस पार्ल्यात!
मलाही यायला आवडेल! ठाण्यात
मलाही यायला आवडेल!
ठाण्यात असल्यास सोपे होईल!!
मामीने मी सुचवलेला दादरचा
मामीने मी सुचवलेला दादरचा पर्याय वाचला नाही का?
स्वारी हं मंजूडी. वाचला पण
स्वारी हं मंजूडी. वाचला पण नंतर मागे पडला. पण गटगला जेवत कोण बसणार?
चला आता पुन्हा एकदा इथे लक्ष
चला आता पुन्हा एकदा इथे लक्ष केंद्रित करूयात.
व्हेन्यु फायनल : पार्ले, वांद्रा, दादर (वर्षुताई १८ तारखेनंतर पाली हिलवर रहायला असेल.)
३-४ तासांची निश्चिंती मिळू शकेल आणि गोंगाटाला बंदी घालणार नाहीत अशी जागा.
पार्ल्यातील 'शॅक' हा व्हेन्यु तयार आहेच. पण इतर कोणी सोईचा व्हेन्यु सुचवला तरी स्वागतार्ह.
नावनोंदणी फलक हलता ठेवा, वाढता ठेवा.
अरे, पार्ल्यात वगैरे गटग
अरे, पार्ल्यात वगैरे गटग ठेवता. कल्याणकरणीचे वांदे होतात. अर्थात ठाण्यात होणार नाही हे तर दिसतंच आहे. दादर ला असेल तर यायचे ठरवू शकेन.
ठिकाण नक्की झाले की मग विचार करून सांगते. 
मामींच्या असल्या प्पोस्ट
मामींच्या असल्या प्पोस्ट सारखी पोस्ट तू पण आपल्या बाफवर लिही ग दक्षे
मामी ,दादरला सेनाभवनकडून
मामी ,दादरला सेनाभवनकडून शिवाजीपार्ककडे जाणार्या रस्त्यावर 'जिप्सी ' नावाचं छान हॉटेल आहे. जागा मोठी नाही कंजेस्टेडच आहे पण १०-१५ माणसं बसू शकतात. छोटी पार्टी होऊ शकते. फूड क्वालिटी चांगली. माझ्या पारसी नातेवाईकांनी तिथे एक फॅमिली पार्टी केली होती . बराच वेळ बसलो होतो सगळेजण.
भारती, नुसतं बसायला देऊन
भारती, नुसतं बसायला देऊन उपयोग नाही. आपला गोंगाट पण सहन करता आला पाहिजे त्यांना
बरं आपण तिथे गेल्यापासून निघेपर्यंत एका जागी बसत नाही. इकडून तिकडे फिरणार 
निरजा तू जे अदिती म्हणते
निरजा तू जे अदिती म्हणते आहेस ते लग्नाच्या हौल च्या जवळच का ? ते खूप प्रशस्त आहे. तिथे चालेल .
नाहीतर "क्याफे मैलू" पण चांगल आहे की ? झालच तर रामकृष्ण पहिला मजला (एयर कंडीशन) पण चांगल आहे
Not able to come on mabo
Not able to come on mabo freq. Once everything is final let me know please. Would like to join.
मामी, वर्षु तुमच्या गट्ग च्या
मामी, वर्षु तुमच्या गट्ग च्या पहिल्या पे़ज वर एका नविन मेंबर ने स्वत:हुन गटग ला यायची इच्छा व्यक्त केलि आहे. तिला कोणिहि रीस्पॉन्स दिलेला दिसत नाहिये. तुम्हि सगळ्या एकमेकांच्या गप्पांमधे विसरला वाटते. अशाने नविन मेंबर कसा मिसळेल जुन्या मेंबर मधे?
प्रिया७, लक्षात आणून
प्रिया७, लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. खरंतर नवीन जुने मेंबर असं काही नाही गं. नोंदणी करायची आणि सरळ यायचं. पण पहिल्यांदा येताना जरा धाकधुक असेल. मी तिच्या विपुत लिहिते.
प्रिया, लक्षात आणून
प्रिया, लक्षात आणून दिल्याबद्दल धन्स..
विपु केलीये स्मृती ला..
दादरला सेनाभवनकडून
दादरला सेनाभवनकडून शिवाजीपार्ककडे जाणार्या रस्त्यावर 'जिप्सी ' नावाचं छान हॉटेल आहे.>>>
लिमयांचं जिप्सी ना....ते जेवणाचं रेस्टॉरंट आहे.... आपण साधारण ६ ला भेटणार.... जिप्सी खुपच फेमस आहे ( मी रेस्टॉरंट बद्दल म्हणते आहे.. आपल्या जिप्स्या बद्दल नाही !!!) पण त्या वेळेस जेवण म्हणजे ...... तसे स्नॅक्स ही मिळतात... पण येवढ्या लौकर ते सर्व्ह करतिल का ? तसच ते चायनीज आहे....
मीरा, ते कंसातलं वाक्य नसतं
मीरा, ते कंसातलं वाक्य नसतं लिहिलं तर चालल नसत का?
मीरा, ते कंसातलं वाक्य नसतं
मीरा, ते कंसातलं वाक्य नसतं लिहिलं तर चालल नसत का? >>>>
अरे जिप्सी तू त्या "जिप्सी" पेक्षा फेमस आहेस रे!!!! काही दिवसांनी "ते" तुला "ब्रँड अंबॅसेडर " करतिल ....
मोकिमी, जिप्सीमध्ये
मोकिमी, जिप्सीमध्ये स्नॅक्सही मिळतात की
मी संध्याकाळी जाऊन अरबट चरबट खाऊन आले आहे तिथे. अचानक पाऊस पडायला लागला होता. सासूबाईंना कितीवेळ रस्त्याच्या कडेला एखाद्या दुकानाच्या छपराखाली उभं करणार? टॅक्सीही मिळेना. म्हणून त्यांना घेऊन जिप्सीत घुसले होते. मस्त हादडलं दोघींनी आणि पाऊस थांबल्यावरच बाहेर आलो 
जिप्स्या, एक बार फिरसे येऊर
जिप्स्या, एक बार फिरसे येऊर होना मंगता है
मोकिमी जिप्स्या, एक बार
मोकिमी

जिप्स्या, एक बार फिरसे येऊर होना मंगता है>>>>>येस्स, जोरदार अनुमोदन
मोकिमी, जिप्सीमध्ये स्नॅक्सही
मोकिमी, जिप्सीमध्ये स्नॅक्सही मिळतात की >>>
मिळतात.. पण आपल्याला तेवढी जागा पुरेल का? आर्थात दादर मधे भरपुर जागा आणि आता उठा न म्हणंणारं रेस्टॉरंट मिळणे कठीणच आहे....
नी म्हणते तसं पार्ले ठीक वाटतय...
नाहीतर पवईला या Saffron Spice
नाहीतर पवईला या Saffron Spice
Pages