मी तयार केलेली साडी

Submitted by विनार्च on 31 August, 2012 - 23:24

फावल्या वेळात केलेला हा उद्योग आहे पण करताना खूप मजा आली म्हणुन इथे शेयर करते आहे. माझी बहिण फॅशनडिझायनर आहे तिच्या बरोबर तिच्या एका सप्लायरकडे गेले होते, तिचं काम संपेपर्यंत मी सहज त्याच्या दुकानात चक्कर मारली. तिथे बर्‍याच लेसेस होत्या त्यातली एक मला खूप आवडली म्हणुन मी चौकशी केली तर कळलं की ती साडीसाठी वापरतात. तसा माझा व साड्यांचा संबध जवळ जवळ नाहीच पण हे काम इंट्रेस्टींग वाटल आणि वेळच वेळ होता म्हणुन त्या लेसेस बघायला सुरवात केली आणि बाहेर पडताना बर्‍याच लेसेस घेउनच बाहेर पडले. आता घेतल्या आहेत तर फुकट घालवायच्या नाहीत या हिशोबाने साडीसाठी लागणार्‍या इतरही गोष्टींचा शोध घेतला आणि केली एकदाची साडी पुर्ण.
खाली फोटो देते आहे, कशी वाटली ते नक्की सांगा. साधारण काय किंमत असेल तिची बाजारात तेही सांगा. (माझी शेवटची साडी खरेदी लेकीच्या बारश्याला आठ वर्षांपूर्वी त्यामुळे किंमतीचा काहीच अंदाज नाही)

साडीचा पदर
2012-07-20 15.58.50.jpg2012-07-20 15.59.21.jpg

मधल्या भागात टाकलेले बूंदे (मी टिकल्या म्हटलं तर बहिणीने माझ्याकडे तुक टाकत म्हटलं "त्याला बूंदे म्हणतात" Proud )

2012-07-20 16.05.06.jpg2012-07-20 16.05.59.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुरेख ! प्रचंड पेशन्स चे काम.
यामध्ये वेगवेगळ्या छोट्या लेसेस एकत्र करून लावल्यात, की एकच मोठी लेस लावली आहे?

छान.
२ लेसेस दिसतायत.
भुलेश्वरमधे बघितल्या होत्या अश्या व्हेलवेटवाल्या लेसेस. ती संपूर्ण एक लेस असावी आणि कडेची झालरची एक लेस.

सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद!
यामध्ये वेगवेगळ्या छोट्या लेसेस एकत्र करून लावल्यात, की एकच मोठी लेस लावली आहे?>>>> अवल, वेगवेगळ्या लेसेस आहेत.

सुरेख !
माझीही साडीखरेदी अनेक वर्षांपूर्वी झालेली असल्याने किंमतीचा अंदाज नाही सांगता येणार.
साडी मात्र खूपच सुंदर आहे...

छानच !

विनार्च वाटलच मला, म्हणूनच तर विचारलं Happy
किमान ४ लेसेस तरी एकत्र केल्या आहेस तू. पण तू विनयाने ते लिहिलं नाहीस Happy अन तुझ्या सफाईमुळे ते चटकन लक्षातही येत नाही सहजपणे.
एखाद-दुसरी लेस एकत्र करणं तसं सोपं असतं पण त्या पेक्षा जास्ती लेसेस एकत्र करणं अवघड असतं. एकतर त्यांचं काँबिनेशन करणं, अन त्याहूनही अवघड त्यांना सफाईदार जोडणं. खुप खुप छान Happy एकदम प्रोफेशनल टच आलाय.
स्वराली, तुळशी बागेत सम्राट दुकानात आणि इतरही दुकानांमध्ये खुप व्हरायटीज मिळतील तुला.
कोथरुडला अंबिका स्टोअर्स.

Pages