फावल्या वेळात केलेला हा उद्योग आहे पण करताना खूप मजा आली म्हणुन इथे शेयर करते आहे. माझी बहिण फॅशनडिझायनर आहे तिच्या बरोबर तिच्या एका सप्लायरकडे गेले होते, तिचं काम संपेपर्यंत मी सहज त्याच्या दुकानात चक्कर मारली. तिथे बर्याच लेसेस होत्या त्यातली एक मला खूप आवडली म्हणुन मी चौकशी केली तर कळलं की ती साडीसाठी वापरतात. तसा माझा व साड्यांचा संबध जवळ जवळ नाहीच पण हे काम इंट्रेस्टींग वाटल आणि वेळच वेळ होता म्हणुन त्या लेसेस बघायला सुरवात केली आणि बाहेर पडताना बर्याच लेसेस घेउनच बाहेर पडले. आता घेतल्या आहेत तर फुकट घालवायच्या नाहीत या हिशोबाने साडीसाठी लागणार्या इतरही गोष्टींचा शोध घेतला आणि केली एकदाची साडी पुर्ण.
खाली फोटो देते आहे, कशी वाटली ते नक्की सांगा. साधारण काय किंमत असेल तिची बाजारात तेही सांगा. (माझी शेवटची साडी खरेदी लेकीच्या बारश्याला आठ वर्षांपूर्वी त्यामुळे किंमतीचा काहीच अंदाज नाही)
साडीचा पदर
मधल्या भागात टाकलेले बूंदे (मी टिकल्या म्हटलं तर बहिणीने माझ्याकडे तुक टाकत म्हटलं "त्याला बूंदे म्हणतात" )
वॉव! हे मला कधीही आयुष्यात
वॉव! हे मला कधीही आयुष्यात जमणार नाही! भारी!
वा.. सुपर्ब प्रचंड पेशन्स
वा.. सुपर्ब प्रचंड पेशन्स ठेवुन करावं लागतं ना हे काम? ग्रेटच..
सहिय्ये .माझ्यामते साध्या
सहिय्ये .माझ्यामते साध्या दुकानात हि साडी कमीतकमी चार हजारपर्यंत जाईल.
खूप सुंदर झाली आहे साडी
खूप सुंदर झाली आहे साडी मेहनतीचं काम आहे.
खुप सुरेख ! प्रचंड पेशन्स चे
खुप सुरेख ! प्रचंड पेशन्स चे काम.
यामध्ये वेगवेगळ्या छोट्या लेसेस एकत्र करून लावल्यात, की एकच मोठी लेस लावली आहे?
सुंदर.
सुंदर.
छान. २ लेसेस
छान.
२ लेसेस दिसतायत.
भुलेश्वरमधे बघितल्या होत्या अश्या व्हेलवेटवाल्या लेसेस. ती संपूर्ण एक लेस असावी आणि कडेची झालरची एक लेस.
सगळ्यांचे खूप खूप
सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद!
यामध्ये वेगवेगळ्या छोट्या लेसेस एकत्र करून लावल्यात, की एकच मोठी लेस लावली आहे?>>>> अवल, वेगवेगळ्या लेसेस आहेत.
अ प्र ति म
अ प्र ति म
विनार्च, अप्रतिम गं!!!
विनार्च, अप्रतिम गं!!!
मस्त्...साडी व लेसचा खर्च
मस्त्...साडी व लेसचा खर्च किती आला? अश्या प्रकारची साडी मी ६ हजाराला पाहीली होती.
वा..खूपच सुंदर !!!!!!!!!
वा..खूपच सुंदर !!!!!!!!!
सुरेख ! माझीही साडीखरेदी अनेक
सुरेख !
माझीही साडीखरेदी अनेक वर्षांपूर्वी झालेली असल्याने किंमतीचा अंदाज नाही सांगता येणार.
साडी मात्र खूपच सुंदर आहे...
मस्त बनवलय. अशा साडीची किमंत
मस्त बनवलय.
अशा साडीची किमंत कमीत कमी २ हजार ते तुमच्या मनाला येइल तो आकडा लावा.
छानच !
छानच !
खुपच सुंदर भारतात असाल तर
खुपच सुंदर
भारतात असाल तर एक्-दोन साडीच्या दुकानांना भेट द्या. किंमतीचा अंदाज येईल
सुंदर
सुंदर
सुरेख दिसते आहे साडी
सुरेख दिसते आहे साडी !
पुण्यात अशा लेस आणि बीड्स कुठे मिळतात ..
वा! सुरेख दिसते आहे साडी.
वा! सुरेख दिसते आहे साडी. नेसल्यावरही सुरेख दिसेल.
खुप सुरेख ! प्रचंड पेशन्स चे
खुप सुरेख ! प्रचंड पेशन्स चे काम.>>>>++११
फारच सुरेख झाली आहे. अगदी
फारच सुरेख झाली आहे. अगदी घ्यावीशी वाट्ते आहे
विनार्च वाटलच मला, म्हणूनच तर
विनार्च वाटलच मला, म्हणूनच तर विचारलं
किमान ४ लेसेस तरी एकत्र केल्या आहेस तू. पण तू विनयाने ते लिहिलं नाहीस अन तुझ्या सफाईमुळे ते चटकन लक्षातही येत नाही सहजपणे.
एखाद-दुसरी लेस एकत्र करणं तसं सोपं असतं पण त्या पेक्षा जास्ती लेसेस एकत्र करणं अवघड असतं. एकतर त्यांचं काँबिनेशन करणं, अन त्याहूनही अवघड त्यांना सफाईदार जोडणं. खुप खुप छान एकदम प्रोफेशनल टच आलाय.
स्वराली, तुळशी बागेत सम्राट दुकानात आणि इतरही दुकानांमध्ये खुप व्हरायटीज मिळतील तुला.
कोथरुडला अंबिका स्टोअर्स.
सुरेखच
सुरेखच
देखणी आहे साडी..
देखणी आहे साडी..
खूप सुंदर झाली आहे साडी.
खूप सुंदर झाली आहे साडी. मस्तच
सुरेख!
सुरेख!
खुप सुंदर. तुम्हाला किती खर्च
खुप सुंदर. तुम्हाला किती खर्च आला साडि बनवायला?
खुपच छान ! साधारण २५०० ते
खुपच छान ! साधारण २५०० ते ३००० पर्यंत कींमत ठीक आहे.
विनार्च, अप्रतिम साडी आहे.
विनार्च, अप्रतिम साडी आहे. बाजारात किमान ४५०० ला कोणीही विकत घेईल.
खुपच सुंदर साडी अशा साड्या
खुपच सुंदर साडी
अशा साड्या दुकानात बर्यापैकी महाग मिळ्तात.
Pages