ऑगस्ट २०१२ - खरेदीतील काही नवीन पुस्तके
जॉन बेकर - अनुवाद: जोसेफ तुस्कानो सतराव्या शतकात युरोपमध्ये घडलेली एक विचित्र सत्यकथा आहे ही...वैज्ञानिक संशोधनातून नव्या संकल्पना पुढे येत होत्या. त्या जुन्या धार्मिक समजुतींना आव्हान देत होत्या.
या दोन्ही शक्तींमधील संघर्षाला धार चढत होती, ती राजदरबारातील लहरी माणसांच्या कटकारस्थानांमुळे.
अशाच एका कारस्थानाच्या पार्श्वभूमीवरची ही कथा... केपलर नावाच्या एका महान संशोधकाच्या म्हाता-या आईला चेटकीण ठरवून जिवंत जाळायचा कट आखला गेला. त्या खटल्यातून आपल्या निष्पाप आईला कसं वाचवायचं, या विवंचनेनं ग्रासलेल्या केपलरना कोणत्या मानसिक ताणतणावातून जावं लागलं, याचं भावस्पर्शी चित्रण करणा-या मूळ जर्मन कादंबरीचा हा सरस मराठी अनुवाद...
दादासाहेब बिडकर वसा आदिवासी सेवेचा - डॉ.सरल धारणकर गांधीजींच्या तत्त्वज्ञानाच्या प्रकाशात त्यांनी आयुष्यभर वाटचाल केली. नाशिकजवळ डांग परिसरात आदिवासींच्या विकासासाठी संस्था उभारल्या. त्यांनी सुरू केलेल्या कार्यात त्यांच्या पुढच्या दोन पिढ्याही सहभागी झाल्या.
लढले अन जिंकले मी - डॉ.गीता वडनप ही काही कपोलकल्पित कथा नाही, काल्पनिक कहाणी नाही. ही आहे एक खरीखुरी गोष्ट. एक डॉक्टर, तिला झालेला ब्लडकॅन्सर अन् तिनं जिद्दीनं त्याच्याशी दिलेला लढा
यांची अगदी कालपरवा घडलेली वास्तव गोष्ट. पारदर्शक साधेपणा, नितळ निवेदन अन् जीवनाबद्दलचा सकारात्मक विचार अशा तिहेरी पेडांनी विणलेला गोफ चितारणारे आत्मकथन.
विज्ञान यात्रीव्यंकटेश बापूजी केतकर - डॉ.प्रभाकर कुंटे व्यंकटेश बापूजी केतकर यांच्याबद्दल बहुतेक सुशिक्षित भारतीयांना माहिती नसते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. नेपच्युन ग्रहापलीकडे परिक्रमा करीत असलेला ग्रह आणि त्याची परिक्रमा याचे भाकीत केतकर यांनी केले. केतकर ज्या समाजात वाढले, त्यातील अधिकांश घटक नवग्रह म्हणजे मानवी जीवनात ढवळाढवळ करणारे अशा अंधश्रध्देखाली वावरत होते. ह्यावरूनच केतकरांच्या विलक्षणतेची कल्पना येते व या विचारकाबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा होते. ती जिज्ञासापूर्ती डॉ.प्रभाकर कुंटे यांच्या चरित्रलेखनातून होते.
लढले अन जिंकले मी - डॉ.गीता
लढले अन जिंकले मी - डॉ.गीता वडनप >>> या गीता वडनप म्हणजे पुण्यात दत्तवाडी मध्ये त्यांचा दवाखाना होता गीता आणि राजेश वडनप त्याच का?
हो, त्याच उत्तम पुस्तक आहे.
हो, त्याच
उत्तम पुस्तक आहे.
अरे मग वाचायलाच पाहिजे..आजच
अरे मग वाचायलाच पाहिजे..आजच जाउन बघते लायब्ररीत आलेय का?
सुरेख यादी.
सुरेख यादी.
विज्ञान यात्रीव्यंकटेश बापूजी
विज्ञान यात्रीव्यंकटेश बापूजी केतकर<<<
हे पुस्तक मला हवे आहे चिनूक्स